आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'ब्लर':तापसी पन्नूसोबत पहिल्यांदा स्क्रिन स्पेस शेअर करताना अभिनेता गुलशन देवैया, 'ब्लर'मधील भूमिकेबद्दल म्हणाला...

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चित्रपट 2022 मध्ये प्रदर्शित होणार आहे.

तापसी पन्नू झी स्टूडियोच्या सहयोगाने आपल्या प्रोडक्शन बॅनर आउटसाइडर फिल्म्स अंतर्गत आपला पहिला चित्रपट 'ब्लर' सादर करण्यास पूर्णपणे सज्ज आहे. अजय बहल दिग्दर्शित या चित्रपटात तापसी पन्नू आणि गुलशन देवैया मुख्य भूमिकेत असणार आहेत. गुलशन देवैयाने याआधीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तो या साइकोलॉजिकल थ्रिलरमध्ये तापसीच्या नवऱ्याच्या भूमिकेत आहे.

गुलशनची चित्रपटातील भूमिका काय आहे?

आपली व्यक्तिरेखा नीलबाबत बोलताना गुलशन म्हणाला,“मी गायत्रीचा नवरा नीलची व्यक्तिरेखा साकारतो आहे, जो खूप चांगला, समजूतदार व्यक्ती आहे, मात्र आतून दुखी आणि अपूर्ण आहे. त्या दोघांचे एकमेकांवर प्रेम आहे मात्र त्यांच्या नात्यातील तणाव उघडपणे दिसून येतो.”

व्यक्तिरेखेच्या विशेषतांविषयी बोलताना, तो म्हणतो, "नील एका चांगल्या समृद्ध कुटुंबातून आहे आणि खरं पाहिल्यास त्याला जगण्यासाठी काम करण्याची आवश्यकता नाही आहे आणि त्याने आपल्या पॅशनेट पत्नी गायत्रीसाठी सहायक स्थितीत आहे, जी मानववंश शास्त्रज्ञ आहे आणि आपल्या कामासाठी पूर्णपणे समर्पित आहे."

कसा होता गुलशनचा सेटवरचा अनुभव?

तापसीसोबत सेटवरच्या अनुभवांविषयी बोलताना गुलशनने सांगितले, "माझ्या अविस्मरणीय अनुभवांपैकी ब्लरच्या सेटवरचे अनुभव आहेत. तापसीसोबत काम करताना खूप मजा येते, मी तिच्यासोबत मिळून प्रैंक्स करत होतो आणि टीममध्ये खूप मजेदार गोष्टी घडत होत्या. सेट तेव्हा एक अशी उत्तम जागा आहे जेव्हा तुम्ही एक अशा प्रेमळ टीमसोबत काम करत असता."

नैनीतालमध्ये झाले चित्रीकरण

चित्रपटाला नैनीतालमध्ये चित्रित करण्यात आले आहे ज्याची कथा पवन सोनी आणि अजय बहल यांच्याद्वारे लिहिण्यात आली आहे. ही एका अपरिहार्य परिस्थितित अडकलेल्या मुलीची कहाणी आहे जी रोमांच आणि नाट्याने भरपूर आहे. झी स्टूडियोज, तापसी पन्नूची 'आउटसाइडर फिल्म्स' आणि इकोलोन प्रोडक्शंसची 'ब्लर' आपल्या अंगावर काटा आणेल. चित्रपट 2022 मध्ये प्रदर्शित होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...