आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुव्ही रिव्ह्यू:'जाने भी दो यारो'च्या धर्तीवर बनला आहे 'गुलाबो सीताबो', मिर्झाच्या भूमिकेत अमिताभ आणि बाकेच्या भूमिकेत आयुष्मान छा गये 

मुंबई9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या चित्रपटाच्या निमित्ताने बिग बी आणि आयुषमान खुराणा यांनी पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर केली असून या जोडीने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली.
रेटिंग   3.5/5
कलाकार    अमिताभ बच्चन, आयुष्मान खुराणा, विजय राज, बिजेंद्र काला
दिग्दर्शक    शुजित सरकार
निर्माते    रॉनी लाहिडी, शील कुमार
संगीतकार  शांतनु मोइत्रा, अभिषेक अरोरा आणि अनुज गर्ग
श्रेणी    कॉमेडी ड्रामा
कालावधी2 तास 4 मिनिटे

ओटीटी प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर अमिताभ बच्चन आणि आयुष्मान खुराणा स्टारर फिल्म 'गुलाबो सीताबो'चा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर आहे. कुंदन शाह यांच्या 'जाने भी दो यारो', सई परांजपे यांच्या 'कथा' आणि हृषिकेश मुखर्जी व बासु चटर्जी यांच्या परंपरेतील हा चित्रपट आहे. 

  • चित्रपटाची कहाणी

दिग्दर्शक शुजित सरकार यांनी यावेळी सोशळ सटायरवर आपला हात आजमावला आहे. लखनौच्या पार्श्वभूमीवर त्यांनी अशी काही पात्रं दाखवली आहेत ज्यांच्या समस्या पाहून हसण्याची आणि रडण्याची भावना एकत्र येते. लखनौच्या भागात ही कहाणी सेट केली गेली आहे जिथे एकेकाळी नवाबी थाटबाट असायचा. आता मात्र येथे फक्त भग्न अवशेष आहेत, ज्यावर सरकार, तेथे राहणारे भाडेकरु आणि सिस्टमची नजर आहे. 

अशीच एक हवेली आहे फातिमा महल. या हवेलीत मिर्झा (अमिताभ बच्चन) त्यांच्यापेक्षा वयाने 17 वर्षांनी मोठ्या पत्नी (फातिमा) सोबत वास्तव्याला आहेत. त्यांच्या हवेलीत काही भाडेकरु राहातात. पण ते अतिशय कमी भाडे असूनदेखील देत नसतात. बाके (आयुष्मान खुराणा) हा त्यांचा भाडेकरी आहे, जो आपली बहीण गुड्डू आणि आईसोबत राहतो. महिन्याकाठी 30 रुपये भाडे देण्यासही त्याला अडचण येते. यामुळे मिर्झा आणि त्याचे अजिबात पटत नाही. मिर्झा यांच्याकडे घर चालवायला पैसे नसल्याने ते घरातील एक एक वस्तू विकत असतात. त्यांची ही गोष्ट त्यांच्या पत्नीला अजिबात आवडत नाही. 

नंतर अशी काही परिस्थिती निर्माण होते की, पुरातत्व विभागाचा अधिकारी शुक्ला ही हवेली ताब्यात घेण्याची धमकी देतो. तर बाके आणि इतर भाडेकरु त्यांना कायमस्वरुपी चांगली घर मिळावे यसााठी हवेली खूप जुनी असल्याचे पुरातत्व विभागाला पटवण्याचा प्रयत्न करत असतात. तर दुसरीकडे मिर्झा स्वत: त्यांच्या पत्नीच्या मृत्यूची वाट पाहत असतात, जेणेकरुन फातिमा महल त्यांच्या नावी होईल. ते आपल्या पत्नीला हवेली विकण्यासाठी गळ देखील घालतात. त्यांना मदत करण्यासाठी एक वकील देखील आहे. 

  • ... आणि शेवटी प्रेक्षकांना मिळतो झटका

ही हवेली विकण्यासाठी मिर्झा यांची पत्नी तयार होते का, बाकेसह इतर भाडेकरुंचे काय होते, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळण्याची प्रेक्षक वाट बघत असतानाचा शेवट सगळ्यांना एक झटका देऊन जाणारा आहे. दिग्दर्शकाने शेवट अतिशय रंजक केला आहे. 

  • अमिताभ, आयुष्मान आणि शुजित यांचे दमदार काम

संपूर्ण चित्रपट मिर्झा आणि बाके यांच्या तू तू मैं मैं भोवती फिरतो. अमिताभ आणि आयुष्मान यांनी त्यांच्या पात्राला शंभर टक्के न्याय दिला आहे. प्रोस्थेटिक मेकअपमुळे अमिताभ बच्चन यांची व्यक्तिरेखा अतिशय वेगळी झाली आहे. शिवाय भूमिकेसाठी अमिताभ यांनी आवाज देखील खूप वेगळा काढला आहे. त्यांना आयुष्मानने चांगली साथ दिली आहे. सोबतच विजय राज, बिजेंद्र काला यांच्या भूमिकाही लक्षात राहतात. दिग्दर्शक शुजित सरकार यांनी चित्रपटाची कथा खूप चांगल्याप्रकारे मांडली आहे. हा चित्रपट प्रेक्षकांचे नक्कीच मनोरंजन करणारा आहे.     

बातम्या आणखी आहेत...