आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभिनेत्री हंसिका मोटवानीच्या प्री-वेडिंग फंक्शन्सला सुरुवात झाली आहे. काल रात्री (2 डिसेंबर) या जोडप्याची संगीत सेरेमनी पार पडली. यावेळी सुफी नाईटचे आयोजन करण्यात आले होते. आता या फंक्शनचे काही फोटो समोर आले आहेत, ज्यामध्ये हंसिका खूपच सुंदर दिसत आहे. यासोबतच हंसिकाचा भावी पती सोहेलने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये हंसिका सोहेलचा हात धरून एन्ट्री करताना दिसतेय.
हंसिका-सोहेलची ड्रीम एन्ट्री
हा व्हिडिओ शेअर करत सोहेलने कॅप्शन दिले, 'ड्रीम एन्ट्री.' यादरम्यान हंसिका गोल्डन शिमरी शरारामध्ये तर सोहेल कुर्ता-पायजामामध्ये दिसला. या सोहळ्याला फक्त त्यांचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित होते.
हंसिकाचे प्री-वेडिंग फंक्शन्स गेल्या आठवड्यापासून सुरू झाले
हंसिकाच्या लग्नाच्या विधी गेल्या आठवड्यात मुंबईत माता की चौकीपासून सुरू झाल्या. नुकताच तिच्या हातावर सोहेलच्या नावाची मेंदी काढण्यात आली. हंसिकाने काही दिवसांपूर्वीच आपल्या गर्ल गँगसोबत बॅचलर पार्टीही साजरी केली होती. त्यांनी ही पार्टी ग्रीसमध्ये साजरी केली.
भावी पतीच्या पहिल्या लग्नात केला होता जबरदस्त डान्स
सोहेलचे हंसिकासोबतचे दुसरे लग्न आहे. काही दिवसांपूर्वी हंसिका मोटवानीचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये ती तिचा भावी पती सोहेल कथुरियाच्या पहिल्या लग्नात नाचताना दिसत आहे. 2016 मध्ये गोव्यात झालेल्या या डेस्टिनेशन वेडिंगचा हा व्हिडिओ आहे. या लग्नातील रोका सेरमनीपासून ते पूल पार्टी आणि संगीत सेरेमनीत हंसिकाचा सहभाग होता. सोहेल कथुरियाचे 2016 मध्ये पहिले लग्न झाले होते.
'शाका लाका बूम बूम'द्वारे लोकप्रिय झाली हंसिका
वर्क फ्रंटबद्दल सांगायचे तर हंसिका लवकरच 'राउडी बेबी' या तामिळ चित्रपटात दिसणार आहे. हंसिकाने आपल्या करिअरची सुरुवात बालकलाकार म्हणून केली होती. 'शका लाका बूम-बूम' सारख्या टीव्ही शोद्वारे तिने टीव्ही इंडस्ट्रीत आपली ओळख निर्माण केली. एवढेच नाही तर 'कोई मिल गया' या चित्रपटात तिने बालकलाकार म्हणून काम केले होते. यानंतर हंसिका 'आपका सुरूर' या चित्रपटात गायक हिमेश रेशमियासोबत मुख्य भूमिकेत दिसली. चित्रपटात हंसिका अचानक मोठी दिसल्याने तिला ट्रोल करण्यात आले होते. हंसिका साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव असून तिचे चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.