आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बर्थ अ‍ॅनेव्हर्सरी:एकेकाळी ज्यूसच्या दुकानावर काम करायचे गुलशन कुमार; खंडणी न मिळाल्याने अंडरवर्ल्डने घडवली हत्या

24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

टी-सिरीजचे संस्थापक गुलशन कुमार यांची आज म्हणजेच 5 मे रोजीचा जन्म आहे. एका छोट्या म्युझिक कॅसेट कंपनीतून बिझनेस सुरू करणाऱ्या गुलशन कुमार यांनी संगीत विश्वात आपले वेगळे स्थान निर्माण केले होते.

त्यांना कॅसेट किंग असेही म्हटले जाते

गुलशन कुमार यांचा जन्म दिल्लीत एका पंजाबी कुटुंबात 5 मे 1956 रोजी झाला. गुलशन यांनी दिल्लीतील देशबंधू कॉलेजमधून त्यांचे ग्रॅज्युएशन पूर्ण केले. त्यांचे वडील चंद्रभान यांचे दिल्लीतील दर्यागंज भागात ज्यूसचे दुकान होते, तिथे गुलशन त्यांच्यासोबत काम करायचे. काही दिवस ज्यूसच्या दुकानात काम करताना त्यांचे मन भरून आले. काही दिवसांनी त्यांच्या वडिलांनी दुसरे दुकान घेतले ज्यात स्वस्त कॅसेट आणि गाणी रेकॉर्ड करून विकली जात होती. येथूनच गुलशन कुमार यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली.

गुलशन यांनी सुपर कॅसेट इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी स्थापन केली जी भारतातील सर्वात मोठी संगीत कंपनी बनली आणि कॅसेट किंग म्हणून ओळखली जाऊ लागली. या म्युझिक कंपनीअंतर्गत त्यांनी टी-सिरीजची स्थापना केली. गुलशनने नोएडामध्ये एक प्रॉडक्शन कंपनी उघडली. हळूहळू भक्तिगीते आणि भजने गायल्यामुळे ते लोकप्रिय झाले. आपला व्यवसाय वाढत असल्याचे पाहून गुलशन नंतर मुंबईमध्ये स्थायिक झाले.

मुंबईत स्थायिक झाल्याने बदलले नशीब

मुंबईत आल्यानंतर गुलशनचे नशीब बदलले. त्यांनी 15 हून अधिक चित्रपटांची निर्मिती केली, ज्यामध्ये त्यांनी 'बेवफा सनम' चित्रपटाचे दिग्दर्शनही केले. 1989 मध्ये 'लाल दुपट्टा मलमल का' हा त्यांचा पहिला चित्रपट निर्मित केला होता. पण त्यांना खरी ओळख मिळाली ती 1990 मध्ये आलेल्या 'आशिकी' या चित्रपटातून.

अवघ्या 10 वर्षांत गुलशन कुमार यांनी टी-सीरीजचा व्यवसाय 350 दशलक्षपर्यंत नेला. गुलशन कुमार यांनी सोनू निगम, अनुराधा पौडवाल, कुमार सानू यांसारख्या अनेक गायकांना लॉन्च केले. 1992 मध्ये गुलशन कुमार भारतातील सर्वाधिक कर भरणारे व्यक्तिमत्त्व ठरले.

अंडरवर्ल्ड मागत होते पैसे
एकदा अबू सालेमने गुलशन कुमार यांना दरमहा 5 लाख रुपये देण्यास सांगितले, तेव्हा गुलशन कुमार यांनी नकार दिला आणि म्हटले की, ते इतके पैसे देऊन वैष्णोदेवीमध्ये भंडारा आयोजित करणार. तेव्हापासून ते अंडरवर्ल्डच्या निशाण्यावर होते.

गुलशन कुमार रोज मंदिरात आरती करत असत. 12 ऑगस्ट रोजी सकाळी ठीक 10:40 वाजता त्यांनी मंदिरातील पूजा उरकली आणि ते त्यांच्या गाडीच्या दिशेने निघाले, तेवढ्यात एक लांब केस असलेला अज्ञात व्यक्ती त्यांच्या जवळ येऊन उभा राहिला आणि तो ओरडून म्हणाला - खूप केला देवधर्म, खूप केली पूजा, आता वर जा आणि पूजा कर. यानंतर तेथे उपस्थित असलेल्या इतर दोन अज्ञातांनी त्यांच्यावर 16 गोळ्या झाडल्या. त्यांच्या ड्रायव्हरने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला असता शूटर्सनी त्याच्यावरही गोळी झाडली. गुलशन कुमार यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाला होता.

गुलशन कुमार यांचा मुलगा सांभाळतोय काम

गुलशन यांची हत्या झाली तेव्हा ते संगीतविश्वात आंतरराष्ट्रीय ब्रँड बनले होते, टी-सिरीजचे नावदेखील टॉप म्युझिक कंपन्यांमध्ये येऊ लागले होते. अहवालानुसार, टी-सिरीजचा व्यवसाय 24 देशांमध्ये तसेच 6 महाद्वीपांमध्ये पसरलेला आहे. सध्या टी-सिरीज कंपनी गुलशन कुमार यांचा मुलगा भूषण कुमार सांभाळत आहे. कंपनीअंतर्गत अनेक सुपरहिट चित्रपटांची निर्मितीदेखील झाली आहे. कंपनीने 'रेडी' (2011), 'आशिकी 2' (2013), 'हेट स्टोरी 4' (2014), 'बेबी' (2015), 'भाग जॉनी' (2015), 'एअरलिफ्ट' (2016), ' बादशाहो' (2017) अशा अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे.

बातम्या आणखी आहेत...