आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Happy Birthday Bappi Da: Bappi Lahiri Considers Gold Lucky For Himself, Gets Inspired By American Rock Star's Elvis Presley's Look On His Struggling Days

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हॅपी बर्थडे बप्पी दा:संघर्षाच्या दिवसांत अमेरिकन पॉप स्टार एल्विस प्रेसलीकडून घेतली होती सोनं घालण्याची प्रेरणा, स्वतःसाठी सोनं मानतात लकी

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अभिनेता एल्विस प्रेसली हा माझा आवडता कलाकार असून तो कायम सोन्याची चेन घालतो. त्याला पाहून मला कायम प्रेरणा मिळत राहिली, असे बप्पी दा सांगतात.

प्रसिद्ध गायक आणि संगीतकार बप्पी लहरी यांची बॉलिवूडमध्ये वेगळी ओळख आहे. 27 नोव्हेंबरला बप्पी वयाची 68 वर्षे पुर्ण करत आहेत. त्यांचे खरे नाव आलोकेश लहरी आहे. फिल्म इंडस्ट्रीमध्ये डिस्को म्यूझिकचा ट्रेंड आणण्याचे श्रेय त्यांना दिले जाते. डिस्को म्युझिकसोबतच खुप जास्त सोने घालणे आणि नेहमी गॉगल्स घालणेही बप्पी यांची ओळख आहे.

संघर्षाच्या दिवसांत एल्विस प्रेसलीकडून मिळाली होती प्रेरणा
बप्पी दा यांनी आपल्या एका जुन्या मुलाखतीत ते एवढे सोने का घालतात यामागचे कारण सांगितले होते. ते म्हणाले होते, "हॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक आणि अभिनेता एल्विस प्रेसली हा माझा आवडता कलाकार असून तो कायम सोन्याची चेन घालतो. त्याला पाहून मला कायम प्रेरणा मिळत राहिली. इतकेच नाही तर, जर मी जीवनात यशस्वी झालो तर माझी एक स्वतंत्र ओळख निर्माण करेन असे ठरवले होते. त्यातच मला असे वाटते की सोनं माझ्यासाठी लकी आहे. त्यामुळेच मी कायम सोनं घालतो आणि त्यामुळेच गाण्यासोबत माझी वेगळी ओळखही झाली आहे."

बप्पी लहरी यांच्याजवळ किती आहे सोने-चांदी
2014 च्या निवडणूकीदरम्यान बप्पी यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता आणि पश्चिम बंगालच्या श्रीरामपुरमधून त्यांना तिकीट देण्यात आले होते. त्यावेळी त्याने आपल्याकडील सोने चांदी किती आहे ते जाहिर केले होते. त्यांच्याजवळ 754 सोने आणि 4.62 किलो चांदी आहे. हे त्यांनी सहा वर्षांपूर्वी सांगितले होते. आता यात वाढदेखील झाली असावी.

40 लाख रुपये आहे बप्पी दांकडे असलेल्या सोन्याचांदीची किंमत

2014 च्या निवडणुकीच्या काळात त्यांनी आपली संपत्ती जाहिर केली होती. निवडणुकी दरम्यान दिल्या गेलेल्या एफिडेविटनुसार, बप्पी दांकडे 754 सोने आणि 4.62 किलो चांदी आहे. सध्या सोन्याचा भाव हा 50 हजार 650 रुपये आहे. यानुसार त्यांच्याजवळ 40 लाखांचे सोने आहे.

पत्नी चित्राणीजवळ बप्पी दांपेक्षा अधिक सोने
बप्पी दांच्या पत्नी चित्राणी यादेखील सोने आणि डायमंडच्या शौकीन आहेत. 2014 मध्ये बप्पी दांनी सांगितल्यानुसार, त्यांच्या पत्नीजवळ 967 ग्रॅम सोन्याचे दागिने, 8.9 किलो चांदी आणि चार लाखांचे हीरे आहेत. यासोबतच बप्पी यांनी आपल्या घरात हिट गाण्याच्या आठवणीत गोल्ड प्लेटेड डिस्क लावली आहे. त्यांची एकुण संपत्ती 20 कोटी रुपये असल्याचे त्यांनी जाहिर केले होते.

नातवाला सोन्याच्या ताटात खाऊ घातली होती खीर
बप्पी दांचे आई-वडील बंगाली सिंगर आणि क्लासिक म्युझिशियन होते. कोलकातामध्ये बप्पी यांचा जन्म झाला. बप्पी लहरी हे आपल्या आई-वडीलांना एकुलते एक होते. आईच्या नात्यातून सिंगर आणि अॅक्टर किशोर कुमार त्यांचे नातेवाईक होते. बप्पी दांच्या आईचे नाव चित्रांशा आहे. बप्पी यांना दोन मुलं आहेत. मुलगी रीमाही सिंगर आहे. तिचे लग्न बिझनेसमन गोविंद बंसलसोबत झाले आहे. तर बप्पी दा यांच्या मुलाचे नाव बाप्पा लहरी असून तो संगीतकार आहे आणि त्याचे लग्न तनिषा वर्मासोबत झाले आहेत. त्याला एक मुलगा असून क्रिश हे त्याचे नाव आहे.

बप्पी लहरी यांचा नातू क्रिशचा जन्म 4 ऑक्टोबर 2017 मध्ये झाला होता. नातवाच्या नामकरणावेळी बप्पी लहरी यांना आपल्या नातवाला सोन्याच्या ताटात खीर खाऊ घातली होती आणि डायमंड पेंडंट गिफ्ट केले होते.

बप्पी लहरी आणि त्यांचा नातू
बप्पी लहरी आणि त्यांचा नातू

वयाच्या तिस-या वर्षापासून घेतले संगीताचे धडे
बप्पी यांचे कुटुंब संगीताशी संबंधीत होते. यामुळे त्यांची ट्रेनिंग वयाच्या तिस-या वर्षीच सुरु झाली. तिस-या वर्षापासून बप्पी यांनी तबला वाजवणे सुरु केले. वयाच्या 19 वर्षी मुंबईमध्ये आल्यानंतर त्यांना बंगाली फिल्म (दादू,1972) मधून पहिला ब्रेक मिळाला. तर 1973 मध्ये आलेला 'शिकारी' हा त्यांचा पहिला हिंदी चित्रपट होता. यासाठी त्यांनी म्युझिक कंपोज केले होते.

1980 आणि 90 च्या दशकात बप्पी दा यांनी जबरदस्त साउंड ट्रॅक्स बनवले. यामध्ये वारदात, डिस्को डान्सर, नमक हलाल, डान्स डान्स, कमांडो, गँग लीडर, शराबी सारखे चित्रपटांचा समावेश आहे. ते पहिले असे संगीतकार होते ज्यांना 1982 मध्ये आलेल्या 'डिस्को डान्सर'साठी बीचिंगमध्ये 'चायना अवॉर्ड' मिळाला होता.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser