आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

किस्से:'जोरु का गुलाम'च्या रिलीजला 20 वर्षे पूर्ण,  दुपारी अडीचच्या शूटिंगला रात्री साडे आठला पोहोचला होता गोविंदा  

उमेश उपाध्याय. मुंबई10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चित्रपटाचे चित्रीकरण 34 दिवसांच्या विक्रमी वेळेत पूर्ण झाले होते.

गोविंदाचा 'जोरू का गुलाम’ चित्रपट 16 जून 2000 रोजी प्रदर्शित झाला होता. आज या चित्रपटाला 20 वर्षे पूर्ण झाली आहेत. या विशेष प्रसंगी दिग्दर्शक शकील नूराणी यांनी उमेश उपाध्याय यांना चित्रपट आणि गोविंदासंबंधी किस्से सांगितले.

  • गोविंदाच्या यशाच्या काळात त्याला साइन करणे सोपे होते

गोविंदा, कादर खान, जॉनी लिव्हर हे कलाकार आपल्या पीक टाइममध्ये बऱ्यापैकी व्यग्र होते. एकाच वेळी दोन शिफ्टमध्ये काम करायचे, परंतु त्या वेळी त्यांना एकत्र साइन करणे कठीण नव्हते. यामागचे कारण असे होते की ते सर्व एकाच वेळी काम करत होते, त्यानुसार त्यांच्या तारखा मिळत गेल्या. गोविंदा, त्यानंतर ट्विंकल खन्ना यांना "जोरू का गुलाम'साठी कास्ट केले होते. त्यानंतर जॉनी लिव्हर, कादर खान यांना घेण्यात आले. अली असगरने साकारलेल्या राजू पटेलच्या भूमिकेच्या निवडीत बऱ्याच अडचणी आल्या. वास्तविक, राजू पटेल यांना बरेच पर्याय होते. प्रथम सतीश कौशिकला घेण्याचा विचार होता, पण त्यांचे वय जास्त होते.

  • हा चित्रपट विक्रमी वेळेत तयार झाला होता

त्या वेळी गोविंदाचा कोणताही चित्रपट विक्रमी वेळेत बनलेला नाही, कारण 100-150 शिफ्ट रद्द करण्यात येत होत्या. म्हणून आम्ही धोरण केले की 80% चित्रीकरण हैदराबादच्या रामोजी राव स्टुडिओमध्ये आणि 20% चित्रीकरण मुंबईत केले जाईल. अशा प्रकारे त्याचे शूटिंग 34 दिवसांच्या विक्रमी वेळेत पूर्ण झाले.

  • दुपारी अडीचऐवजी रात्री साडे आठ वाजता

मुंबईतील एका बंगल्यात दुपारी 2 ते रात्री 10 या वेळेत शूटिंग होते. मला सांगितले गेले की गोविंदा दुपारी अडीच वाजता येईल. त्यानंतर कादर भाई, जॉनी लिव्हर, अशोक सराफ यांच्यासह सर्व कलाकार ठरलेल्या वेळेवर पोहोचले. आम्हाला वाटले की त्याचे एकल शूटिंग ठरवू. त्या वेळी आम्हाला दोन मोठे सीन शूट करायचे होते. गोविंदा त्या दिवशी दुपारी अडीचऐवजी रात्री साडेआठ वाजता आला. बरं, त्याला तातडीने तयार होण्यास सांगत, सीन आणि संवाद याबद्दल सांगितले गेले. पाच-सात मिनिटांत गोविंदा हातात एक डायलॉग शीट घेऊन आला आणि म्हणाला, "चला, मी तयार आहे.' गोविंदाने एक तासाच्या आत दोन मोठे सीन केले. चित्रपटगृहात या दोन्ही सीनवर बऱ्याच टाळ्या व शिट्ट्या आल्या.

  • टीम झोपली आणि सेटवर चीची आला

हैदराबादमध्ये शूटिंगचे शेवटचे 2 दिवस बाकी होते. गोविंदाला अ‍ॅड फिल्मच्या शूटिंगसाठी जायचे होते. मी त्याला म्हणालो, सकाळी सातच्या शिफ्टमध्ये आलास तर दुपारी 2  वाजेपर्यंत सोडता येईल. सकाळी 7 वा. शूटिंगला येईन, असे सांगून गोविंदा निघून गेला. मी प्रॉडक्शनच्या लोकांना सांगितले की शिफ्ट 7 ऐवजी सकाळी 9 वाजता ठेवा, कारण चीची येणार नाही. सकाळी मी झोपेत होतो तेव्हा असिस्टंटने सांगितले की चीची सेटवर पोहोचला. मी मास्टर गणेशला सांगितले तर ते म्हणू लागले- शेटजी, मी चीचीबरोबर दोनशेहून अधिक गाणी केली आहेत. तो सात वा. सेटवर पोहोचू शकत नाही.

बातम्या आणखी आहेत...