आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुंजन सक्सेना चित्रपटावरील वाद:सेवानिवृत्त फ्लाइट लेफ्टनंट गुंजन सक्सेना उच्च न्यायालयात म्हणाल्या - सैन्यात जेंडरवरुन माझ्याशी कधीही भेदभाव केला गेला नाही

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
12 ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या 'गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल' या चित्रपटात भारतीय वायूसेनेत जेंडरवरुन गुंजन यांच्यासोबत भेदभाव झाल्याचे दाखवले गेले.  - Divya Marathi
12 ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या 'गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल' या चित्रपटात भारतीय वायूसेनेत जेंडरवरुन गुंजन यांच्यासोबत भेदभाव झाल्याचे दाखवले गेले. 
  • या चित्रपटात भारतीय वायूसेनेची चुकीची प्रतिमा साकारण्यात आल्याचा आरोप धर्मा प्रॉडक्शनवर आहे
  • या चित्रपटाविरोधात केंद्र सरकारने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

'गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल' या चित्रपटाविरोधात केंद्र सरकारने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून त्यावर सुनावणी झाली. या चित्रपटावर भारतीय वायूसेनेची चुकीची प्रतिमा दाखवल्याचा आरोप आहे. आता निवृत्त फ्लाइट लेफ्टनंट गुंजन सक्सेना यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, वायूसेनेत कधीही जेंडरच्या आधारे कोणताही भेदभाव केला गेला नाही. हा चित्रपट त्यांच्या आयुष्यावर बेतला असून यात जाह्नवी कपूर मुख्य भूमिकेत आहे.

'भारतीय वायूसेनेने मला सेवा देण्याची संधी दिली'
उच्च न्यायालयात न्यायमूर्ती राजीव शाकधर यांच्या खंडपीठासमोर दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात गुंजन यांनी लिहिले आहे की, भारतीय वायूसेना ही अत्यंत प्रगतीशील संस्था आहे. वायूसेनेने देशाची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल आपण कायम ऋणी राहणार असल्याचे त्या म्हणाल्या आहेत.

प्रतिज्ञापत्रात गुंजन यांनी आणखी काय लिहिले?
गुंजन यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार, हा चित्रपट डॉक्युमेंट्री नसून त्यांच्या आयुष्यापासून प्रेरित आहे. चित्रपटाची प्रत्येक घटना आपल्या आयुष्यात घडली असा दावा त्या करत नाहीत. हे त्यांच्या जीवनाचे ड्रॅमेटिक रिप्रेझेंटेशन आहे. गुंजन यांच्या मते, हा चित्रपट महिलांना वायूसेनेत रुजू होण्यासाठी प्रेरित करतो.

हा प्रश्न सोडविण्याचा सल्ला हायकोर्टाने दिला
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या सुनावणीदरम्यान हायकोर्टाने भारतीय वायूसेना आणि धर्मा प्रॉडक्शनच्या वकिलांना एकत्र बसून चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेल्या संबंधित मुद्द्यावर तोडगा काढण्याचा सल्ला दिला आहे. यासोबतच कोर्टाने चित्रपटाच्या थिएटर रिलीजवर बंदी घालण्यास नकार दिला आहे. याप्रकरणाची पुढील सुनावणी 18 जानेवारी 2021 रोजी होईल.

केंद्र सरकारने याचिका दाखल केली होती
चित्रपटाविरोधात केंद्राने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. हा चित्रपट भारतीय वायूसेनेची प्रतिमा मलीन करणारा असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. चित्रपटात वायूसेनेत लिंगभेद होत असल्याचे दाखवले गेले, जे सत्य नाही. हा चित्रपट 12 ऑगस्ट रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होऊ नये, अशी मागणी याचिकेत केंद्र सरकारकडून केली गेली आहे.

बातम्या आणखी आहेत...