आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Happy Birthday Anoop Soni: Anoop Soni Did Not Want To Play Bhairo In The Iconic Show Balika Vadhu, Agreed After Rejecting The Offer Thrice.

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हॅपी बर्थडे अनूप सोनी:बालिका वधूमधील भैरोची भूमिका साकारु इच्छित नव्हते अनूप सोनी, तीनदा ऑफर नाकारल्यानंतर भूमिकेसाठी दिला होता होकार

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अभिनेते राज बब्बर यांचे जावई आहेत अनूप सोनी

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अँकर अनूप सोनी आज आपला 46 वा वाढदिवस साजरा करत आहेत. अनूप यांनी आपल्या करिअरची सुरुवात फिल्म इंडस्ट्रीतून केली, मात्र लोकप्रियता न मिळाल्याने त्यांनी आपला मोर्चा छोट्या पडद्याकडे वळवला. त्यांना 2008 मध्ये आलेल्या बालिका वधू या मालिकेतील भैरो धरमवीर सिंगच्या भूमिकेतून विशेष प्रसिद्धी मिळाली. मात्र रंजक बाब म्हणजे अनूप यांना या मालिकेत काम करायचे नव्हते. त्यांनी तब्बल तीन वेळा या मालिकेची ऑफर नाकारली होती. आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊयात कसा राहिला अनूप यांचा बॉलिवूड ते टीव्ही इंडस्ट्रीपर्यंतचा प्रवास -

चित्रपटांमध्ये सहाय्यक अभिनेता म्हणून राहिले
अनूप सोनी पहिल्यांदा 1999 मध्ये रिलीज झालेल्या गॉडमदर या चित्रपटात झळकले होते. या चित्रपटात त्यांनी सहाय्यक अभिनेत्याची भूमिका साकारली होती. त्यानंतर ते हृतिक रोशन, करिश्मा कपूर आणि जया बच्चन स्टारर फिजा या चित्रपटात अनूपने तपोरीच्या छोट्याशा भूमिकेत दिसले. हळूहळू अनूप बॉलिवूड चित्रपटांमध्ये फक्त सहाय्यक अभिनेता म्हणून ओळखले जाऊ लागले.

कलर्स वाहिनीवरील बालिका वधूमुळे मिळाली लोकप्रियता
बर्‍याच शो आणि चित्रपटात छोट्या-मोठ्या भूमिका केल्यावर अनूप सोनी छोट्या पडद्यावरील सीआयडी या लोकप्रिय कार्यक्रमात झळकले. त्यानंतर नव्याने लाँच झालेल्या कलर्स वाहिनीवरील बालिका वधू या मालिकेची त्यांना ऑफर मिळाली, पण त्यांनी ती सुरुवातीला नाकारली. पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत अनूप यांनी सांगितले होते की, त्यावेळी मी सीआयडी स्पेशला शो संपवला होता आणि मला काही दिवस अभिनयापासून ब्रेक घ्यायचा होता. त्यामुळे मी बालिका वधू हा शो करण्यास नकार दिला. मला प्रॉडक्शन हाऊस आणि लेखकांकडून सतत कॉल येऊ लागले. मी तीन वेळा शोची ऑफर नाकारली. यामागील एक कारण हे देखील होते की त्या वेळी कलर्स चॅनल नवीन होते. पण नंतर मी ती ऑफर स्वीकारली आणि तो एक आयकॉनिक शो बनला.

2010 पासून अनूप सोनी टीव्हीवरील क्राइम पेट्रोल या शोमध्ये अँकर म्हणून झळकले होते. या शोसाठी अनूप यांचे खूप कौतुक झाले. पहिला शो छोट्या स्तरावर सुरू झाला ज्याला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि नंतर हा कार्यक्रम क्रिएटिव्ह होत गेला. 2018 मध्ये अनूप यांनी अचानक हा कार्यक्रम सोडण्याचा निर्णय घेत सर्वांना चकित केले. आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका निभावण्याची इच्छा असल्याचे त्यावेळी अनूप यांनी सांगितले होते.

बरीच महिने कामाच्या शोधात होते
क्राइम पेट्रोल सोडल्यानंतर अनूप यांनी बरीच महिने प्रत्येकाकडे जाऊन कामासाठी विचारणा करावी लागली. हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले होते, "एक काळ असा होता की मला बर्‍याच ऑफर येत असत पण त्यावेळी माझ्याकडे डेट्स नव्हत्या. कदाचित लोकांना असे वाटू लागले की मला ऑफर करून काही उपयोग नाही. इंडस्ट्रीत बरेच कलाकार, चित्रपट निर्माते आहेत, म्हणून जर तुम्हाला काम हवं असेल तर तुम्हाला त्यांच्याकडे जावं लागेल. मी कधीही काम विचारण्यास अजिबात संकोच करत नाही, विशेषत: ज्यांच्याबरोबर मला काम कराची इच्छा आहे त्यांच्याकडे.'

आता अनूप यांच्याकडे अनेक मोठे प्रोजेक्ट्स आहेत

क्राइम पेट्रोल शो साइन केल्यानंतर अनूप सोनी चित्रपटांपासून दूर गेले होते. शो सोडल्यानंतर त्यांनी 8 वर्षांनंतर प्रस्थानम चित्रपटाद्वारे पुनरागमन केले. यानंतर ते फत्तेशिकस्त, क्लास ऑफ 83 आणि बॉम्बर्समध्ये दिसले. अलीकडे ते अॅमेझॉन प्राइमवर रिलीज झालेल्या तांडव या सीरिजमध्ये सैफ अली खान, डिंपल कपाडिया, सुनील ग्रोव्हरसोबत दिसले. काही वादग्रस्त दृश्यांमुळे ही मालिका सतत वादात सापडली आहे. आता अनूप यावर्षी प्रदर्शित होणार्‍या सत्यमेव जयते 2 या चित्रपटात दिसणार आहे.

2011 मध्ये राज बब्बरच्या मुलीशी केले लग्न अनूप सोनी यांनी 1999 मध्ये रितू सोनीशी लग्न केले. या लग्नापासून त्याला मायरा आणि झोया या दोन मुली आहेत. अनूप यांनी लग्नाच्या 11 वर्षानंतर रितूसोबत घटस्फोट घेतला. त्याच्या दुस-याच वर्षी अनूप यांनी अभिनेते-राजकारणी राज बब्बर यांची मुलगी जूही बब्बरशी लग्न केले. दोघांना इमान हा एक मुलगा आहे.

बातम्या आणखी आहेत...