आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉयफ्रेंड सोहेलसोबत बोहल्यावर चढली हंसिका:एका क्लिकवर बघा लग्न, हळद आणि मेंदी सोहळ्याचे खास फोटो

जयपूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेत्री हंसिका मोटवानी रविवारी बॉयफ्रेंड सोहेल कथुरियासोबत विवाहबंधनात अडकली. राजस्थानच्या जयपूरमधील ऐतिहासिक मुंडोता किल्ल्यावर दोघे साताजन्माच्या गाठीत अडकले. हंसिका रेड ब्राइडल लेहेंग्यात दिसली. तर सोहेलने ऑफ व्हाइट कलरची शेरवानी परिधान केली होती. दोघांच्या लग्न सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

हंसिका मोटवानीने लग्नाच्या या खास दिवसासाठी लाल रंगाचा लेहेंगा निवडला होता. तिने त्या लेहेंग्यासोबत मॅचिंग दागिने घातले आहेत.

सप्तपदीनंतर सोहेलने हंसिकाच्या भांगात कुंकू भरले. जयपूरच्या मुंडोता किल्ल्यावर रविवारी दिवसभर लग्नाचे विधी सुरू होते.

तत्पूर्वी दुपारी मुंडोता पॅलेसवर हळदी समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हंसिका आणि सोहेल यांनी मॅचिंग कपडे परिधान केले होते. सोहेल आणि हंसिका यांना एकाच मांडवात हळद लागली.

तत्पूर्वी दुपारी मुंडोता पॅलेसवर हळदी समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हंसिका आणि सोहेल यांनी मॅचिंग कपडे परिधान केले होते. सोहेल आणि हंसिका यांना एकाच मांडवात हळद लागली. शनिवारी साखरपुडेा आणि संगीत सोहळा पार पडला.

गेल्या आठवडाभरापासून हंसिका आणि सोहेल यांच्या लग्नाची तयारी सुरू होती. अभिनेत्रीने तिच्या लग्नाआधीच्या सर्व फंक्शनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. हळदीनंतर संगीत सेरेमनी पार पडली. यावेळी वर-वधू खूप थिरकले.

हंसिका आणि सोहेल यांच्या लग्नापूर्वी सुफी नाइटचेही आयोजन करण्यात आले होते.

मेंदी सेरेमनीत हंसिकाचा सिंपल लूक बघायला मिळाला होता.

बातम्या आणखी आहेत...