आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इंटरव्यू:'या' दिवशी टीव्हीवर रिलीज होतोय गुलशन-सागरिकाचा 'फूटफेअरी' हा चित्रपट, गुलशन म्हणाला- ‘आऊटसायडरसाठी स्वत:ला सिद्ध करून दाखवणे अवघड असते’

उमेश कुमार उपाध्याय. मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ‘फूटफेअरी’ हा चित्रपट अँड पिक्चरवर रिलीज होणार आहे.

‘शैतान’, ‘हेट स्टोरी’, ‘गोलियों की रासलीला-रामलीला’, ‘ए डेथ इन द गंज’, ‘मर्द को दर्द नहीं होता’, ‘कमांडो- 3’ सारख्या चित्रपटांबरेाबरच वेब सिरीज 'घोस्ट'मधून आपल्या अभिनयाची छाप पाडणारा अभिनेता गुलशन देवैयाचा आगामी चित्रपट 24 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. ‘फूटफेअरी’ हा चित्रपट अँड पिक्चरवर रिलीज होणार आहे. यात त्याने सीबीआय अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. गुलशन देवैयासोबत झालेल्या मुलाखतीचा एक भाग ...

  • तुमचा चित्रपट ‘फूटफेअरी’ चित्रपटगृहाऐवजी थेट टीव्हीवर रिलीज होणार आहे, कसं वाटतंय ?

पडद्यावर चित्रपट पाहतच मोठे झालो आहे मात्र आता काळ बदलला आहे. टीव्हीवर देखील याच परिणाम जाणवतो आहे. अँड पिक्चरचा हा खूपच चांगला विचार आहे. निर्माते आता चित्रपटगृहाबरोबरच ओटीटी प्लॅटफॉर्म आणि टीव्हीसाठी देखील चित्रपट बनवत आहेत. प्रेक्षकांसाठी हा विचार खूपच चांगली आहे, असे मला वाटत आहे. कारण त्यांना व्हरायटी पहायला मिळेल. शिवाय जे लोक आपले चित्रपट सिनेमागृहापर्यंत घेऊ जाऊ शकत नाहीत, त्यांच्यासाठीदेखील हे चांगले आहे. स्पर्धा वाढेल आणि कंटेंटही चांगले पाहायला मिळेल.

  • पहिल्यांदाच सीबीआय अधिकाऱ्याची भूमिका करतोय ? कसा अनुभव होता ?

अभिनेत्री सागरिका घाटगेसोबत सराव केला हाेता त्यामुळे सर्व काही व्यवस्थित झाले. दिग्दर्शक कनिष्क वर्मा पहिल्यांदाच चित्रपट बनवत आहेत. पहिलाच चित्रपट होता, तरीदेखील त्यांची तयारी पाहुन वाटले नाही. माझे शूटिंग शे‌ड्यूल दहा दिवसाचे होते मात्र मी सहा दिवसात काम पूर्ण केले. दोन महिन्यात चर्चा, वाचन, सराव सर्व काही करुन घेतले होते. अशा प्रकारे सर्वच अनुभव खूपच चांगला हाेता.

  • सेटवरील काही मजेदार किस्सा सांग ?

मढ आयलँडमध्ये कब्रस्तानचा सेट लागला हाेता. आम्ही तेथे रात्री शूटिंग करत होतो. एक दिवस रात्री भूत सारखं कोणीतरी येताना दिसलं. प्रॉडक्शनच्या टीमनेच एका माणसाला भूताचा मेकअप करुन पांढऱ्या बेड शीटमध्ये यायचे सांगितले होते.

  • दीपिका पदुकोण आणि ऋचा चड्ढासोबत काम केले. सध्या यांचे नाव कोर्ट-कचेरीपर्यंत पोहोचले, यावर काय सांगशील ?

ऋचा चड्ढा सारखी अभिनेत्री माझी मैत्रीण असल्याचा मला अभिमान आहे. तिने ज्या प्रकारे सत्याचा सामना केला, ते योग्य आहे. ती कोर्टात गेली. मेहनतीने नाव आणि पैसा कमवला, ते नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात होता, त्यामुळे ती सशक्तपणे लढा देत आहे. दीपिकासोबत ‘रामलीला’मध्ये काम केले आहे. तिच्यासोबत काम करण्याचा अनुभव चांगला होता. तिच्याविषयी मला काहीच माहीत नाही, त्यामुळे कोणतीही टिप्पणी करणे किंवा काही सांगायला अर्थ नाही.

  • बॉलिवूडमधील घराणेशाहीवर काय सांगशील ?

खरं, सांगायचं झालं तर आम्हा आऊटसायडरला स्वत:ला सिद्ध करुन दाखवणे अवघड असते. आम्हाला इतरांपेक्षा पाच पट जास्त मेहनत करावी लागते. एकदा-दोनदा संधी मिळते मात्र त्यानंतर काहीच नाही. त्यातच सिद्ध करुन दाखवावे लागते. आज मी जर मोठा स्टार झालो उद्या माझे मुले इंडस्ट्रीत आले तर त्यांना मी सपोर्ट तर करणारच. त्यामुळे काही म्हणणे चुकीचे ठरेल.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser