आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Happy Birthday Deepika Padukone: Before Deepika Padukone, Dozens Of Actresses Debuted With Shah Rukh Khan, Some Were Hits And Some Were Flops

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हॅपी बर्थडे दीपिका पदुकोण:दीपिकापूर्वी शाहरूख खानसोबत या अभिनेत्रींनी केला होता डेब्यू, काही ठरल्या हिट तर काहींवर बसला फ्लॉपचा ठपका

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 2007 मध्ये ओम शांती ओम या चित्रपटाद्वारे दीपिकाने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता.

बॉलिवूडमधील एक उत्कृष्ट अभिनेत्री असलेली दीपिका पदुकोण हिचा आज वाढदिवस असून तिने वयाची 35 वर्षे पूर्ण केली आहेत. 2007 मध्ये ओम शांती ओम या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. या चित्रपटात तिला बॉलिवूडचा किंग शाहरुख खानसोबत झळकण्याची संधी मिळाली होती. या चित्रपटासाठी दीपिकाला सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.

पहिल्याच चित्रपटातून दीपिकाला प्रचंड लोकप्रियता मिळाली आणि त्यानंतर तिला एकामागून एक हिट चित्रपटांच्या ऑफर मिळाल्या. दीपिकाआधीही ब-याच अभिनेत्रींनी शाहरुख खानबरोबर बॉलिवूड करिअरची सुरूवात केली होती, त्यापैकी बहुतेक जणी या बॉलिवूडमध्ये हिट ठरल्या. चला जाणून घेऊया या अभिनेत्री कोण आहेत -

अनुष्का शर्मा - रब ने बना दी जोडी

अभिनेत्रीसोबतच आता निर्माता बनलेली अनुष्का शर्मा हिने 2008 मध्ये रब ने बना दी जोडी या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली होती. या चित्रपटात शाहरुखचे एक वेगळे रूप पाहायला मिळाले होते. चित्रपटात अनुष्का एक सामान्य गृहिणीची भूमिका साकारली होती, जिला नृत्याची आवड असते. या चित्रपटासाठी अनुष्काला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ट पदार्पणाचे नामांकन मिळाले होते. पहिल्या हिटनंतर अनुष्का बदमाश कंपनी आणि बँड बाजा बारात सारख्या चित्रपटांमध्ये दिसली. पीके, दिल धडकने दो, ऐ दिल है मुश्किल, सुलतान यासारख्या अनेक हिट चित्रपटात अनुष्काने काम केले.

माहिरा खान-रईस

पाकिस्तानमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री माहिरा खानने शाहरुखबरोबर 2017 मध्ये रिलीज झालेल्या रईस या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. पण यावर्षी भारत आणि पाकिस्तानमधील ताणलेल्या संबंधांमुळे सर्व पाकिस्तानी कलाकारांना भारतात बंदी घातली गेली. याचा परिणाम असा झाला की माहिराला तिच्या पहिल्या चित्रपटाचा प्रचार करता आला नाही आणि ती भारतातही येऊ शकली नाही. हा चित्रपट खूपच चांगला गाजला होता, परंतु माहिराचा बॉलिवूडचा प्रवास पुढे जाऊ शकला नाही.

प्रीती झिंटा - दिल से

डिंपल गर्ल प्रीती झिंटाने 1998 मध्ये दिल से या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. या चित्रपटात प्रीतीची मुख्य भूमिका नसली तरी तिच्या अभिनयाची प्रेक्षकांनी चांगलीच प्रशंसा केली. पहिल्या चित्रपटानंतर, प्रीतीला अनेक चित्रपटांच्या ऑफर मिळाल्या. यानंतर तिने सोल्जर आणि क्या कहना हे चित्रपट साइन केले होते. हे दोन्ही चित्रपट अभिनेत्रीसाठी मोठा ब्रेक ठरले.

शिल्पा शेट्टी - बाजीगर​​​​​​​​​​​​​​

शिल्पा शेट्टीने काजोल आणि शाहरुख खान स्टारर बाजीगर या चित्रपटात सेकंड लीड साकारुन बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात शिल्पाचे एक छोटेसे पण महत्त्वाचे पात्र होते ज्याला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळाले. हा चित्रपट सुपरहिट ठरला. यासाठी शिल्पाला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री आणि लक्स न्यू फेसचे नामांकन देखील प्राप्त झाले. त्यानंतर शिल्पाने आग या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती.

महिमा चौधरी - परदेस​​​​​​​​​​​​​​

1997 मध्ये रिलीज झालेल्या सुभाष घई यांच्या ‘परदेस’ या चित्रपटाद्वारे महिमा चौधरीने शाहरुख खानबरोबर बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. या दोघांच्या जोडीला प्रेक्षकांची पसंतीची पावती मिळाली होती. महिमाला डेब्यू चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट डेब्यू अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.

सुचित्रा कृष्णमूर्ती- कभी हां कभी ना

शाहरुख खान आणि सुचित्रा कृष्णमूर्ती कुंदन शाह दिग्दर्शित ‘कभी हा कभी ना’ चित्रपटात एकत्र दिसले होते. सुचित्राचा हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट जबरदस्त हिट ठरला पण सुचित्रा यापुढे कोणत्याही मोठ्या चित्रपटाचा भाग होऊ शकली नाही. दीर्घ काळानंतर 2005 मध्ये आलेल्या 'माय वाइव्स मर्डर' या चित्रपटात सुचित्रा अनिल कपूर सोबत झळकली होती.

गायत्री जोशी - स्वदेश

2004 मध्ये प्रदर्शित केलेला स्वदेश हा चित्रपट एक कल्ट क्लासिक ठरला. अभिनेत्री गायत्री जोशीने शाहरुख खानसोबत या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. चित्रपटातील गायत्रीच्या अभिनयाचे समीक्षकांकडून खूप कौतुक झाले. पण या एका चित्रपटानंतरच गायत्रीने इंडस्ट्री मधून गायब झाली.

बातम्या आणखी आहेत...