आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हंसिका मोटवानीचे प्री-वेडिंग फंक्शन्स सुरू:मेंदी सेरेमनीमध्ये दिसला अतिशय सिंपल लूक, 4 डिसेंबरला होणार लग्न

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री हंसिका मोटवानी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. तिचे प्री-वेडिंग फंक्शन्स सुरू झाले आहेत. अलीकडेच तिचा मेंदी सोहळा आयोजित करण्यात आला होता, ज्याचे काही फोटो आणि व्हिडिओ देखील समोर आले आहेत. या सोहळ्याला फक्त तिचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित होते.

मेंदी सेरेमनीमध्ये हंसिका ऑरेंज आउटफिटमध्ये दिसली

मेंदी सेरेमनीत हंसिका ऑरेंज कलरच्या आउटफिटमध्ये दिसली होती. यासोबत तिने ऑक्सिडाइज्ड कानातले कॅरी केले होते. तर तिचा भावी पती सोहेल कथुरिया पीच कुर्तामध्ये दिसला. जयपूरमधील 450 वर्षे जुन्या किल्ल्यावर सिंधी रितीरिवाजानुसार या जोडप्याचा विवाह होणार आहे. लग्नाच्या विधींना गेल्या आठवड्यात मुंबईत माता की चौकीपासून सुरुवात झाली.

बेस्ट बॅचलरेट एव्हर - हंसिका
हंसिकाने अलीकडेच तिच्या गर्ल गँगसोबत तिची बॅचलरेट पार्टी साजरी केली होती. ग्रीसमध्ये तिने ही पार्टी केली होती. त्याची झलकदेखील हंसिकाने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केली होती. हंसिका व्यतिरिक्त लोकप्रिय अभिनेत्री श्रिया रेड्डीसह तिचे अनेक मैत्रिणी या व्हिडिओत दिसल्या होत्या. हा व्हिडिओ शेअर करताना हंसिकाने लिहिले की, 'बेस्ट बॅचलरेट एव्हर'.

हंसिकाचे लग्न OTT वर स्ट्रीम केले जाईल

हंसिकाने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर काही फोटो शेअर करून तिच्या साखरपुड्याच्या वृत्ताला दुजोरा दिला होता. हंसिकाने फ्रान्समधील प्रसिद्ध आयफेल टॉवरसमोरील एक फोटो पोस्ट केला होता, ज्यामध्ये सोहेल हातात अंगठी घेऊन तिला प्रपोज करताना दिसला होता. हे फोटो शेअर करताना हंसिकाने कॅप्शनमध्ये लिहिले होते, 'Now and forever.'

हंसिका-सोहेलचे लग्न थेट OTT वर स्ट्रीम होणार असल्याच्या बातम्या अलीकडे आल्या होत्या. हंसिकाच्या चाहत्यांना तिच्या लग्नाचे क्षण थेट फोन स्क्रीनवर पाहता येणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...