आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घराणेशाहीवरुन वादविवाद:गोविंदा म्हणाले - 'इंडस्ट्रीतील गटबाजी नाकारता येत नाही, आता चार ते पाच जण संपूर्ण बिझनेस चालवित आहेत'

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गोविंदा म्हणाले - मी वयाच्या 21 व्या वर्षी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले होते.

बॉलिवूडमधील घराणेशाहीवरुन सुरु असलेल्या वादात आता अभिनेता गोविंदा यांनीही उडी घेतली आहे. एका मुलाखतीत त्यांनी चित्रपटसृष्टीत स्थान मिळवण्याच्या आपल्या प्रवासाशी संबंधित काही गोष्टी शेअर केल्या आहेत.

हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत गोविंदा यांनी सांगितले की, आई निर्मला देवी आणि वडील अरुण कुमार आहुजा अभिनय क्षेत्रात असूनदेखील त्यांना इंडस्ट्रीत स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला होता. याबरोबरच त्यांनी बॉलिवूडमधील गटबाजीसंदर्भातही काही गोष्टीही शेअर केल्या.

  • चार ते पाच लोकांच्या नियंत्रणाखाली आहे इंडस्ट्री 

गोविंदा म्हणाले, 'इंडस्ट्रीतील गटबाजी नाकारता येत नाही. पूर्वी ज्या व्यक्तीत टॅलेंट असायचे, त्याला काम मिळत होते. थिएटरमध्ये प्रत्येक चित्रपटाला एक समान संधी होती. पण आता चार ते पाच जण संपूर्ण बिझनेस चालवित आहेत. जी व्यक्ती जवळची नाही, तिचा चित्रपट प्रदर्शित करावा की नाही हे ते ठरवतात. माझ्या काही चित्रपटांनाही रिलीज होण्याची संधी मिळाली नाही.'

  • तासन्तास प्रतीक्षा करावी लागायची

गोविंदा पुढे म्हणाले, 'मी वयाच्या 21 व्या वर्षी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले, त्याच्या खूप आधीच माझ्या आईवडिलांनी इंडस्ट्री सोडली होती. अशा परिस्थितीत जेव्हा मी इंडस्ट्रीत आलो तेव्हा माझे पालक कोण आहेत आणि माझी पार्श्वभूमी काय आहे हे बर्‍याच लोकांना माहित नव्हते. मला निर्मात्यांना भेटण्यासाठी तासन्तास थांबावे लागायचे.'

  • लोकांनी टीका केली होती 

गोविंदा यांना कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळातच यश मिळाले होते, पण बर्‍याच लोकांनी म्हटले की ते या इंडस्ट्रीत टिकू शकणार नाहीत. याविषयी गोविंदा म्हणाले, 'ही गोष्ट काही लोक माझ्या तोंडावर बोलले होते. पण मला माहित होते की राज कपूर, अमिताभ बच्चन, विनोद खन्ना आणि राजेश खन्ना हे कलाकारसुद्धा या काळातून गेले आहेत. इंडस्ट्रीमध्ये योग्य दृष्टीकोन असणे फार महत्वाचे आहे. एकतर तुम्ही कठोर परिश्रम करा किंवा लोक काय म्हणत आहेत याकडे लक्ष द्या.'

गोविंदा पुढे म्हणतात, "जेव्हा मी राजकारणात रुजू झालो, तेव्हा लोक म्हणाले की हा निर्णय माझ्यातील कलाकाराविरुद्ध जाईल, परंतु हे खरे ठरले नाही कारण राजकारणात आल्यानंतर मी जे चित्रपट केले, त्यांना यश मिळाले.'

बातम्या आणखी आहेत...