आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Happy Birthday Big B: After Getting Rejected For Radio Job, Amitabh Bachchan Worked In A Shipping Company To Run The Expenses, The Actor Was Blacklisted By Giving 12 Flop Films

79 वर्षांचे झाले महानायक:शिपिंग कंपनीत नोकरी करायचे अमिताभ बच्चन, 12 फ्लॉप चित्रपटांमुळे निर्मात्यांच्या ब्लॅकलिस्टमध्ये टाकले होते नाव

5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अमिताभ असे एक नाव आहे, ज्याची प्रसिद्धी कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.

'अँग्री यंग मॅन' ते 'शहनशाह ऑफ बॉलिवूड'पर्यंतचा हा मोठा प्रवास अमिताभ बच्चन यांनी वयाची 79 वर्षे पूर्ण केली आहेत. सहसा काळा बदलतो त्याप्रमाणे लोकांची प्रसिद्धी कमी होते, मात्र अमिताभ असे एक नाव आहे, ज्याची प्रसिद्धी कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अमिताभ यांना आपल्या चित्रपटात घेण्यासाठी निर्माते आतुर असतात, तर स्क्रिप्ट रायटर्स त्यांच्या पर्सनॅलिटीला शोभेल अशी स्क्रिप्ट लिहिण्याचे स्वप्न बघतात. बिग बींच्या कडक पर्सनॅलिटीमागे एक संवेदनशील अभिनेत्याचे रुप दडले आहे.

इन्कलाब श्रीवास्तव आहे बिग बींचे खरे नाव
11 ऑक्टोबर 1942 रोजी अलाहाबाद (आता प्रयागराज), उत्तर प्रदेश येथे अमिताभ यांचा जन्म झाला. अमिताभ यांच्या वडिलांनी त्यांचे नाव इन्कलाब ठेवले होते, हे कदाचितच कुणाला ठाऊक असेल. नैनीतालमधील शेरवुड स्कुलमध्ये असताना अमिताभ यांची रुची अभिनयात वाढू लागली. दिल्लीमध्ये महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते कोलकताला गेले. मात्र येथे त्यांचे मन रमले नाही. एक दिवस आपले मन जे सांगेल तेच करायचे असा दृढ निश्चय त्यांनी केला.

कोलकतामधील शिपिंग कंपनीची चांगली नोकरी सोडून त्यांनी मुंबईत पाऊल ठेवले. सडपातळ आणि उंच कदकाठी असलेल्या तरुणाने स्वप्न नगरी मुंबईत पाऊल ठेवले खरे, मात्र या मुंबईत स्वतःचे अस्तित्व निर्माण करणे सोपे नव्हते. या मुंबईने त्यांना सहजासहजी स्वीकारले नाही. करिअरच्या सुरुवातीच्या काळात त्यांच्या पदरी केवळ निराशाच पडली. जिथे कुठे ते काम मागायला जायचे, तिथे कधी त्यांची हाईट तर कधी रंगरुप त्यांच्या मार्गात अडथळा निर्माण करणारे ठरत होते. कोणताच निर्माता-दिग्दर्शक त्यांना आपल्या चित्रपटात घेण्यासाठी उत्सुक नव्हता. त्याकाळात 6 फुट 3 इंच उंची असलेल्या अभिनेत्याला आपल्या चित्रपटात घेण्यासाठी कुणीच धजावत नव्हते. उंचीमुळे चित्रपट मिळत नाही, म्हणून अमिताभ यांनी आपल्या आवाजाच्या जोरावर यश मिळवण्याचे ठरवले, मात्र येथेही त्यांच्या पदरी निराशाच आली.

रेडिओत नाकारली गेली होती नोकरी
आवाज चांगला नाही म्हणून ऑल इंडिया रेडिओने त्यांना नोकरी नाकारली. प्रत्येक ठिकाणी अपयशच मिळत असल्यामुळे एके दिवशी त्यांनी निराश होऊन परतायचे ठरवले. त्याचदरम्यान त्यांना 'सात
हिंदुस्थानी' हा चित्रपट ऑफर झाला. चित्रपट फारसे यश कमावू शकला नाही. मात्र याच चित्रपटासाठी अमिताभ यांना बेस्ट न्यूकमरचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. पण या पुरस्कारानेही त्यांचे नशीब चमकले नाही.

सक्षम अभिनय असतानाही त्यांना मिळणारे यश हे नाहीच्या बरोबरीत होते. त्यांनी अनेक चित्रपटात छोटे-मोठे रोल केले. काही चित्रपटासांठी त्यांनी व्हाईस ओवरही केला. स्ट्रगलिंगच्या या दिवसात त्यांना 'आनंद' हा चित्रपट मिळाला. ऋषिकेश मुखर्जींच्या या चित्रपटात राजेश खन्ना नावाचा सुपरस्टार असतानाही अमिताभ यांनी या चित्रपटात काम करण्याची तयारी दर्शवली. या चित्रपटासाठी अमिताभ यांना सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. 'आनंद' चित्रपट सुपरहिट ठरला. मात्र हा तरुण ठिकठाक अभिनय करतो एवढीच स्वतःची ओळख अमिताभ त्या काळात निर्माण करु शकले होते. पण 'जंजीर' या चित्रपटाने अमिताभ यांची सगळी स्वप्ने पूर्ण केली. 'जंजीर' हा अमिताभ यांच्या करिअरमधील 13 वा चित्रपट आहे.

'जंजीर'मुळे झाली करिअरची सकाळ
'जंजीर' चित्रपटाने अमिताभ यांचे आयुष्यच पालटून गेले. या चित्रपटाने यशाबरोबर त्यांना आयुष्याची जोडीदार मिळवून दिली. या चित्रपटादरम्यान जया भादुडीबरोबर अमिताभ यांची भेट झाली. याच चित्रपटाने अमिताभ यांना अँग्री यंग मॅनची इमेज मिळवून दिली. 1970 च्या सुरुवातीच्या काळात अमिताभ यशस्वी झाले होते, मात्र अजून स्टारडम मिळायला वेळ होता. याच दशकात अमिताभ यांचे 'दीवार' आणि 'शोले' हे दोन मेगा ब्लॉकबस्टर चित्रपट रिलीज झाले. 'शोले'मध्ये अमिताभ यांनी जयची व्यक्तीरेखा साकारली होती. चित्रपटात जयचा मृत्यू झाला, मात्र अमिताभ नावाचा झंझावात
उदयाला आला. त्यानंतर 'दीवार'ला मिळालेल्या यशामुळे अमिताभ बॉलिवूडमध्ये 'वन मॅन इंडस्ट्री'च्या नावाने ओळखले जाऊ लागले. एकेकाळी साईड रोल करणारे अमिताभ सेल्युलॉईडची जणू आत्माच बनले. अमिताभ यांच्या प्रसिद्धीपुढे दुसरे अभिनेते टिकू शकले नाही. यानंतर अमिताभ यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.

'अमर अकबर एन्थोनी', 'डॉन', 'त्रिशुल', 'काला पत्थर', 'सिलसिला' यांसारखे एकापाठोपाठ एक हिट चित्रपट त्यांनी बॉलिवूडला दिले. 'कूली' चित्रपटादरम्यान अमिताभ यांना जीवघेणा अपघात झाला. सेटवर मारहाणीच्या दृश्यादरम्यान ते गंभीर जखमी झाले. बरे होण्यासाठी त्यांना मोठा काळ लागला. यावेळी अमिताभ लवकरात लवकर बरे व्हावे, म्हणून देशभरात प्रार्थना होऊ लागल्या. चाहत्यांच्या प्रेमामुळेच आज जिवंत असल्याचे अमिताभ प्रांजळपणे कबूल करतात.

'केबीसी'मुळे झाला नवा जन्म
अमिताभ बच्चन यांनी 'अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लिमिटेड' नावाची कंपनी स्थापन केली होती. या कंपनीने काही चित्रपटांची निर्मिती केली, मात्र सगळे चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटले. त्यांनी अनेक ठिकाणांहून कर्ज घेतेल, मात्र अखेर कंपनी डुबली. त्याचदरम्यान त्यांचे चित्रपटही फ्लॉप ठरु लागले. तेव्हा 2000 हे वर्ष अमिताभ यांच्यासाठी आशेचे किरण घेऊन उगवले. यावर्षी 'कौन बनेगा करोडपती' नावाचा गेम शो होस्ट करण्याची त्यांना संधी मिळाली. या कार्यक्रमाद्वारे त्यांनी इतिहासात नवीन अध्याय रचला. या कार्यक्रमाला तुफान लोकप्रियता मिळाला आणि जणू अमिताभ यांचा नवा जन्मच झाला. अमिताभ यांनी आपल्यावरचे सगले कर्ज चुकते करुन पुन्हा नव्याने कंपनी स्थापन केली.

बातम्या आणखी आहेत...