आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Happy Birthday Akshay Kumar: Shilpa Shetty And Akshay Kumar's Engagement Was Broken As Soon As Twinkle Khanna Arrived, The Name Of The Khiladi Has Also Been Linked Up With These Big Actresses

54 वर्षांचा झाला खिलाडी कुमार:ट्विंकल खन्नामुळे मोडला होता शिल्पा शेट्टी आणि अक्षय कुमारचा साखरपुडा, या अभिनेत्रींसोबतही जुळले होते खिलाडीचे नाव

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ट्विंकलनेही दोनदा मोडला होता अक्षयसोबत साखरपुडा

बॉलिवूडचा सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता अक्षय कुमारने 1991 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'सौगंध' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. मात्र त्याला खरी ओळख 1992 मध्ये आलेल्या 'खिलाडी' चित्रपटातून मिळाली. यानंतर तो 'सबसे बडा खिलाडी', 'खिलाडियों का खिलाडी', 'मोहरा', 'ये दिल्लगी', 'मिस्टर अँड मिसेस खिलाडी', 'दिल तो पागल है', 'आँखें', 'हेरा फेरी' आणि 'खाकी'सारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये दिसला.

करिअरच्या सुरुवातीला अक्षय त्याच्या हिट चित्रपटांसोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिला. आज त्याच्या 54 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया कोणत्या अभिनेत्रींनी अक्कीवर फसवणुकीचा आरोप केला आणि त्याची आणि ट्विंकलची लव्ह स्टोरी कशी सुरू झाली-

करिअरच्या सुरुवातीला अक्षय कुमारचे नाव रवीना टंडनशी जोडले गेले होते, मात्र शिल्पा शेट्टीच्या आगमनाने त्यांच्या नात्यात दुरावा आला. अक्षयसोबतच्या ब्रेकअपनंतर रवीनाने एका मुलाखतीत सांगितले की, जर अक्षय आणि तिच्यात काही वाद झाला तर तो तिची समजूत घालण्यासाठी तिच्यासोबत साखरपुडा करत असे. रवीनाच्या म्हणण्यानुसार, दोघांनी दोन वेळा मंदिरात साखरपुडा केला होता. नंतर शिल्पाच्या बाबतीही तसेच घडले होते.

अक्षयने शिल्पासोबतही केला होता साखरपुडा
शिल्पा आणि अक्षय यांनी 1994 मध्ये आलेल्या मैं खिलाडी तू अनाडी या चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान दोघांमध्ये जवळीक वाढली होती. हळूहळू त्यांच्या रिलेशनशिपची सर्वच चर्चा होऊ लागली. शिल्पापूर्वी अक्षयच्या आयुष्यात रवीना टंडन होती. मात्र शिल्पा आयुष्यात आल्यानंतर अक्षयने रवीनाकडे पाठ फिरवली होती. मात्र याबद्दल शिल्पाला काहीच ठाऊक नव्हते. अक्षयने नंतर शिल्पासोबतही असेच केले होते.

ट्विंकल आयुष्यात येताच दोघांच्या नात्यात आला दुरावा
असे म्हटले जाते की, शिल्पा आणि अक्षयने मुंबईतील एका मंदिरात साखरपुडा केला होता. मात्र अक्षयच्या आयुष्यात ट्विंकल खन्नाची एंट्री होताच अक्षयने शिल्पाकडेही पाठ फिरवली. अक्षय आणि ट्विंकल यांनी फिल्मफेअर मॅगझिनसाठी एकत्र शूट केले होते, त्याचकाळात अक्षय आणि ट्विंकल यांच्यात जवळीक निर्माण झाली. अखेर 2000 मध्ये शिल्पा आणि अक्षय यांच्यात खटके उडून ही लवस्टोरी संपुष्टात आली. शिल्पाशी ब्रेकअप झाल्यानंतर अक्षयने 2001 मध्ये ट्विंकल खन्नाबरोबर लग्न केले.

अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी या दोघांमध्ये प्रेम होते. परंतु त्याच सोबत अक्षयचे रवीना टंडनसोबतही प्रेमप्रकरण सुरू होते. या दोघींनंतर अक्षयच्या आयुष्यामध्ये ट्विंकल खन्ना आली. या तिघी अभिनेत्री कोणे ऐकेकाळी एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी होत्या. शिल्पा शेट्टीने तिच्या एका मुलाखतीमध्ये अक्षय कुमावर थेट आरोपच केले होते.

अक्षयने मला धोका दिला - शिल्पा
अक्षय माझ्याबरोबर डेट करत होता त्याचवेळी तो ट्विंकलाही डेट करत होता, असा खुलासा शिल्पाने केला होता. शिल्पा शेट्टीने ब्रेकअप झाल्यानंतर एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, 'अक्षय कुमारने मला धोका दिला आहे. अक्षय कुमारसोबत भविष्यात मी कधीच काम करणार नाही.' खरे तर त्याच वर्षी अक्षय आणि शिल्पाचा 'धडकन' हा चित्रपट रिलीज झाला होता. जेव्हा शिल्पाला विचारले की तुझी मैत्रीण ट्विंकलवरही तू नाराज आहेस का? त्यावर शिल्पाने उत्तर दिले की 'तिच्याबद्दल मला कोणतीच तक्रार नाही. अक्षयच्या चुकांसाठी ट्विंकलला दोष देणे योग्य नाही.'

अक्षयने माझा वापर केला
या मुलाखतीमध्ये शिल्पाने सांगितले होते, 'अक्षयने माझा वापर केला आणि त्याच्या आयुष्यात आणखी कोणी आल्यानंतर त्याने अगदी सहजपणे मला सोडून दिले. तो एकमेव व्यक्ती आहे त्याच्यावर मी खूप नाराज आहे, कारण त्याने मला धोका दिा आहे. मला विश्वास आहे की येणा-या काळात याचा हिशोब नक्कीच होईल. अक्षयने जे काही केले आहे तेच त्याच्यासोबत घडेल.'

याच मुलाखतीमध्ये शिल्पाने म्हटले होते, 'अक्षयला विसरणे सोपे नव्हते. परंतु या ब्रेकअपच्या धक्क्यातून मी सावरले आहे. अक्षय कुमार हा माझा भूतकाळ आहे. तो माझ्या आयुष्यातील एक प्रकरण असून आता ते मी विसरून गेले आहे. मी यापुढे त्याच्यासोबत कधीच काम करणार नाही. त्याच्यासोबत प्रोफेशनली काम करणे कधीच शक्य होणार नाही.'

ट्विंकलनेही दोनदा मोडला होता अक्षयसोबत साखरपुडा
असे म्हटले जाते, की ट्विंकलचा 'मेला' हा चित्रपट जेव्हा रिलीज होणार होता, त्याकाळात अक्षयने ट्विंकलला लग्नाची मागणी घातली होती. त्यावेळी ट्विंकलने अक्षयकडे लग्नासाठी एक अट घातली होती. ती म्हणजे 'मेला' हा चित्रपट फ्लॉप झाला, तरच ती त्याच्यासोबत लग्न करेल. चित्रपट फ्लॉप ठरला आणि दोघांचे लग्न झाले. पण या दोघांचाही एकदा नाही तर दोन वेळा साखरपुडा मोडला होता.

एका फोटोशूटदरम्यान अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्नाची पहिल्यांदा भेट झाली. या फोटोशूटदरम्यान ट्विंकलला पाहता क्षणीच अक्षय तिच्या प्रेमात पडला होता. यानंतर या दोघांचा ‘इंटरनॅशनल खिलाडी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यानंतर या दोघांच्या रिलेशनशिपला सुरुवात झाली. याचदरम्यान अक्षय ट्विंकलचा साखरपुडाही झाला. पण दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले आणि त्यांचा हा साखरपुडा मोडला. त्यानंतर पुन्हा एकदा कुटुंबियांच्या सहमतीने दोघांनी साखरपुडा केला. पण त्यांचा हा साखरपुडा देखील मोडला.

दोन वेळा साखरपुडा मोडल्यानंतर ट्विंकल नैराश्येमध्ये गेली होती. कॉफी विथ करण या शोमध्ये याबाबत ट्विंकलने स्वतः खुलासा केला होता. ट्विंकलने सांगितले होते की, माझ्या एका मित्राने माझ्या आईला अक्की समलिंगी असल्याचे सांगितले होते. यामुळे आमच्या नात्यामध्ये बऱ्याच समस्या निर्माण झाल्या. माझ्या आईने तर या लग्नासाठी नकार दिला होता. पण एक वर्षाने अक्षयबाबत ट्विंकलच्या आईला सत्य समजल्यानंतर त्यांनी या लग्नास होकार दिला.

या अभिनेत्रींसोबत जुळले होते अक्षयचे नाव
आयशा जुल्का

अक्षय आणि आयशा जुल्काची जोडी ऑनस्क्रीन चांगली पसंत केली गेली होती, त्याचबरोबर त्यांच्या अफेअरची देखील चर्चा रंगली होती. असे म्हटले जाते की आयशा अक्षयसोबतच्या नात्यात गंभीर होती. मात्र अक्षयने तिच्यासोबत लग्नासाठी नकार दिला होता.

रेखा
अक्षय कुमार आणि रेखा यांचे अफेअर देखील बॉलिवूडच्या सर्वात चर्चित अफेअरपैकी एक आहे. 'खिलाडियों का खिलाडी' या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान त्यांच्या रिलेशनशिपबद्दल चर्चा रंगली होती. रेखा वयाने अक्षयपेक्षा खूप मोठी होती, त्यामुळे हे नाते चर्चेत आले होते. मात्र अक्षयने ट्विंकल त्याच्या आयुष्यात येताच रेखापासून स्वतःला दूर केले होते.

पूजा बत्रा
मॉडेलिंगच्या दिवसांमध्ये अक्षय कुमारने पूजा बत्राला डेट केले होते. पूजा बत्राला विरासत आणि नायक या चित्रपटांसाठी ओळखले जाते. त्याकाळात पूजा इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री होती, तर अक्षय इंडस्ट्रीमध्ये स्थान मिळवण्यासाठी धडपडत होता.

बातम्या आणखी आहेत...