आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

48 वर्षांची झाली ऐश्वर्या:मिस इंडिया होण्यासाठी ऐश्वर्या रायने नाकारली होती 'राजा हिंदुस्तानी'ची ऑफ, नवव्या वर्गात असताना मिळाला होता पहिला मॉडेलिंग प्रोजेक्ट

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • करिअरच्या सुरुवातीला अनेक फ्लॉप चित्रपटांत केले होते काम

आपल्या सौंदर्य, अदा आणि उत्कृष्ट अभिनयाने लाखो लोकांच्या मनात स्वतःचा वेगळा ठसा उमटवणारी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिचा आज वाढदिवस असून तिने वयाची 48 वर्षे पूर्ण केली आहेत. 1994 मध्ये तिने मिस वर्ल्डचा मान पटकावला होता. मिस वर्ल्ड बनल्यानंतर ऐश्वर्याने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले, असे अनेकांना वाटत असेल. पण हे चुकीचे आहे. ऐश्वर्याला लहान वयातच अनेक मोठ्या प्रोजेक्ट्स आणि चित्रपटांच्या ऑफर्स मिळाल्या होत्या, पण तिने त्या फेटाळून लावल्या. आज ऐश्वर्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया तिच्या करिअरची सुरुवात कशी झाली-

नववीत असताना मिळाला होता पहिला मॉडेलिंग प्रोजेक्ट

ऐश्वर्या रायला तिचा पहिला मॉडेलिंग प्रोजेक्ट नवव्या वर्गात शिकत असताना मिळाला होता. कॅमलिन कंपनीकडून तिला ऑफर मिळाली होती. या प्रोजेक्टनंतर ऐश्वर्याला कोक, फुजी आणि पेप्सीच्या जाहिराती मिळाल्या. यासोबतच ऐश्वर्याला मॉडेलिंगचे अनेक मोठे प्रोजेक्ट्सही मिळाले.

1994 मध्ये मिस इंडिया या सौंदर्य स्पर्धेत रनर अप झाल्यानंतर ऐशने त्याच वर्षी मिस वर्ल्डचा मुकुट आपल्या नावी केला होता. मिस वर्ल्ड बनल्यानंतर ऐश्वर्या रायला इंडस्ट्रीतून अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या होत्या.

मिस इंडिया स्पर्धेसाठी नाकारली होती 'राजा हिंदुस्तानी'ची ऑफर
वोग मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीदरम्यान ऐश्वर्याने सांगितले होते, 'ब्युटी पेजंटच्या माध्यमातून मी बॉलिवूडमध्ये प्रवेश केला आहे, असे अनेकांना वाटते, पण माझ्याबाबत असे घडले नाही. सौंदर्य स्पर्धेपूर्वीही मला चार चित्रपटांच्या ऑफर आल्या होत्या. सत्य हे आहे की, मी चित्रपटसृष्टीतून पदार्पण न करता मिस इंडिया स्पर्धेतमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. मी मिस इंडियामध्ये भाग घेतला नसता तर कदाचित राजा हिंदुस्तानी हा माझा पहिला चित्रपट ठरला असता.'

करिअरच्या सुरुवातीला अनेक फ्लॉप चित्रपटांत केले होते काम
ऐश्वर्या रायने 1997 मध्ये मणिरत्नम यांच्या इरुवर या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्याच वर्षी ती और प्यार हो गया या बॉलिवूड चित्रपटात दिसली होती. दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर विशेष कामगिरी दाखवू शकले नाहीत. यानंतर ऐश्वर्या तामिळ चित्रपट जीन्स आणि बॉलिवूड चित्रपट आ अब लौट चलेंमध्ये दिसली, परंतु हे दोन्ही चित्रपट फ्लॉप ठरले होते.

संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटातून स्टार झाली ऐश्वर्या

'राजा हिंदुस्तानी' या चित्रपटाला नकार दिल्यानंतर आमिरच्या सांगण्यावरून ऐश्वर्या या चित्रपटाच्या प्रीमियरला पोहोचली. प्रीमियरला पोहोचल्याने इंडस्ट्रीतील लोक तिच्यावर रागावतील अशी भीती ऐश्वर्याला होती. येथेच तिची पहिली भेट संजय लीला भन्साळी यांच्याशी झाली. संजय त्यांच्या 'हम दिल दे चुके सनम' या चित्रपटासाठी मुख्य अभिनेत्रीच्या शोधात होते. यापूर्वी भन्साळी या भूमिकेसाठी करीना कपूर किंवा मनीष कोईराला यांना कास्ट करण्याच्या विचारात होते, पण ऐश्वर्याला भेटल्यावर त्यांचा विचार बदलला. 1999 मध्ये रिलीज झालेला 'हम दिल दे चुके सनम' हा चित्रपट ऐश्वर्याच्या करिअरचा टर्निंग पॉइंट ठरला.

बातम्या आणखी आहेत...