आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बॅडमन'ची अपील:धोनीमुळे गुलशन ग्रोव्हर धास्तावले, म्हणाले - 'माही डॉनच्या भूमिकेसाठी ऑफर आली तर ती स्वीकारु नकोस, माझ्या व्यवसायावर लाथ मारु नकोस'

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गुलशन ग्रोव्हर म्हणाले - माही माझ्या व्यवसायावर लाथ मारु नकोस

बॉलिवूडमध्ये 'बॅडमॅन' म्हणून प्रसिद्ध असलेले अभिनेते गुलशन ग्रोव्हर यांच्या एका सोशल मीडिया पोस्टने सध्या सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. कॅप्टन कूल म्हणून प्रसिद्ध असलेला भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीला उद्देशून गुलशन यांनी एक ट्वीट केले आहे. सोबतच त्यांनी धोनीचा नव्या लूकमधील फोटोदेखील शेअर केला आहे. धोनीने केलेली नवीन हेअरस्टाइल सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. गुलशन ग्रोव्हर यांनी माहीच्या या नव्या लूकचे कौतुक केले, पण सोबतच त्याला एक विनंतीदेखील केली आहे.

गुलशन ग्रोव्हर म्हणाले - माही माझ्या व्यवसायावर लाथ मारु नकोस
गुलशन ग्रोव्हर यांनी एमएस धोनीच्या लूकचे कौतुक करताना एक मजेशीर कमेंट केली आहे. धोनीला टॅग करत गुलशन ग्रोव्हर यांनी लिहिले, ‘माही खूप छान लूक आहे. कृपया डॉनच्या भूमिकेसाठी ऑफर आली तर ती स्वीकारु नकोस. माझ्या व्यवसायावर लाथ मारु नकोस. पहिलेच माझे 3 भाऊ संजय दत्त, सुनील शेट्टी आणि जॅकी श्रॉफ ते करत आहेत जेणेकरुन मी बाहेर पडावे. आलिम हाकिम तुझ्याकडे बॅडमॅन येत आहे,’ या आशयाची पोस्ट त्यांनी टाकली आहे. आता बॅड मॅनच्या पोस्टवर धोनी काय प्रतिक्रिया देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. धोनीच्या फॉक्स हॉक हेअरस्टाइलचे हे फोटो हेअर स्टाइलिस्ट अलीम हकीम यांनी शेअर केले आहेत.

फराह देखील झाली माहीची फॅन
अलीकडेच नृत्यदिग्दर्शिका-दिग्दर्शिका फराह खानने धोनीसोबतचा एका जाहिरातीच्या शूटिंगचा अनुभव शेअर केला होता. ती म्हणाली होती की, धोनी खूप नम्र आणि प्रेमळ व्यक्ती आहे. मी त्याला पहिल्यांदा भेटत आहे. तो किती वेगळा आहे हे मी तुम्हाला सांगू शकत नाही. अतिशय डाउन टू अर्थ व्यक्ती आहे. शूटिंग दरम्यान आम्हाला त्याला पाच वेळा कपडे बदलायला सांगावे लागले आणि त्याने तक्रार न करता काम केले. त्याच्यासोबत काम करणे खूप आनंददायी होते, असे फराह म्हणाली होती.

बातम्या आणखी आहेत...