आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचा भावनिक संदेश:ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यादरम्यान झेलेन्स्कींनी दिला व्हिडिओ संदेश, म्हणाले - आम्ही आमच्या स्वातंत्र्यासाठी आवाज उठवत आहोत

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारतीय वेळेनुसार सकाळी 5.30 वाजता पार पडला सोहळा

64 वा ग्रॅमी पुरस्कार सोहळा लास वेगसमधील एमजीएम ग्रँड गार्डन एरिना येथे पार पडला. दरम्यान युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी या सोहळ्यात एका व्हिडिओद्वारे संदेश दिला. युक्रेनियन नागरिकांवरील अत्याचारासाठी त्यांनी रशियन नेत्यांना जबाबदार धरले.

युक्रेनच्या कीव शहराच्या आसपास नागरिकांचे मृतदेह रस्त्यावर पडले आहेत.
युक्रेनच्या कीव शहराच्या आसपास नागरिकांचे मृतदेह रस्त्यावर पडले आहेत.

आम्ही आमच्या स्वातंत्र्यासाठी आवाज उठवत आहोत
व्हिडिओ संदेशात झेलेन्स्की म्हणाले, "आमचे संगीतकार टक्सिडो (एक प्रकारचा सूट) ऐवजी बॉडी आर्मर (सैनिकांचा गणवेश) घालत आहेत. रुग्णालयात दाखल जखमींसाठी गाणी गात आहेत. अशा काही लोकांसाठीही ते गात आहेत, ज्यांना ते कधीही ऐकू शकले नाहीत. संगीताचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? उध्वस्त शहरांची शांतता आणि मृत पावलेले लोक. आम्ही आमच्या प्रेमाच्या, आवाज उठवण्याच्या आणि जगण्याच्या आमच्या स्वातंत्र्याचे रक्षण करत आहोत."

यूएनच्या अहवालानुसार युक्रेनमधील सुमारे 40 लाख नागरिकांनी आतापर्यंत देश सोडला आहे.
यूएनच्या अहवालानुसार युक्रेनमधील सुमारे 40 लाख नागरिकांनी आतापर्यंत देश सोडला आहे.

आम्हाला पाठिंबा द्या
राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की पुढे म्हणाले, 'आम्ही आमच्या भूमीवर रशियाशी लढत आहोत. ते त्यांच्या बॉम्बसह एक भयानक शांतता आणतात, जी मृत्यूने कवटाळलेली आहे. ही शांतता तुमच्या संगीताने भरुन काढा, याद्वारे आमची कहाणी सांगा. तुमच्या सोशल नेटवर्कवरून किंवा तुमच्या टीव्ही नेटवर्कवरून युद्धाचे सत्य सांगा. तुम्ही कोणत्याही प्रकारे आम्हाला पाठिंबा द्या, परंतु शांत बसू नका. तरच शांतता येईल. युद्धाने आमची सर्व शहरे उद्ध्वस्त केली आहेत.'

भारतीय वेळेनुसार सकाळी 5.30 वाजता पार पडला सोहळा

ग्रॅमी हा संगीत क्षेत्रातील सर्वात मोठा पुरस्कार मानला जातो. 28 श्रेणीमधील ग्रॅमी पुरस्कार या सोहळ्यात प्रदान करण्यात आले. 64 व्या ग्रॅमी पुरस्कारामधील बेस्ट न्यू आर्टिस्ट या श्रेणीमधील पुरस्कार हा ओलिविया रोड्रिगोला देण्यात आला, तर साँग ऑफ द इयर अवॉर्ड हा लीव द डोर ओपन या गाण्याने पटकवला आहे.

बातम्या आणखी आहेत...