आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Entertainment
 • Bollywood
 • Grammy Awards 2022 Full List Of Winners: Indian Musicians Ricky Kej And Falu Also Win, Jon Batiste, Olivia Rodrigo, Silk Sonic Take Home Top Honours

ग्रॅमी अवॉर्ड्स 2022:ब्रुनो मार्सला 'लीव्ह द डोर ओपन' या गाण्यासाठी मिळाला 'साँग ऑफ द इयर' अवॉर्ड, सोहळ्याला ए.आर. रहमान यांची उपस्थिती

4 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • हा विजेत्यांची संपूर्ण यादी

रविवारी (3 मार्च) लास वेगासमधील एमजीएम ग्रँड गार्डन एरिना येथे संगीत क्षेत्रातील ऑस्कर म्हणून ओळखला जाणारा 64 वा ग्रॅमी पुरस्कार सोहळा पार पडला. आता ग्रॅमी पुरस्कार 2022 च्या विजेत्यांची संपूर्ण यादी देखील समोर आली आहे. विविध 28 कॅटेगरीत हा पुरस्कार देण्यात आला. लोकप्रिय अमेरिकन गायक ब्रुनो मार्सला त्याच्या 'लीव्ह द डोर ओपन' या गाण्यासाठी 'साँग ऑफ द इयर' श्रेणीचा पुरस्कार मिळाला. तर सिल्क सोनिकला 'लीव्ह द डोर ओपन'साठी 'रेकॉर्ड ऑफ द इयर' या पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याचबरोबर जॉन बॅटिस्टला 'वी आर'साठी 'अल्बम ऑफ द इयर'चा ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे.

भारतीय संगीतकार रिकी केज यांनी दुस-यांदा ग्रॅमी पुरस्कारावर मोहोर उमटवली. 'बेस्ट न्यू एज अल्बम' या श्रेणीत रिकी केज यांना हा पुरस्कार मिळाला आहे. रिकी व्यतिरिक्त भारतीय-अमेरिकन गायिका फाल्गुनी शाह हिलादेखील 'अ कलरफुल वर्ल्ड'साठी 'बेस्ट चिल्ड्रन्स म्युझिक अल्बम' श्रेणीत पुरस्कार मिळाला आहे.

अमेरिकन गायिका आणि गीतकार ऑलिव्हिया रॉड्रिगो हिने 'ड्रायव्हर्स लायसन्स'साठी बेस्ट पॉप सोलो न्यू आर्टिस्टचा ग्रॅमी पुरस्कार जिंकला आहे. ऑलिव्हियाचा हा पहिला ग्रॅमी पुरस्कार आहे. द वीकेंडसाठी कान्ये वेस्टला बेस्ट रॅप साँगचा पुरस्कार मिळाला आहे. या सोहळ्याला प्रसिद्ध संगीतकार ए.आर.रहमान यांनी त्यांच्या मुलासोबत हजेरी लावली होती.

ग्रॅमी पुरस्कार 2022 च्या विजेत्यांची संपूर्ण यादी -

 • अल्बम ऑफ द इयर - वी आर - जॉन बॅटिस्ट
 • साँग ऑफ द इयर - लीव्ह द डोअर ओपन
 • बेस्ट न्यू आर्टिस्ट- ऑलिव्हिया रोड्रिगो
 • बेस्ट रॉक अल्बम - फू फाइटर्स
 • बेस्ट म्यूजिक एडुकेटर- स्टीफन कॉक्स
 • प्रोड्यूसर ऑफ द इयर- जॅक एंटोनोफ
 • बेस्ट रॉक साँग- फू फाइटर्स
 • बेस्ट रॉक परफॉर्मन्स- फू फाइटर्स
 • बेस्ट कंट्री अल्बम- स्टार्टिंग ओवर
 • बेस्ट प्रोग्रेसिव अल्बम- लकी डे
 • बेस्ट रॅप साँग- केन्ये वेस्ट
 • बेस्ट कोरल परफॉर्मन्स- गुस्तावो डुडामेल, ग्रँटा गेशॉन, ल्यूक मॅकंडारफर
 • बेस्ट क्लासिकल कंटेम्पररी कम्पोजिशन- कॅरोलीन शॉ
 • बेस्ट पॉप सिंगर अल्बम- लव्ह फॉर सेल
 • बेस्ट पॉप सोलो परफॉर्मन्स- ओलिव्हिया रोड्रिगो
 • बेस्ट डान्स/इलेक्ट्रनिक रिकॉर्डिंग- रूफुज डू सोल
 • ट्रेडिशनल पॉप अल्बम- लव फॉर सेल
 • बेस्ट चिल्ड्रन अल्बम- फाल्गुनी शाह
बातम्या आणखी आहेत...