आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

59 वर्षांच्या गोविंदाचे पाच किस्से:कर्ज घेऊन आईसाठी बनवला होता ट्रेनचा फर्स्ट क्लासचा पास, चार वर्षे लपवून ठेवली होती लग्नाची बातमी

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

इंडस्ट्रीमध्ये हिरो नंबर 1 म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता गोविंदा आज 59 वर्षांचा झाला आहे. मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या गोविंदाने चित्रपटसृष्टीत प्रवेश केल्यानंतर काही वर्षांतच सुपरस्टार पद प्राप्त केले. त्याचे स्टारडम एवढे होते की, एका मॅगझिनने गोविंदाला सोन्याची अंडी देणारी कोंबडी असे म्हटले होते. 21 वर्षांचा होईपर्यंत त्याला कुणीही ओळखत नव्हते आणि वयाच्या 22 व्या वर्षी त्याने तब्बल 50 चित्रपट साइन केले होते. गोविंदाने अनेक मुलाखतींमधून आपल्या चित्रपट प्रवासाबद्दल आणि संघर्षाविषयी सांगितले आहे.

1986 पासून सातत्याने आपल्या चाहत्यांना फिल्मी मेजवानी देणारा गोविंदा आतापर्यंत सुमारे 128 हून अधिक चित्रपटांमध्ये झळकला आहे. चित्रपटसृष्टीत कार्यरत असताना गोविंदाने 2004 मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात पाऊल ठेवले आणि काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर लोकसभेवर निवडून आला. पण 2008 मध्ये त्याने राजकारण सोडले आणि केवळ चित्रपटांवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली.

मामाने चापट मारली आणि म्हणाले - "तू या चित्रपटाचा नायक आहेस"

'पार्टनर', 'भागम भाग' सारख्या हिट चित्रपट देणा-या गोविंदाला पहिला चित्रपट मिळताच त्याच्या मामाने त्याला चापट मारली होती. एका मुलाखतीदरम्यान, गोविंदा म्हणाला होता, मी स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल फारच चिंतित होतो, कारण कोणत्याही चित्रपट निर्मात्याला एक छान दिसणारा नायकाचा चित्रपट बनवायचा होता.

गोविंदाने सांगितले की, हे टाळण्यासाठी त्याने आपल्या नृत्य, अभिनय आणि लढाऊ दृश्यांची व्हिडिओ कॅसेट तयार करण्यास सुरवात केली. त्याने ही व्हिडिओ कॅसेट आपल्या मामाला दाखवली. त्याचे मामा एका दुस-या विषयावर चित्रपटाची योजना आखत होते. गोविंदाने सांगितले की, अभिनय पाहून मामाने चित्रपटाचा विषय बदलला आणि त्याला चित्रपटात कास्ट केले. गोविंदा म्हणाला, 'जेव्हा मी माझ्या मामाला हीरो म्हणून कुणाला घेतले, असा प्रश्न केला. तेव्हा ते म्हणाले की डोळे बंद कर आणि तुला हीरोचा फोटो दाखवतो.' गोविंदाने डोळे मिटताच, मामाने एक जोरात चपराक मारली आणि म्हणाले, 'तूच या चित्रपटाचा नायक आहेस.'

'हत्या' चित्रपटातील सर्वात कठीण सीन
कारकिर्दीच्या सुरुवातीलाच गोविंदा बॉलिवूड चाहते आणि प्रेक्षकांमध्ये डान्सिंग स्टार म्हणून प्रसिद्ध झाला. एका मुलाखतीत त्याने सांगितले की, त्याने आपली डान्सिंग स्टारची इमेज बदलण्यासाठी 'हत्या' हा चित्रपट साइन केला. या चित्रपटाच्या एका सीनमध्ये त्याला 10 मिनिटांचा संवाद बोलायचा होता, पण हे फार कठीण काम होते. चित्रपटाच्या दृश्यात, गोविंदा नशेत असलेल्या एका मुलाशी बोलतो, जो ऐकू किंवा बोलू शकत नाही. अभिनेत्याच्या म्हणण्यानुसार, आव्हान असे होते की इतके दिवस नृत्य करणार्‍या अभिनेत्याला एवढा वेळ कोण ऐकेल.

नातेवाईकाकडून कर्ज घेऊन आईसाठी बनवला प्रथम श्रेणीचा पास
आपल्या संघर्षाचा काळ आठवताना गोविंदाने सांगितले होते, एकदा तो आपल्या आईला स्टेशनवर सोडण्यासाठी गेला होता, परंतु गर्दीमुळे त्याची आई रेल्वेत चढू शकली नाही आणि बघता बघता पाच गाड्या समोरून निघून गेल्या. परिस्थितीला कंटाळून गोविंदाने एका नातेवाईकाकडून कर्ज घेऊन आईसाठी प्रथम श्रेणीचा पास बनवला आणि आईला रेल्वेने सोडले. त्यानंतर त्याने यशस्वी होण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

पालकांना नेहमीच यशाचे श्रेय देणारे गोविंदा म्हणाला की, वडिलांच्या शिक्षणामुळेच त्याला अभिनयाची प्रेरणा मिळाली. एकदा त्याच्या वडिलांनी सांगितले की, आपण कोणताही व्यवसाय करू शकत नाही, कारण आपल्याकडे सेट अप करण्यासाठी पैसे नाहीत. तू तेच कर जे तू गुंतवू शकतो. गोविंदा सांगतो, त्याच दिवसापासून त्याने केवळ अभिनयाचा निर्णय घेतला. गोविंदाने ताज हॉटेलमध्येही नोकरीसाठी अर्ज केला होता, परंतु इंग्रजी कमकुवत असल्याने त्याला काम मिळू शकले नाही.

चाहत्याला मारली होती चापट
गोविंदा 2008 मध्ये फिल्मसिटी स्टुडिओमध्ये ‘मनी है तो हनी है’ या चित्रपटाचे चित्रीकरण करत होता. त्याच वेळी त्यांनी संतोष राय नावाच्या व्यक्तीला त्याने थापड मारली होती. त्यानंतर रायने मुंबई उच्च न्यायालयात खटला दाखल केला होता. उच्च न्यायालयाने 2013 मध्ये हे प्रकरण पुरेसे पुरावे नसल्यामुळे फेटाळून लावले. त्यानंतर रायने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. गोविंदा म्हणाला की, रायने सहकारी महिला कलाकाराशी गैरवर्तन केले होते, म्हणूनच त्याने त्याला चापट मारली. या घटनेनंतर अभिनेत्याचा करिअरचा आलेख घसरला होता.

लग्नाची बातमी लपली होती
स्टारडमचा आनंद घेत असताना गोविंदाने इंडस्ट्रीमध्ये आपल्या लग्नाविषयी कुणालाही कळू दिले नव्हते. एका मुलाखतीत जेव्हा गोविंदाला हा प्रश्न विचारला गेला तेव्हा तो म्हणाले की, तरुण मुलींमध्ये फॅन फॉलोव्हिंग कमी होईल असे मला वाटत होते. ते सांगतात, मला भीती वाटली की, लग्नाच्या बातम्यांमुळे माझा चार्म फिका पडले आणि चाहते कमी होतील. 11 मार्च 1987 रोजी गोविंदाने सुनीता आहूजाशी लग्न केले होते. त्यामुळे त्याने 4 वर्षे आपले लग्न लपवून ठेवले होते.

गोविंदाच्या काही मित्रांना आणि नातेवाईकांनाच त्याच्या लग्नाची माहिती होती. या दाम्पत्याला टीना आणि यशवर्धन ही दोन मुले आहेत. गोविंदाने 1991 मध्ये आपल्या मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी एक भव्य पार्टी दिली होती. पार्टीतील छायाचित्रे समोर आल्यानंतर लोकांना त्याच्या लग्नाची बातमी समजली होती.

बातम्या आणखी आहेत...