आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Happy Birthday Bobby Deol: Soldier Bobby Deol Had Become An Alcoholic When He Could Not Work In Films, Salman Khan Extended His Helping Hand

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हॅपी बर्थडे सोल्जर:फ्लॉप करिअर आणि चित्रपटात काम मिळणे बंद झाल्याने दारुच्या आहारी गेला होता बॉबी देओल, अडचणीच्या काळात सलमानने दिला होता मदतीचा हात

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • चांगल्या ऑफर्स न मिळाल्यामुळे बॉबीला अस्वस्थ राहू लागला आणि याचकाळात तो दारूच्या आहारी गेला.

बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल आज 52 वर्षांचा आहे. 1995 मध्ये बरसात या चित्रपटाद्वारे या अभिनेत्याने बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला होता. बादलची भूमिका वठवणा-या बॉबीला पहिल्याच चित्रपटातून लोकप्रियता मिळाली आणि सोबतच त्याने फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट डेब्यू पुरस्कारही आपल्या नावी केला होता. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात हिट चित्रपट देणा-या बॉबीला कालांतराने मात्र फक्त सहायक भूमिका मिळू लागल्या. चांगल्या ऑफर्स न मिळाल्यामुळे बॉबीला अस्वस्थ राहू लागला आणि याचकाळात तो दारूच्या आहारी गेला. आज, बॉबीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊयात त्याच्या या संघर्षाविषयी..

वयाच्या 8 व्या वर्षापासून करतोय अभिनय

बॉबी देओलने ‘बरसात’या चित्रपटातून लीड हीरो म्हणून आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. या चित्रपटात ट्विंकल खन्नासोबत बॉबी रोमान्स करताना दिसला होता. पण बरसात हा त्याचा पहिला चित्रपट नाहीये. बॉबीने यापूर्वी बालकलाकार म्हणून पहिल्यांदा कॅमेरा फेस केला होता. विशेष म्हणजे वडील धर्मेंद्र यांच्याच चित्रपटात त्याला पहिल्यांदा काम करण्याची संधी मिळाली होती. 1977 मध्ये आलेल्या धर्मेंद्र स्टारर ‘धरम-वीर’ या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले होते. त्यावेळी बॉबी अवघ्या 8 वर्षांचा होता.

यानंतर 1995 साली रिलीज झालेल्या बरसात या चित्रपटातून बॉबीसह ट्विंकल खन्ना हिनेदेखील चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. चित्रपटासाठी ट्विंकलची निवड बॉबीचे वडील धर्मेंद्र यांनी केली होती.

पहिल्या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान पाय मोडला होता
बरसात या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान पहिल्या सीनमध्ये बॉबीला अपघात झाला होता. घोड्यावर स्वार झालेल्या बॉबीचा घोडा दुस-या घोड्यावर आदळला होता त्यामुळे बॉबीच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. या अपघातानंतर त्याला तातडीने स्कॉटलंडहून लंडन येथे शस्त्रक्रियेसाठी नेण्यात आले. पाय मोडल्यामुळे बॉबी आपल्या पहिल्या चित्रपटाच्या प्रमोशन इव्हेंटमध्ये सहभागी होऊ शकला नव्हता.

बरसातनंतर बॅक-टू-बॅक बॉबीने और प्यार हो गया, करीब, सोल्जर, दिललगी, अपने आणि यमला पगला दीवानासह बर्‍याच चित्रपटांमध्ये दिसला. सुरुवातीच्या काही चित्रपटांनंतर बॉबीची लोकप्रियता हळूहळू कमी होऊ लागली आणि त्याला चित्रपटांत सहायक भूमिका मिळू लागल्या.

काम न मिळाल्यामुळे दारुच्या आहारी गेला होता बॉबी

बॉबी देओलला बॉलिवूड चित्रपटांमध्ये चांगल्या ऑफर मिळणे बंद झाले. यामुळे अभिनेता अस्वस्थ राहू लागला आणि तो नशेच्या आहारी गेला. एका जुन्या मुलाखतीत बॉबी म्हणाला होता, 'मी इतका दारु पिऊ लागलो होतो की, मला माझीच कीव येत होती. मला वाटायचे की माझ्यात काय कमी आहे, ज्यामुळे लोक माझ्यासोबत काम करु इच्छित नाहीत. मी दारुला जवळ करुन स्वतःला लोकांपासून दूर केले.'

मुलांसाठी केले पुनरागमन
हफिंग्टन पोस्टला दिलेल्या मुलाखतीत बॉबी पुढे म्हणाला होता, "मी माझ्या वाईट काळात माझ्या मुलांचा चेहरा पाहिला आणि ते माझ्याबद्दल काय विचार करत असतील याचा विचार केला. माझ्या आई आणि बायकोच्या डोळ्यातही मीच तीच गोष्ट पाहिली. हे समजल्यावर मला माझाच तिरस्कार वाटू लागला. मी स्वतःला का संपवतोय, याचा विचार मी केला. मला जाणवलं की जर मला काहीतरी करायचे असेल तर त्यासाठी मला कठोर मेहनत घ्यावी लागेल. आणि मग मी स्वत: वर काम केले आणि परत येण्याचा निर्णय घेतला.'

सलमान खानने दिला मदतीचा हात
आपल्या 50 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिलेल्या मुलाखतीत बॉबी देओल म्हणाला की, सलमान खानने मला कमबॅक करण्यास मदत केली. बॉबीने सांगितले की, सीसीएल (सेलिब्रिटी क्रिकेट लीग) दरम्यान त्याची सलमान खानसोबत भेट झाली होती. तिथे सलमानने त्याला दाढी का वाढवली असा प्रश्न विचारला. सोबतच प्रत्येकाच्या आयुष्यात एक कठीण काळ येतो, त्यासमोर हात ठेकवायला नको, असे तो मला म्हणाला.

या भेटीनंतर लवकरच सलमान खानने बॉबीला फोन करुन तू दाढी काढशील का? असे विचारले. यावर बॉबीने लगेच हो म्हणून सांगितले आणि सलमानने त्याला रेस 3 चित्रपटाची ऑफर दिली..

ओटीटीद्वारे पुन्हा ओळख मिळाली

2018 मध्ये रिलीज झालेला रेस 3 हा चित्रपट फ्लॉप झाला होता. यानंतर बॉबी यमला पगला दिवाना फिर से आणि हाऊसफुल 4 मध्ये झळकला होता. सलग फ्लॉप चित्रपटानंतर बॉबी देओलला ओटीटी प्लॅटफॉर्मचा सहारा मिळाला. 2020 मध्ये नेटफ्लिक्सच्या क्लास ऑफ 83 आणि आणि एमएक्स प्लेयरच्या आश्रम या वेब सीरिजमध्ये बॉबी झळकला. आश्रम या सीरिजमधील बाबाची भूमिका साकारणार्‍या बॉबीचे प्रेक्षकांनी चांगलेच स्वागत केले. यानंतर बॉबी आता 2021 मध्ये लव्ह हॉस्टेल आणि अपने 2 या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

बातम्या आणखी आहेत...