आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कायद्यात बदल करण्याची दिग्दर्शकाची मागणी:आर्यन खानला जामीन न मिळाल्याबद्दल हंसल मेहता म्हणाले -गांजाचे सेवन अनेक देशांमध्ये कायदेशीर आहे, आपल्या देशातही असायला हवे

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • काय म्हणाले हंसल मेहता?

चित्रपट निर्माते हंसल मेहता यांनी देशात गांजाचा वापर कायदेशीर करण्याची मागणी केली आहे. आपल्या एका सोशल मीडिया पोस्टमध्ये ते म्हणाले की, अनेक देशांनी आधीच गांजाच्या वापराला कायदेशीर मान्यता दिली आहे. आर्यनची जामीन अर्जावरील सुनावणी 20 ऑक्टोबरपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. त्यानंतर लगेचच हंसल यांची ही पोस्ट आली होती. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला रेव्ह पार्टीमध्ये अटक झाल्यानंतर हंसल मेहता शाहरुख आणि त्याच्या कुटुंबाच्या समर्थनार्थ पुढे आले.

हंसल मेहता यांची पोस्ट
हंसल मेहता यांनी एक ट्वीट केले असून यात ते म्हणाले, 'गांजा किंवा भांगचे सेवन अनेक देशांमध्ये कायदेशीर आहे. अनेक ठिकाणी याला गुन्हा समजले जात नाही. आपल्याच देशात मात्र याचा वापर नार्कोटिक्स कंट्रोल पेक्षा जास्त छळ करण्यासाठी अधिक केला जातो. ज्याप्रकारे 377 कलम हटवण्यासाठी आंदोलन केले गेले तसेच हा खोडसळपणा बंद करण्यासाठी आंदोलन करण्याची गरज आहे.'

2 ऑक्टोबर रोजी झाली आर्यनला अटक
आर्यनला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) 2 ऑक्टोबर रोजी मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझ शिपवरुन अटक केली होती. या शिपवर रेव्ह पार्टी सुरू असल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती. 2 ऑक्टोबरच्या संध्याकाळी एनसीबीच्या पथकाने आर्यनला ड्रग्जसह ताब्यात घेतले होते. आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचासह अनेक लोकांना अटक करण्यात आली.

अनेक कलाकारांनी दिला शाहरुखला पाठिंबा
हंसल मेहता यांच्यापूर्वी बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी शाहरुखला पाठिंबाही दिला होता. हृतिक रोशन आणि त्याची पुर्वाश्रमीची पत्नी सुझान खान, स्वरा भास्कर, तनीषा मुखर्जी, पूजा भट्ट, सुचित्रा कृष्णमुर्ती, सुनील शेट्टीसह अनेकांनी आर्यनला पाठिंबा देणाऱ्या पोस्ट शेअर केल्या आहेत. सलमान खानला देखील शाहरुखच्या मन्नत बंगल्या बाहेर स्पॉट करण्यात आले होते. सलमानच्या बहिणीदेखीस शाहरुख-गौरी खानच्या भेटीसाठी मन्नतवर गेल्या होत्या. तसेच करण जोहरने देखील शाहरुख आणि गौरीची भेट घेतली होती.

बातम्या आणखी आहेत...