आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अ‍ॅक्शन फ्रँचायझी:सलमान खान स्टारर ‘टायगर 3’वर कोरोनाचा परिणाम, आता मुंबईतच उभारला जाणार तुर्कीचा सेट

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • चित्रपटाच्या सेटची निर्मिती सुरू करण्यात आली आहे.

सलमान खानने ‘टायगर 3’ चित्रपटाची तयारी जोरात सुरू केली. गेल्या काही दिवसांत कतरिना कैफने ही यशराज फिल्म्सच्या स्टुडिओमध्ये काही भागाचे चित्रीकरण केले. आता ‘टायगर ३’ चे चित्रीकरण मुंबईच्या स्टुडिओमध्येच करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची बातमी आहे. सलमान या चित्रपटाचे चित्रीकरण इस्तंबूल येथे करणार असल्याच्या बातम्या होत्या. मात्र, कोरोना विषाणू वाढत असल्यामुळे निर्मात्यांनी नियोजनात बदल केला आहे.

मुंबईतील ‘एसआरपीएफ’ मैदानावर सेट तयार केला जात आहे. निर्माते आता मुंबईतील ‘एसआरपीएफ’ मैदानावरच तुर्कीच्या लोकेशनचा सेट तयार करणार आहेत. दिग्दर्शक मनीष शर्मा यांना अॅक्शन दृश्यात काहीही कमी राहू नये, असे वाटते. त्यामुळे त्यांनी सलमानचे टायगर शर्मा आणि कतरिनाचे जोया पात्र जोरदार दिसावे, यासाठी खास नियोजन केले आहे.

चित्रपटाच्या सेटची निर्मिती सुरू करण्यात आली आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी सांगितल्यानुसार, निर्माते चित्रपटाची कहाणी सात देशांत नेण्याचा विचार करत आहेत. स्टारकास्ट आणि क्रू सदस्यांची सुरक्षा लक्षात घेऊन निर्माते चित्रपटाच्या शेड्यूलवर काम करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...