आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिझनेसमन सोहेल कथुरियासोबत सप्तपदी घेणार हंसिका:जयपूर पॅलेसमध्ये होणार डेस्टिनेशन वेडिंग, 2 डिसेंबरपासून सुरू होणार लग्नविधी

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री हंसिका मोटवानी लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याच्या अनेक दिवसांपासून बातम्या येत आहेत. 4 डिसेंबरला हंसिकाचे लग्न करणार आहे. मात्र तिच्या भावी नव-याबद्दलची माहिती कुठेच आली नव्हती. पण आता हंसिकाच्या भावी नव-याच्या नावाचा खुलासा झाला आहे. बिझनेस पार्टनर आणि मित्र सोहेल कथुरियासोबत हंसिका लग्न करणार असल्याचे वृत्त आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हंसिका आणि सोहेल खूप दिवसांपासून एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते आणि आता दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.

हंसिका जयपूरमध्ये करणार आहे लग्न

हंसिकाचे लग्न अतिशय शाही पद्धतीने होणार असून त्यासाठी तिने जयपूरच्या 450 वर्षे जुन्या किल्ल्याची निवड केली आहे. मुंडोटा किल्ल्यात हंसिकाच्या लग्नाची सर्व तयारी सुरू असल्याच्या बातम्या येत आहेत.

2 डिसेंबरपासून लग्नाचे विधी सुरू होणार आहेत

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हंसिका आणि सोहेलचे लग्न अतिशय शाही पद्धतीने होणार आहे. जयपूरच्या पॅलेसमध्ये 2 डिसेंबरला सूफी नाईट, 3 डिसेंबरला मेंदी आणि संगीत आणि 4 डिसेंबरला लग्नाचे विधी होतील. या सर्व सोहळ्याची तयारी आतापासून सुरू झाली आहे. मात्र, अद्याप लग्नाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

कोण आहे हंसिकाचा जोडीदार सोहेल?
हंसिकाच्या लाइफ पार्टनरबद्दल आतापर्यंत फारशी माहिती समोर आलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, सोहेल कथुरिया असे त्याचे नाव असून तो एक व्यावसायिक आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, सोहेल दीर्घकाळापासून हंसिकाचा बिझनेस पार्टनर आहे. दोघेही 2020 पासून इव्हेंट प्लॅनिंग कंपनी चालवत आहेत. यादरम्यान दोघेही प्रेमात पडले, 2 वर्षांच्या नात्यानंतर अखेर दोघेही लग्न करणार आहेत.

हंसिकाचे फिल्मी करिअर
वर्क फ्रंटबद्दल सांगायचे तर हंसिका लवकरच 'राउडी बेबी' या तामिळ चित्रपटात दिसणार आहे. हंसिकाने आपल्या करिअरची सुरुवात बालकलाकार म्हणून केली होती. 'शका लाका बूम-बूम' सारख्या टीव्ही शोद्वारे तिने टीव्ही इंडस्ट्रीत आपली ओळख निर्माण केली. एवढेच नाही तर 'कोई मिल गया' या चित्रपटात तिने बालकलाकार म्हणून काम केले होते.

यानंतर हंसिका 'आपका सुरूर' या चित्रपटात गायक हिमेश रेशमियासोबत मुख्य भूमिकेत दिसली. चित्रपटात हंसिका अचानक मोठी दिसल्याने तिला ट्रोल करण्यात आले होते. हंसिका साऊथ फिल्म इंडस्ट्रीतीली एक प्रसिद्ध नाव असून तिचे चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडतात.

बातम्या आणखी आहेत...