ट्रेलर / घरमालक मिर्झा आणि भाडेकरु बांकेच्या तू-तू, मैं-मैंने सजला आहे 'गुलाबो सिताबो', बघा 2:41 मिनिटांचा भन्नाट ट्रेलर

  • येत्या 12 जून रोजी चित्रपटाचा प्रीमियर होणार आहे

दिव्य मराठी

May 22,2020 08:08:00 PM IST

मुंबई. महानायक अमिताभ बच्चन आणि आयुष्मान खुराना यांच्या बहुप्रतिक्षित 'गुलाबो सीताबो' या चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला आहे. 2 मिनिटे 41 सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये घरमालक आणि भाडेकरू यांच्यातली तू तू मैं मैं लक्ष वेधून घेते. बिग बींनी हवेलीचे मालक मिर्झाची भूमिका साकारली आहे, तर आयुष्मान त्यांचा भाडेकरु असून त्याचे नाव बांके आहे.

  • कहाणीला इमोशनल अँगल

ट्रेलरमध्ये मिर्झा फातिमा महल नावाच्या हवेलीचे मालक असल्याचे समजते, तर बांके त्यांचा भाडेकरु आहे. बांकेला हवेली सोडायची नाही, तर मिर्झा यांना काहीही करुन बांकेकडून घर खाली करुन घ्यायचे आहे. याचेच मजेशीर चित्रण यात करण्यात आले आहे. कथेत भावनिक बाजुही बघायला मिळतेय. मिर्झा यांना स्वतःचे मुल नाही आणि बांकेचे वडील नाहीत. त्यामुळे या दोघांचे नाते कसे फुलत जाणार हे चित्रपट रिलीज झाल्यानंतरच प्रेक्षकांना समजणार आहे.

  • अमिताभ-आयुष्मान यांनी त्यांच्या व्यक्तिरेखेची ओळख करुन दिली

ट्विटरवर ट्रेलर शेअर करताना अमिताभ बच्चन यांनी लिहिले की, "मिर्झाला भेटा, जो त्याच्या वाड्याच्या प्रेमात आहे." त्याचवेळी आयुष्मानने आपल्या व्यक्तिरेखेची ओळख करून दिली आहे. त्याने लिहिले आहे, "भेटा बांकेला. शहाणपणा याच्यापासूनच सुरु होतो."

  • 12 जून रोजी होणार आहे प्रीमियर

शुजित सरकार दिग्दर्शित 'गुलाबो सीताबो' हा चित्रपट लॉकडाऊनमुळे अॅमेझॉन या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात येणार असून येत्या 12 जून रोजी चित्रपटाचा प्रीमियर होणार आहे. 200 देशांमध्ये चित्रपट प्रदर्शित होईल. आपल्या ट्विटर हँडलवरून शुजित यांनी या चित्रपटाला जीवनावरील एक व्यंग म्हटले आहे.

X