आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांच्या लग्नाचा आज (1 डिसेंबर) दुसरा वाढदिवस आहे. 1 डिसेंबर 2018 रोडी जोधपूर येथील उम्मैद भवनमध्ये या दोघांचा शाही विवाहसोहळा पार पडला होता. या लग्न सोहळ्याला दोघांचेही जवळचे नातेवाईक आणि मोजके मित्रमंडळी उपस्थित होते. 2017 पासून दोघे एकमेकांना डेट करत होते. मेट गालाच्या इव्हेंटमध्ये निक आणि प्रियांका पहिल्यांदा एकत्र दिसले होते. त्यानंतर दोघांना अनेकदा एकत्र पाहिले गेले. 18 ऑगस्टला या दोघांनी आपल्या नात्याची औपचारिक घोषणा केली होती. या दोघांना निकयांका या नावाने ओळखले जाते. लग्नाच्या काही दिवसांपूर्वी निकयांकाने वोग मॅगझिनला एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत दोघांनीही त्यांच्या लव्ह स्टोरीवर प्रकाश टाकला होता.
दुसऱ्या भेटीतही नव्हते झाले प्रियांका-निकमध्ये कीस
-वोग मॅगझिनमध्ये प्रसिद्ध झालेल्या मुलाखतीनुसार, सर्वात अगोदर निकने प्रियांकाची सहकलाकार ग्रॅहम रॉजर्स हिला मॅसेज पाठवला होता. त्यात लिहिले होते की, "प्रियांका खूप सुंदर आहे."
- सप्टेंबर 2016 मध्ये पहिल्यांदा निकने प्रियांकाला सोशल मीडियावर मॅसेज केला होता. त्या मॅसेजमध्ये निकने लिहिले होते, 'आपल्या काही कॉमन फ्रेंड्सचे म्हणणे आहे की, आपण भेटायला हवे.'
- यावर प्रियांकाने लिहिले होते की, हा मॅसेज त्यांची संपूर्ण टीम वाचू शकते. त्यामुळे त्याने तिच्या फोनवर संपर्क साधावा.
- मॅगझिननुसार 2017 मध्ये प्रियांका आणि निक यांना डिझाइनर राल्फ लॉरेन (Ralph Lauren) याने मेट गाला येथे आमंत्रित केले होते. यापूर्वी ते दोघे न्यूयॉर्क येथे एका ड्रिंक पार्टीमध्ये भेटले होते. - या भेटीनंतर प्रियांकाने निकला आपल्या घरी बोलावले होते. घरी तिची आई मधू चोप्रा या टीव्ही सीरिअल "लॉ अॅण्ड ऑर्डर" बघत होत्या. प्रियांकाने सांगितले. "आम्ही काही तास गप्पा मारल्या. त्यावेळी आमच्यात कीस झाले नव्हते."
ग्रीसमध्ये केले होते निकने प्रपोज
- तिसऱ्या भेटीतच निकला समजले होते की, प्रियांका हिच ती मुलगी आहे, जिच्याशी त्याला लग्न करायचे आहे. तरी देखील निकने प्रियांकाला त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी प्रपोज केले नाही.
- निकने त्यावेळी एका आठवड्यापूर्वीच अंगठी खरेदी केली होती. गुढघ्यांवर बसून निक प्रियांकाला म्हणाला, "मी ही अंगठी तुझ्या बोटात घालू शकतो का? तुझ्याशी लग्न करून मी या जगातला सर्वात नशीबवान व्यक्ती बनू शकतो का?" निक बोलत असताना प्रियांका 45 सेकंद स्तब्ध उभी होती. नंतर प्रियांकाने निकच्या प्रेमाचा स्वीकार केला.
निक याला प्रेमाने 'या' नावाने बोलावते प्रियांका
- प्रियांकाने सांगितले की, तिने निक याला एक निक नेम दिले आहे आणि ती त्याच नावाने त्याला हाक मारते. प्रियांका निक याला "ओल्ड मॅन जोनस" अशी हाक मारते.
- प्रियांका निक याला या नावाने का हाक मारते, याचे कारणही तिने मुलाखतीत सांगितले होते. ती एकदा निकसोबत लॉस अँजेलिसला गेली होती. तेव्हा निक तिला म्हणाला होता की, "तू ज्या नजरेने जगाकडे पहाटे ते मला खूप आवडते. मला तुझा तो दृष्टिकोन खूप आवडतो."
- प्रियांका म्हणते की, "एक मुलगी म्हणून मला सांगावेसे वाटते की, मला आजपर्यंत अशी कोणतीच व्यक्ती भेटली नाही, तिला माझे महत्वाकांक्षी असणे आवडते. नेहमी याविरुद्धच घडते." यावरूनच कळते की, निक हा प्रियांकाच्या स्वभावाचा किती आदर करतो.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.