आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Happy Birthday Deepika Padukone: Left Her Studies Incomplete To Become A Model, Himesh Gave Her First Break In The Industry From Album; Farah Cast Her In Om Shanti Om

हॅपी बर्थडे दीपिका पदुकोण:मॉडेल बनण्यासाठी शिक्षण अर्धवट सोडले, हिमेशने अल्बमद्वारे दिला इंडस्ट्रीत पहिला ब्रेक; फराहची नजर पडल्यावर झाली स्टार

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बॅडमिंटन खेळाडू प्रकाश पदुकोण यांची लेक आहे दीपिका

बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री दीपिका पदुकोण आज 36 वर्षांची झाली आहे. दीपिका एकेकाळी राष्ट्रीय स्तरावरील बॅडमिंटन खेळाडू होती. पण मॉडेलिंग करिअरसाठी तिने स्पोर्ट्सकडे पाठ फिरवली. लहानपणी आत्मविश्वासाच्या कमतरतेमुळे ती लोकांना भेटायला आणि मैत्री करायला घाबरायची, पण आज या अभिनेत्रीचे जगभरात चाहते आहेत. तिच्या वाढदिवसाच्या खास निमित्ताने जाणून घेऊया अभिनेत्रीचा चित्रपट प्रवास -

बॅडमिंटन खेळाडू प्रकाश पदुकोण यांची लेक आहे दीपिका

5 जानेवारी, 1986 रोजी डेन्मार्कच्या कोपेनहेगन शहरात दीपिकाचा जन्म झाला. दीपिका ही इंटरनॅशनल बॅडमिंटन प्लेअर प्रकाश पदुकोण यांची मुलगी आहे. दीपिकाची आई उजाला या ट्रॅवल एजंट आणि धाकटी बहीण अनिशा गोल्फर आहे. दीपिका एक वर्षाची असताना तिचे आईवडील बंगळुरुमध्ये सिफ्ट झाले होते.

शिक्षण सोडून वळली मॉडलिंगकडे
बंगळूरच्या सोफिया हायस्कूलमधून शालेय शिक्षण आणि माऊंट कार्मल कॉलेजमधून दीपिकाने प्री-यूनिव्हर्सिटी एज्युकेशन पूर्ण केले. त्यानंतर दीपिकाने बीए (सोशिओलॉजीध्ये) करण्याच्या उद्देशाने इंदिरा गांधी नॅशनल ओपन यूनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतला. मात्र शिक्षण अर्ध्यावर सोडून ती मॉडेलिंग क्षेत्राकडे वळली. खरं तर वयाच्या 8 व्या वर्षीच दीपिकाने अनेक जाहिरातींमध्ये काम केले होते. टीन-एजमध्ये ती लिरिल आणि क्लोज-अपसह अनेक ब्रॅण्ड्सच्या जाहिरातीत झळकली. हिमेश रेशमियाच्या 'नाम है तेरा..' या अल्बममध्येही दीपिका झळकली.

'ओम शांति ओम'मधून मिळाला मोठा ब्रेक
2006 मध्ये दीपिकाने कन्नड फिल्म 'ऐश्वर्या'द्वारे रुपेरी पडद्यावर एन्ट्री घेतली. हा चित्रपट हिट ठरला. या चित्रपटाच्या रिलीजनंतर वर्षभराने दीपिकाला शाहरुख खानच्या अपोजिट 'ओम शांति ओम' या चित्रपटाद्वारे मोठा ब्रेक मिळाला. 'कॉकटेल', 'ये जवानी है दीवानी', 'चेन्नई एक्ट्रेस', 'गोलियों की रासलीला-रामलीला', 'हॅपी न्यू ईयर', 'पीकू', 'तमाशा' 'बाजीराव मस्तानी', 'पद्मावती' यांसह अनेक चित्रपटांमध्ये उत्कृष्ट परफॉर्मन्स देऊन दीपिका प्रेक्षकांची आवडती अभिनेत्री बनली.

फॅशन गुरु प्रसाद बिडाप यांना दीपिकाला मॉडेलिंग क्षेत्रात आणण्याचे श्रेय जाते. प्रसाद हे स्वतः एक प्रसिद्ध कोरिओग्राफर, स्टायलिस्ट, फॅशन जर्मालिस्ट, उद्यमी आणि सोशलाइट आहेत. दीपिकासोबतच त्यांनी अनुष्का शर्मा आणि लारा दत्तालासुध्दा मॉडेलिंगमध्ये खूप मदत केली. त्यांनी एका मुलाखतीत सांगितल्यानुसार, बॅडमिंटन खेळाडू असताना दीपिका अभिनेत्री होण्याचे उराशी बाळगत होती. फराह खान 'ओम शांती ओम' या पहिल्या चित्रपटावेळी तिच्यावर नाराज होती. प्रसाद यांच्या सांगण्यानुसार, फराहने आपल्या चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून दीपिकाची निवड केली होती. परंतु तिच्याकडे पाहून फराहला वाटले होते की, ही चांगला अभिनय, डान्स आणि चांगली हिंदी बोलू शकेल का? परंतु जेव्हा तिने स्क्रिन टेस्टदरम्यान दीपिकाला स्क्रिनवर पाहिले तेव्हा तिचा दीपिकाविषयीचा दृष्टीकोन बदलला. प्रसाद यांच्यानुसार, दीपिकाला ऑनस्क्रिन पाहिल्यानंतर आपल्या चित्रपटात हिच अभिनेत्री असेल असा निश्चय केला.

361 कोटींची मालकीण आहे दीपिका

दीपिका वर्षाला 40 कोटींची कमाई करते. प्रत्येक चित्रपटासाठी ती 10 कोटी रुपये मानधन घेते. 2014 मध्ये ती रजनीकांत यांच्यासह कोचादाइयां या चित्रपटात दिसली होती. दोन दिवसांच्या चित्रीकरणासाठी तिला 3 कोटी मिळाले होते. प्रत्येक जाहिरातीसाठी दीपिका 50 लाख रुपये फी घेत. नुकत्याच आलेल्या 83 चित्रपटासाठी तिने 13 कोटी रुपये मानधन घेतले होते. तर शाहरुख खानसोबतच्या पठाणसाठी तिने 15 कोटी रुपये घेतले आहेत. चित्रपटांव्यतिरिक्त दीपिका ब्रॅण्ड एंडोर्समेंटमधून मोठी कमाई करते.

दीपिकाने 2010 मध्ये मुंबईत 4 बीएचके फ्लॅट खरेदी केलाी होता. पती रणवीर सिंगसह ती याच घरात वास्तव्याला आहे. मुंबईव्यतिरिक्त दीपिकाने दिल्ली, अलीबाग येथे प्रॉपर्टीत गुंतवणूक केली आहे.

कार कलेक्शनविषयी बोलायचे झाले तर दीपिकाजवळ मर्सिडीज Maybach S500 (1.67 कोटी रुपये), ऑडी ए 8 (1.56 कोटी रुपये), ऑडी क्यू 7 (93.35 लाख रुपये), बीएमडब्ल्यू 5 सीरिज (64 लाख रुपये), मिनी कूपर Cabriolet(36.1 लाख रुपये) या कार आहेत.

बातम्या आणखी आहेत...