आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'पठाण'च्या प्रमोशनदरम्यान गोंधळ:बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून थिएटरची तोडफोड, चित्रपट प्रदर्शित होऊ न देण्याचा इशारा

24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

'पठाण' या चित्रपटातील 'बेशरम रंग' या गाण्यावरून सुरू झालेला वाद थांबण्याचे नाव घेत नाहीये. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये बजरंग दलाचे कार्यकर्ते चित्रपटगृहाची तोडफोड करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ गुजरातमधील अहमदाबाद शहरातील आहे. बुधवारी येथे चित्रपटाचे प्रमोशन सुरू होते, मात्र त्याचवेळी येथे मोठा गोंधळ झाला. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मॉलमध्ये घुसून थिएटरची तोडफोड केली. यावेळी कार्यकर्त्यांनी पठाण चित्रपटाचे पोस्टर फाडले, तसेच चित्रपटगृह मालकांना चित्रपट प्रदर्शित न करण्याची धमकी दिली.

बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी 'पठाण' यांचे पोस्टर फाडले

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा व्हिडिओ अहमदाबादमधील अल्फा वन मॉलच्या मल्टिप्लेक्समधील आहे. रिलीजपूर्वी याठिकाणी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पोस्टर लावण्यात आले होते. ही बाब बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना समजताच ते तेथे पोहोचले. व्हायरल व्हिडिओमध्ये कार्यकर्ते 'पठाण'च्या पोस्टर फाडताना दिसत आहेत. तर थिएटरशी संबंधित लोक त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत आहेत.

पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर सोडून दिले
मीडिया रिपोर्ट्सनुसार, घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठले आणि मॉलमध्ये आंदोलन करणाऱ्या विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या 5 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले, परंतु नंतर त्यांना सोडून देण्यात आले.

गुजरातमध्ये कुठेही प्रदर्शित होऊ देणार नाही चित्रपट - विश्व हिंदू परिषद
विश्व हिंदू परिषदेने त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये बजरंग दलाचे कार्यकर्ते घोषणाबाजी करताना आणि मॉलमध्ये पोस्टर फाडताना दिसत आहेत. पठाणच्या गाण्यावरून झालेल्या वादानंतर विश्व हिंदू परिषदेने हा चित्रपट गुजरातमध्ये कुठेही प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी धमकी दिली होती.

विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते हितेंद्र सिंह राजपूत म्हणाले- 'आम्ही पठाणला कोणत्याही परिस्थितीत गुजरातमध्ये प्रदर्शित होऊ देणार नाही. थिएटर आणि मल्टिप्लेक्स मालकांनी पठाणच्या विरोधात होणारे आंदोलनाकडे इशारा म्हणून बघायला हवे,' असे ते म्हणाले होते.

  • 'पठाण' वादावर सेन्सॉर बोर्डाचा मोठा निर्णय:10 सीन्स आणि काही डायलॉग्स बदलण्याचे आदेश, 25 जानेवारीला प्रदर्शित होणार चित्रपट

शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण स्टारर 'पठाण' हा चित्रपट रिलीजपूर्वीच वादात सापडला आहे. वाढत्या वादाच्या पार्श्वभूमीवर सेन्सॉर बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) ने या चित्रपटातील सुमारे 10 दृश्ये बदलण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय काही संवादही बदलण्यात आले आहेत। खरं तर जेव्हापासून या चित्रपटाचा टिझर आणि पहिले गाणे गाणे रिलीज झाले तेव्हापासून या चित्रपटावरुन बराच गदारोळ सुरू झाला आहे. 'बेशरम रंग' या गाण्याच्या बोलांवर तर काहींनी दीपिका पदुकोणच्या बिकिनीच्या रंगाच्या बिकिनीवरुन आक्षेप घेतला. या वादांमुळेच सेन्सॉर बोर्डाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. वाचा सविस्तर...

  • 10 जानेवारीला येणार 'पठाण'चा बहुप्रतिक्षित ट्रेलर:निर्मात्यांनी बनवली खास स्ट्रॅटेजी, चित्रपटाच्या शीर्षकात कोणताही बदल होणार नाही

शाहरुख खानच्या बहुप्रतिक्षित ‘पठाण’ या चित्रपटाचा ट्रेलरची प्रतिक्षा आता लवकरच संपणार आहे. येत्या 10 जानेवारीला चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार 'पठाण'चा ट्रेलर 2 मिनिटे 37 सेकंदांचा असणार आहे. ट्रेलरमध्ये अॅक्शन सीक्वेन्स, म्युझिक आणि हिरोइझमचा परिपूर्ण मसाला असेल असे सांगण्यात येत आहे. ट्रेलरमध्ये शाहरुख खान आणि जॉन अब्राहम यांच्यात टक्कर पाहायला मिळेल असा अंदाज वर्तवला जातोय. वाचा सविस्तर...

बातम्या आणखी आहेत...