आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमान खान आणि केआरके वाद:गोविंदाने कमाल राशिद खानची बाजू घेतल्याचे नाकारले, म्हणाला - तो माझ्याबद्दल आणि माझ्या चित्रपटांबद्दल अनेकदा चुकीचे बोलला आहे

16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 2019 मध्ये केआरकेने गोविंदाविरोधात केले होते वक्तव्य

स्वयंघोषित चित्रपट समीक्षक कमाल आर खान म्हणजेच केआरकेने अलीकडेच दावा केला होता की, सलमान खान आणि त्याच्यात सुरु असलेल्या वादात गोविंदा त्याला पाठिंबा देतोय. केआरकेने सोशल मीडिया पोस्टद्वारे गोविंदाचे आभार मानले होते. गोविंदाचे आभार मानत त्याला निराश करणार नसल्याचे केआरकेने लिहिले होते. त्यामुळे गोविंदा केआरकेला पाठिंबा देत असल्याचा चाहत्यांचा समज झाला. मात्र आता गोविंदाने आपली बाजू मांडली असून केआरकेला कधीही पाठिंबा दिला नसल्याचे स्पष्ट केले आहे. मी बर्‍याच वर्षांपासून केआरकेच्या संपर्कात नाही, मीटिंग नाही, फोन कॉल केला नाही किंवा मी कधीही त्याला मेसेज केला नाही, असे गोविंदाने स्पष्ट केले आहे.

माझ्या चित्रपटांबद्दलही केआरके चुकीचा बोलला आहे - गोविंदा

एका न्यूज एजन्सीसोबत बोलताना गोविंदा म्हणाला, 'मी काही न्यूज रिपोर्ट्समध्ये वाचले की मी केआरकेला पाठिंबा देतोय. मी तुम्हाला सांगू इच्छितो की गेली कित्येक वर्षे मी केआरकेच्या संपर्कात नाही. कोणतीही मीटिंग नाही किंवा कोणताही फोन नाही. मला वाटते त्याने दुसऱ्या कोणत्यातरी व्यक्तीला उद्देशून ते ट्वीट केले असावे. स्वयंघोषित समीक्षक केआरके माझ्या चित्रपटांबद्दल आणि माझ्याबद्दलदेखील अनेकदा चुकीचे बोलला आहे,' असे गोविंदाने स्पष्ट केले.

सलमान आणि केआरके यांच्यातील वाद काय माहीत नाही - गोविंदा

सलमान आणि केआरके यांच्यात सुरू असलेल्या वादाबद्दल काहीही माहीत नसल्याचे गोविंदाने म्हटले आहे. 'सलमान आणि केआरकेमध्ये कोणत्या कारणामुळे वाद सुरू आहे, याबद्दल मला काहीच माहित नाही. पण माझे नाव उगीच या भांडणात ओढले गेले आहे. असाच एक प्रयत्न चित्रपट समीक्षक कोमल नाहटानेदेखील केला होता. त्यावेळी कार्तिक आर्यनला काही चित्रपटातून बाहेर केले गेले होते आणि त्यात माझे नाव मध्ये घेतले गेले होते. मला वाटतं कोरोना महामारीमध्ये हा एक प्रकारचा अजेंडा झाला आहे. पण या दोन्ही प्रकरणाशी माझा तिळमात्रही संबंध नाही,' असे गोविंदाने म्हटले आहे.

2019 मध्ये केआरकेने गोविंदाविरोधात केले होते वक्तव्य
केआरकेने 2019 मध्ये गोविंदाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. 'गोविंदा हा त्याच्या काळातील सर्वात अनप्रोफेशनल अभिनेता होता. त्याने अनेक निर्मात्यांचे आर्थिक नुकसान केले. आता त्याच्याशी बॉलिवूडमधील कोणीच संपर्क साधू इच्छित नाही. जसे कर्म कराल, तसे फळ मिळेल,' असे केआरकेने गोविंदाबद्दल सोशल मीडियावर लिहिले होते.

सलमानने केआरकेविरोधात दाखल केला मानहानीचा दावा
सलमानच्या टीमने केआरके विरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. सलमान भ्रष्टाचारी आहे, आणि त्याचे ब्रँड ‘बिंग ह्युमन’ हे सगळ्यांची फसवणूक, हेराफेरी आणि ते मनी लॉंड्रींगच्या व्यवसायात गुंतले आहेत, असा आरोप केआरकेने केला. त्यामुळे त्याच्या विरोधात सलमानकडून मानहानीचा दावा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...