आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Happy Birthday: At The Age Of Just 20, Saif Ali Khan Married 12 Years Elder Amrita Singh, The Relationship Was Broken Due To Extra Marital Affair

51 वर्षांचा झाला सैफ:वयाच्या 20 व्या वर्षी सैफ अली खानने 12 वर्षांनी मोठ्या अमृता सिंगसोबत केले होते लग्न, विवाहबाह्य संबंधांमुळे मोडला होता संसार

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सैफ आणि त्याची पूर्वाश्रमीची पत्नी अमृता सिंग यांच्या वयात 12 वर्षांचे अंतर आहे. सैफ अमृतापेक्षा 12 वर्षांनी लहान आहे.

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खानचा आज वाढदिवस असून त्याने वयाची 51 वर्षे पूर्ण केली आहेत. सैफ अली खानचे वडील मन्सूर अली खान पतौडी हे भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार होते, त्यांनी अभिनेत्री शर्मिला टागोरशी लग्न केले होते. सैफने आईच्या पावलावर पाऊल ठेवत सिनेसृष्टीत करिअर करण्याचा निर्णय घेतला. यश चोप्रा यांच्या 'परंपरा' या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते, त्यानंतर तो आशिक आवारा, पहचान आणि मैं खिलाडी तू अनाडी यांसारख्या चित्रपटांमध्ये झळकला.

सुरुवातीच्या काळात सैफ बॉलिवूडमध्ये स्वतःची फारशी छाप उमटवू शकला नाही. मात्र हळूहळू त्याचे करिअर रुळावर आले. सैफ आपल्या खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत राहिला. आज त्याच्या वाढदिवसाच्या खास निमित्ताने जाणून घेऊया त्याच्या जीवनाशी संबंधित काही गोष्टी-

पहिल्याच चित्रपटातून सैफला काढून टाकण्यात आले होते

1991 मध्ये सैफला राहुल रवैलच्या 'बेखुदी' या चित्रपटाची ऑफर देण्यात आली होती, या चित्रपटातून काजोल देखील सिनेसृष्टीत पदार्पण करणार होती. सैफने या चित्रपटाचे पहिले शूटिंग शेड्युलदेखील पूर्ण केले होते, परंतु त्याच्या अनप्रोफेशनल वृत्तीमुळे नाराज होऊन निर्मात्यांनी त्याच्या जागी कमल सदानाथला घेतले होते.

कशी होती सैफ-अमृताची लव्हस्टोरी

'दिल्लगी' चित्रपटाच्या सेटवरच सैफची अमृता सिंगसोबत पहिली भेट झाली होती. त्यावेळी अमृता तिच्या करिअरमध्ये यशोशिखरावर होती, तर सैफच्या अद्याप बॉलिवूडमध्ये फारसे यश मिळाले नव्हते. पहिल्याच भेटीत सैफ अमृतासाठी वेडा झाला होता. त्यांच्या पहिल्या डेटचा किस्सा खूप रंजक आहे. जेव्हा सैफने अमृताला बाहेर डिनरसाठी इनवाइट केले, तेव्हा मला बाहेर जाणे पसंत नाही, असे सांगून अमृताने त्याच्यासोबत डिनरसाठी जाण्यास नकार दिला होता. सिमी ग्रेवालच्या चॅट शोमध्ये सैफ आणि अमृता यांनी आपल्या फस्ट डेटच्या अनेक आठवणी शेअर केल्या होत्या. सैफने सांगितले होते, ''अमृताने बाहेर डिनरसाठी जाण्यास मला नकार दिला होता. मात्र नंतर तिने मला तिच्या घरीच डिनरसाठी इनवाइट केले. जेव्हा मी अमृताच्या घरी पोहोचलो, तेव्हा ती मेकअप काढत होती. तिला विना मेकअप बघून मी हैराण झालो होतो.''

दोन दिवस अमृताच्या घरीच थांबला होता सैफ
सैफने सांगितल्याप्रमाणे, अमृताने फस्ट डेटलाच त्याला किस केले होते. फस्ट डेटनंतर सैफ दोन दिवस अमृताच्या घरीच थांबला होता. या दोन दिवसांत सैफ-अमृता यांच्यात शारीरिक संबंध निर्माण झाले नव्हते. हे दोन दिवस आपण दुस-या खोलीत झोपल्याचे सैफ सांगायला मुळीच विसरला नव्हता.

घरच्यांपासून लपून केले होते सिक्रेट वेडिंग
तीन महिने डेट केल्यानंतर सैफ आणि अमृता यांनी 1991 मध्ये घरच्यांपासून लपून लग्न केले होते. कारण दोघेही घरच्यांना घाबरले होते. त्याचे कारण म्हणजे सैफ आणि अमृता यांच्या वयात असलेले अंतर. अमृता सैफपेक्षा वयाने तब्बल 12 वर्षे मोठी आहे. लग्नाच्या दोन दिवसाआधीच त्यांनी एकमेकांनाआयुष्यभराची साथ देण्याचे ठरवले होते.

घटस्फोटानंतर अमृताने सैफवर लावले होते गंभीर आरोप
13 वर्षे एकमेकांची साथ निभावल्यानंतर 2004 मध्ये सैफ आणि अमृता कायदेशीररित्या विभक्त झाले. सैफ आणि अमृता यांना सारा आणि इब्राहिम ही दोन मुले आहेत. घटस्फोटानंतर अमृताने सैफकडे पोटगी म्हणून पाच कोटी रुपये आणि मुलगा इब्राहिम 18 वर्षांचा होईपर्यंत दरमहा एक लाख रुपयांची मागणी केली होती. घटस्फोटानंतर अमृताने सैफवर आरोप केला होता की, तो तिला खर्चासाठी पैसे देत नाही आणि इतर महिलांसोबत त्याचे विवाहबाह्य संबंध आहेत.

रोजा कॅटलोनसोबत रिलेशनशिपमध्ये होता सैफ
अमृतापासून वेगळे झाल्यानंतर सैफ तीन वर्षे स्विस मॉडेल रोसा कॅटलोनासोबत रिलेशनशिपमध्ये होता. मात्र फार काळ हे नाते टिकू शकले नाही दोन वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर सैफसोबत तिचे ब्रेकअप झाले होते. इतकेच नाही तर या दोन वर्षांत रोजा सैफसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होती. मात्र 2007 मध्ये दोघांच्या ब्रेकअपच्या बातम्या समोर आल्या होत्या. एका मुलाखतीत रोजाने सैफविषयी अनेक धक्कादायक खुलासे केले होते. सैफ विवाहित असल्याचे तिला पहिल्या भेटीत ठाऊक नव्हते, असे तिने मुलाखतीत सांगितले होते. जेव्हा ती भारतात आली, तेव्हा सैफ घटस्फोटित असून दोन मुलांचा पिता असल्याचे तिला समजले होते.

रोजाने एका मुलाखतीत सांगितले होते, की तिची सैफसोबतची पहिली भेट ही केन्यात झाली होती. ती एका प्रोजेक्टच्या निमित्ताने सहा वर्षांसाठी तिथे गेली होती. सैफसोबतच्या भेटीनंतर तिने भारतात येण्याचा निर्णय घेतला होता. रोजाने 'शौर्य' या सिनेमात एक आयटम नंबर केला होता.

2007 मध्ये शाहिद कपूरसोबत करीनाचे ब्रेकअप झाले होते. शाहिदपासून विभक्त झाल्यानंतर करीनाची जवळीक सैफ अली खानसोबत वाढू लागली. ‘ओमकारा' या चित्रपटात फारच कमी सीन्स करीना-सैफने एकत्र शूट केले होते. मात्र तरीसुद्धा सेटवर हे दोघे कायम सोबत दिसायचे. जेव्हा करीनासोबत सैफचे सीन नसायचे, तेव्हा देखील तो सेटवर हजर राहात असे. ओमकारानंतर सैफ करीना यांच्यातील वाढलेली जवळीत यशराज बॅनरच्या ‘टशन' या चित्रपटाच्या शूटिंगवेळी दिसली होती. शूटिंगमधून फावला वेळ मिळाल्यानंतर दोघे लाँग वॉकवर जात असे.

या दोघांच्या अफेअरविषयी गॉसिप्स सुरु झाले होते. मात्र मीडियासोबत त्यांनी त्यांच्या नात्याची कबुली दिली नव्हती. पण लॅक्मे फॅशन वीकदरम्याम सैफ आणि करीना एका गाडीतून आले होते. येथे सैफने पहिल्यांदा करीनाला डेट करत असल्याचे स्वीकारले होते.

2012 मध्ये करीनाशी लग्न केले
तीन वर्षांच्या डेटिंगनंतर सैफने करीनाशी 2012 मध्ये लग्न केले. या लग्नात सैफची मुलगी सारा अली खान सहभागी झाली होती. या दोघांनी कोर्टमध्ये जाऊन लग्न केले होते.

लग्नाच्या दिवशी सैफने पूर्वाश्रमीची पत्नी अमृताला लिहिले होते पत्र
दिग्दर्शक करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये सैफने मुलगी सारा अली खानसोबत हजेरी लावली होती. त्यावेळी सैफने सांगितले की ‘त्याने लग्नाच्या दिवशी पूर्वाश्रमीची पत्नी अमृताला एक पत्र लिहिले होते. या पत्रात त्यांनी एकमेकांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. अमृताला पत्र पाठवण्यापूर्वी सैफने हे पत्र करीनाला वाचून दाखवले होते. सैफने या शोमध्ये सांगितले होते की, करीना खूप सपोर्टिव्ह आहे आणि तिनेच सैफला अमृताला पत्र पाठवायला सांगितले होते. वडिलांच्या या पत्रामुळेच सारा या लग्नात आनंदाने सहभागी झाली होती. साराने या शोमध्ये सांगितले होते की, "मी लग्नाला हजर राहणार होती, पण या पत्रामुळे मी खूप आनंदाने यात सहभागी झाली होती."

बातम्या आणखी आहेत...