आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोविंदाने रणवीर सिंगसोबत केला धमाकेदार डान्स:सुनीता आहुजाच्या मागणीवर 'मैं तो रस्ते से जा रहा था'वर दिला जबरदस्त परफॉर्मन्स

11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेता गोविंदा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये ते रणवीर सिंगसोबत डान्स करताना दिसत आहेत. या दोघांनी नुकतीच दुबईतील पार पडलेल्या फिल्मफेअर अचिव्हर्स नाईट अवॉर्ड सोहळ्याला हजेरी लावली होती. या अवॉर्ड नाईटमध्ये अनेक सेलिब्रिटी पोहोचले होते. या शोमध्ये अनेक परफॉर्मन्स झाले असले तरी गोविंदा आणि रणवीरच्या डान्सने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.

गोविंदाची पत्नी सुनीताच्या खास मागणीवर दोघे एकत्र थिरकले
यादरम्यान दोघांनाही स्टेजवर एकत्र पाहून गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा म्हणाल्या, 'गोविंदा आणि रणवीर सिंग प्लीज एक परफॉर्मन्स होऊन जाऊ द्या.' सुनीता यांची खास मागणी ऐकून दोघांनीही 'कुली नंबर 1' चित्रपटातील 'मैं तो रस्ते से जा रहा था' या गाण्यावर परफॉर्मन्स दिला. तिथे उपस्थितांनी सगळ्यांनी टाळ्यांचा एकच कडकडाट केला. आता या व्हिडिओवर चाहत्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सगळेजण लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत.

यापूर्वी एकत्र केले परफॉर्म
रणवीर सिंग आणि गोविंदा याआधी 'द बिग पिक्चर'मध्ये 'यूपी वाला ठुमका' गाण्यावर एकत्र डान्स केला होता. रणवीर सिंग गोविंदा यांचा खूप मोठा चाहता आहे. त्यामुळे जेव्हा गोविंदा यांनी 'द बिग पिक्चर'मध्ये हजेरी लावली, तेव्हा रणवीरचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.

'किल दिल'मध्ये गोविंदा-रणवीर एकत्र दिसले होते

रणवीर शेवटचा 'जयेशभाई जोरदार'मध्ये दिसला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल दाखवू शकला नाही. दुसरीकडे, रणवीरच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचे झाले तर तो लवकरच 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'मध्ये दिसणार आहे. गोविंदा आणि रणवीर यांनी शाद अलीच्या 'किल दिल' या चित्रपटात एकत्र काम केले होते.

व्हिडिओ पाहण्यासाठी वरील कव्हर फोटोवर क्लिक करा...

बातम्या आणखी आहेत...