आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेडिंग अ‍ॅनिव्हर्सरी:सैफीनाच्या लग्नाला 9 वर्षे पूर्ण, करीना कपूरने एका खास फोटोद्वारे सैफ अली खानला दिल्या शुभेच्छा

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • करीना कपूरने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर ग्रीसचा एक जुना फोटो शेअर केला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर आणि सैफ अली खान यांच्या लग्नाला आज 9 वर्षे पूर्ण झाली आहेत. अनेक महिने एकमेकांना डेट केल्यानंतर या जोडप्याने 16 ऑक्टोबर 2012 रोजी लग्न केले होते. आज लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने करीनाने पती सैफला एक खास फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत.

करीना कपूरने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर ग्रीसचा एक जुना फोटो शेअर केला आहे. या फोटोसह करीनाने लिहिले, 'एकेकाळी ग्रीसमध्ये. तिथे सूपची एक वाटी होती आणि आपण होतो आणि येथून माझे आयुष्य बदलले. जगातील सर्वात देखण्या माणसाला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.'

चाहते आणि सेलिब्रिटींनी केला शुभेच्छांचा वर्षाव
करीनाची ही पोस्ट समोर आल्यानंतर चाहत्यांसह इंडस्ट्रीतील मित्रांनीही त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षावर केला आहे. फोटोवर कमेंट करताना प्रियांका चोप्राने लिहिले, 'वाढदिवसाच्या शुभेच्छा, गॉड ब्लेस.' करीनाची बहीण करिश्माने लिहिले, 'माझी सर्वात आवडती जोडी.' सैफची बहीण सबा अली खान पतौडीने लिहिले, 'माशाअल्लाह, खूप प्रेम. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा.'

शाहिदसोबत ब्रेकअप झाल्यानंतर सैफच्या जवळ आली करीना

2007 दरम्यान शाहिद कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर करीना कपूररची सैफ अली खानसोबतची जवळीक वाढू लागली होती. 'ओमकारा' चित्रपटात सैफ आणि करीनाचे फारच कमी सीन्स शूट करायचे होते. सेटवर दोघेही एकत्र दिसायचे. सैफ आणि करीनाचे सीन सोबत नसताना देखील दोघे एकत्र असायचे. 'ओमकारा' चित्रपटानंतर सैफ आणि करीनाची जवळीक यशराज बॅनरचा चित्रपट 'टशन'च्या चित्रिकरणादरम्यान दिसली. शूटिंगमधून वेळ काढून दोघेही लाँग वॉकवर जायचे. या दोघांच्या अफेअर्सचे गॉसिप सुरू झाले होते, पण माध्यमांसमोर या दोघांनीही ते मान्य केले नाही. लॅक्मे फॅशन वीकमध्ये सैफ-करीना पहिल्यांदा एकाच गाडीतून एकत्र आले होते. येथे पहिल्यांदाच आपण करीनाला डेट करत असल्याचे सैफने मान्य केले होते. लग्नापूर्वी काही काळ दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्येही राहिले होते.

2012 मध्ये केले लग्न
करीना कपूर आणि सैफ अली खान यांचे 16 ऑक्टोबर 2012 रोजी लग्न झाले. सैफची पहिली पत्नी अमृता सिंह होती, 2004 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला होता. करीना सैफपेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. लग्नानंतर 2016 मध्ये करीना मुलगा तैमूरची आई झाली. याचवर्षी फेब्रुवारी महिन्यात करीनाने मुलगा जहांगीरला जन्म दिला.

बातम्या आणखी आहेत...