आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Happy Birthday Aryan Khan: Juhi Chawla Took Pledge To Plant 500 Trees On Aryan's Birthday, Congratulated By Sharing Throwback Picture Of Childhood

बर्थडे स्पेशल:आर्यन खानच्या वाढदिवसानिमित्त जुही चावलाने केला 500 झाडे लावण्याचा संकल्प, बालपणीचा थ्रोबॅक फोटो शेअर करून दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जुहीने आर्यनचा बालपणीचा एक फोटो देखील शेअर केला आहे.

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा आज 24 वा वाढदिवस आहे. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात अडकल्यानंतर एकीकडे मन्नतमध्ये जल्लोषाचे वातावरण नाही, तर दुसरीकडे मात्र सोशल मीडियावर आर्यनवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. दरम्यान, शाहरुखची जवळची मैत्रीण जुही चावला हिने आर्यनला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत या खास दिवशी 500 झाडे लावण्याचा संकल्प केला आहे.

जुही चावलाने आर्यनच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ट्वीट केले, 'हॅपी बर्थडे आर्यन. या वर्षातही आमच्या प्रार्थना पूर्वीप्रमाणेच आहेत. तू नेहमी ब्लेस्ड, सुरक्षित रहा. लव्ह यू. तुझ्या नावाने 500 झाडे लावण्याची शपथ घेतली आहे. जय, जुही, जान्हवी, अर्जुन आणि इतर सर्व,' असे जुहीने म्हटले आहे.

जुहीने या पोस्टसह आर्यनचा बालपणीचा एक फोटो देखील शेअर केला आहे. ज्यामध्ये लहान आर्यनसह सुहाना, जान्हवी आणि अर्जुन दिसत आहेत.

जुही चावलाने साक्षीदार म्हणून आर्यन खानच्या जामिनावर सही केली होती. आर्यनला उच्च न्यायालयाने एक लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सशर्त जामीन दिला होता. जुही शाहरुख खानची जवळची मैत्रीण आणि त्याची बिझनेस पार्टनर देखील आहे. 28 ऑक्टोबरला आर्यन खानचा जामीन मंजूर झाला होता, पण जुहीच्या कागदपत्रांची पूर्तता न झाल्याने आर्यनला आणखी एक रात्र तुरुंगात काढावी लागल्याच्या बातम्या आल्या होत्या. नंतर बातमी आली होती, जुहीमुळे नव्हे तर कोर्टात वीज खंडित झाल्यामुळे कागदपत्र तयार करण्यास उशीर झाला होता.

विशेष म्हणजे आर्यनसह आज जुही चावला हिचा देखील वाढदिवस आहे. जुहीने वयाची 54 वर्षे पूर्ण केली आहेत. जुहीने शाहरुखसोबत डर, राजू बन गया जेंटलमन, येस बॉस, फिर भी दिल है हिंदुस्तानी, भूतनाथ, डुप्लिकेट यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

आर्यन ड्रग्ज केस अपडेट
शाहरुख खानचा मुलगा आर्यन दर शुक्रवारी त्याची साप्ताहिक हजेरी लावण्यासाठी एनसीबी कार्यालयात पोहोचतोय. 12 नोव्हेंबर रोजीदेखील तो एनसीबीच्या कार्यालयात हजर होता. क्रूझ ड्रग्ज प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या जामिनाच्या अटींमध्ये त्याचा समावेश आहे. यानंतर एनसीबीच्या एसआयटीने देखील त्याला चौकशीसाठी बोलावले होते. शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीही शुक्रवारी आर्यनसोबत हजर होती. आरएएफ कॅम्प मेसमध्ये ही चौकशी झाली होती. येथे आर्यनला क्रूझपर्यंत पोहोचणे, ड्रग्ज बाळगणे, ड्रग्जचे सेवन करने यावर प्रश्न विचारण्यात आल्याचे समजते.

बातम्या आणखी आहेत...