आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुगलची अशीही चुक:अफगाणिस्तानचा स्टार फिरकीपटू राशिद खानच्या पत्नीचे नाव अनुष्का शर्मा!, जाणून घ्या नेमके प्रकरण आहे तरी काय

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नेटक-यांनी बनवले मीम्स

गूगल या प्रसिद्ध सर्च इंजिनमध्ये अफगाणिस्तानचा स्टार फिरकीपटू राशिद खानच्या पत्नीचे नाव बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा असल्याचे दाखवले जात आहे. विशेष म्हणजे 22 वर्षीय राशिद खान अविवाहित तरूण आहे. त्यामुळे राशिद खान सध्या चर्चेत आला आहे.

या कारणामुळे येतंय अनुष्का शर्माचे नाव
2018 मध्ये प्रीती झिंटाच्या एका इन्स्टाग्राम सेशन दरम्यान राशिद खानला त्याच्या आवडत्या अभिनेत्रीविषयी विचारणा झाली होती. त्याचे उत्तर देताना त्याने अनुष्का शर्माचे नाव घेतले होते. येथूनच गुगलने हे कनेक्शन उचलले आणि अनुष्का त्याची पत्नी असल्याचे म्हटले.

नेटक-यांनी बनवले मीम्स

राशिद हा अफगाणिस्तानचा नावाजलेला फिरकीपटू आहे. तो सध्या युएईमध्ये IPL 2020 स्पर्धेत सहभागी झाला आहे. राशिद खान हा सनरायझर्स हैदराबाद संघाचे प्रतिनिधीत्व करत आहे. तर अनुष्कासुद्धा विराटसोबत युएईमध्ये असून IPLचा आनंद लुटत आहे. गुगलवर राशिदच्या पत्नीचे नाव अनुष्का शर्मा असे सांगितले जात असल्याने नेटक-यांनीदेखील या गोष्टीवरून मीम्स बनवले आहेत.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser