आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बर्थ अ‍ॅनिव्हर्सरी:कधी वडिलांसोबत ज्यूस विकायचे गुलशन कुमार, कॅसेट्स विकून उभी केली कोट्यवधींची इंडस्ट्री, मात्र अंडरवर्ल्डने केली हत्या

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आता गुलशन कुमार यांचा मुलगा सांभाळतो काम

टी सीरिज या म्युझिक कंपनीचे मालक गुलशन कुमार यांची 5 मे रोजी जयंती आहे. त्यांचा जन्म 1956 मध्ये एका पंजाबी कुटुंबात झाला होता. दिल्लीतील देशबंधू कॉलेजमधून त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले होते. त्यांचे वडील चंद्रभान दुआ हे दिल्लीतील दरियागंज येथे ज्यूस विक्री करत होते.

लहानपणी गुलशकुमार वडिलांच्या दुकानावर ज्यूस विक्रीत त्यांना मदत करत होते. दरम्यान त्यांच्या वडिलांनी आणखी एक दुकान घेतले आणि तिथे त्यांनी रेकॉर्डर्स आणि ऑडिओ कॅसेट विक्री सुरु केली. गुलशन यांचादेखील या कामात रस वाढला. त्यानंतर पुढे त्यांनी नोएडा येथे स्वतःची कंपनी सुरु केली आणि म्युझिक इंडस्ट्रीमध्ये स्वतःची वेगळी छाप निर्माण केली. गुलशन कुमारांनी त्यांच्या कॅसेट बिझनेसला 'सुपर कॅसेट इंडस्ट्रीज लिमिटेड' हे नाव दिले. याच कंपनीला टी-सीरीज नावानेही ओळखले जाते. गुलशन कुमारांनी ओरिजनल गाणी दुसऱ्या गायकांच्या आवाजात रेकॉर्ड करुन त्या कॅसेट कमी किंमतीत विक्री करण्यास सुरुवात केली होती. इतर कंपन्यांच्या कॅसेट 28 रुपयांमध्ये मिळत असताना, त्याचवेळी 15 ते 18 रुपयात टी-सीरीजची कॅसेट देण्याची किमया त्यांनी केली होती.

त्याचवेळी त्यांनी भक्ती संगीताकडेही मोर्चा वळवला. देवा-धर्माची गाणी रेकॉर्ड करुन ती त्यांनी प्रसिद्ध केली. काही गाणी ते स्वतः गात होते. 70 च्या दशकात गुलशन कुमार यांच्या कॅसेटची डिमांड वाढत गेली आणि म्यूझिक इंडस्ट्रीमध्ये ते यशस्वी झाले. बिझनेस वाढता बघून गुलशन यांनी मुंबईत स्थायिक होण्याचा विचार केला.

मुंबईत आल्यानंतर बदलले नशीब
ऑडिओ कॅसेट्समध्ये यशस्वी झाल्यानंतर गुलशन कुमार फिल्म इंडस्ट्रीकडे वळले आणि त्यासाठी ते मुंबईला पोहोचले. बॉलिवूडमध्ये बस्तान बसविल्यानंतर ते हिंदू पौराणिक कथांवर आधारित चित्रपट आणि सीरियल्स देखील प्रोड्यूस करु लागले. त्यांनी 15 हून अधिक चित्रपटांची निर्मिती केली तर 'बेवफा सनम' या चित्रपटाचे दिग्दर्शनही त्यांनी केले. त्यांची निर्मिती असलेला पहिला चित्रपट 1989 मध्ये आलेला 'लाल दुपट्टा मलमल का' हा होता. मात्र त्यांना खरी ओळख मिळवून दिली ती 1990 मध्ये आलेल्या 'आशिकी' या चित्रपटाने.

1997 मध्ये गुलशन कुमार यांची गोळी झाडून केली होती हत्या

12 ऑगस्ट 1997 ला मुंबईतील अंधेरी भागातील जीतेश्वर महादेव मंदिरा बाहेर गुलशन यांची गोळ्या मारुन हत्या करण्यात आली होती. अबु सलेमने गुलशन कुमार यांना दर महिन्याला 5 लाख रुपये द्यायला सांगितले होते. मात्र गुलशन यांनी यासाठी नकार दिला होता. एवढ्या पैशांत वैष्णो देवीचा भंडारा करेल, असे त्यांनी अबु सलेमला म्हटले होते. यामुळे नाराज झालेल्या सलेमने शूटर राजाच्या मदतीने गुलशन कुमार यांनी दिवसाढवळ्या हत्या केली होती.

आता गुलशन कुमार यांचा मुलगा सांभाळतो काम
गुलशन कुमार यांची हत्या झाली त्यावेळी ते संगीत क्षेत्रातील इंटरनॅशनल ब्रॅण्ड बनले होते. टी-सीरिज या कंपनीचे नाव आघाडीच्या म्युझिक कंपनीत गणले जाऊ लागले होते. रिपोर्ट्सनुसार, टी-सीरिजचा बिझनेस 24 देश तसेच 6 खंडांमध्ये पसरला आहे. सध्या टी-सीरिज कंपनीचे काम गुलशन कुमार यांचा मुलगा भूषण कुमार सांभाळत आहे. टी-सीरिज या कंपनी अंतर्गत अनेक सुपरहिट चित्रपटांची निर्मिती करण्यात आली आहे. कंपनीने 'रेडी' (2011), 'आशिकी 2' (2013), 'हेट स्टोरी 4' (2014), 'बेबी' (2015), 'भाग जॉनी' (2015), 'एयरलिफ्ट' (2016), 'बादशाहो' (2017) सह अन्य चित्रपटांची निर्मिती केली आहे.

बातम्या आणखी आहेत...