आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Happy Birthday Dimple Kapadia: When She Came To Films In 15 Years, Society Evicted The Family, Left Films For Marriage, But Made Headlines After Returning

हॅपी बर्थडे:सिनेसृष्टीत पाऊल ठेवल्यानंतर समाजाने कुटुंबाला केले होते बहिष्कृत, लग्नानंतर सिनेसृष्टीला ठोकला होता रामराम

इफत कुरेशीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जाणून घेऊया कसा आहे डिंपल यांचा प्रवास-

एकेकाळच्या सुप्रसिद्ध अभिनेत्री डिंपल कपाडिया आज 65 वर्षांच्या झाल्या आहेत. डिंपल यांनी वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी बॉबी या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. डिंपल बालपणापासूनच एवढ्या सुंदर होत्या की, त्यांना सिनेसृष्टीत लाँच करण्यासाठी अनेक निर्मात्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला होता. अनेक चित्रपटांना नकार दिल्यानंतर, शेवटी त्यांनी राज कपूर यांच्या बॉबीमधून पदार्पण केले.

जेव्हा त्या चित्रपटात आल्या तेव्हा त्यांच्या संपूर्ण कुटुंबाना समाजातून बहिष्कृत करण्यात आले होते. डिंपल यांचा पहिला चित्रपट हिट ठरला, पण त्यांनी राजेश खन्ना यांच्याशी लग्न करण्यासाठी चित्रपटसृष्टीला रामराम ठोकला. वैवाहिक आयुष्यात अडचणी निर्माण झाल्यानंतर डिंपल यांनी 11 वर्षांनी पुन्हा सिनेसृष्टीत पुनरागमन केले आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींमध्ये स्थान मिळवले.

चित्रपटांव्यतिरिक्त वैवाहिक जीवन, कमी वयाच्या हिरोसोबतचे अफेअर आणि बोल्डनेस यामुळे डिंपल अनेकदा चर्चेत राहिल्या आहे. 82 चित्रपटांमध्ये झळकलेल्या डिंपल यांना एक राष्ट्रीय पुरस्कार आणि तीन फिल्मफेअर पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

आज त्यांच्या वाढदिवसाच्या खास निमित्ताने जाणून घेऊया कसा आहे डिंपल यांचा प्रवास-

अमिना आहे डिंपल यांचे खरे नाव
डिंपल यांचा जन्म 8 जून 1957 रोजी गुजराती व्यापारी चुन्नीभाई आणि बेट्टी यांच्या घरी झाला. जन्मानंतर डिंपल यांचे नाव 48 वे इमाम आगा खान-3 यांनी अमिना ठेवले. चार भावंडांमध्ये अमिना सर्वात मोठी होती. त्यांचे वडील प्रसिद्ध उद्योगपती होते, त्यामुळे त्यांचा सिनेसृष्टीतील लोकांशी चांगला परिचय होता.

जेव्हा घरात इंडस्ट्रीची चर्चा रंगू लागली तेव्हा डिंपल यांनीही अभिनयात करिअर करण्याचा निर्णय घेतला. डिंपल लहानपणापासूनच मॅच्युअर होत्या आणि त्यांना स्वतःहून मोठ्या लोकांशी मैत्री करायला आवडत असे. सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलमध्ये त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. डिंपल इतक्या सुंदर होत्या की, त्यांना लहानपणापासूनच चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या.

वडिलांच्या मदतीने मिळाला होता पहिला चित्रपट, पण भूमिका मिळाली नाही

वडिलांचे इंडस्ट्रीत संपर्क असताना त्यांनी आपली मुलगी डिंपलची एचएस रवैल यांच्याकडे त्यांच्या 'संघर्ष' या चित्रपटात काम देण्याची शिफारस केली. या चित्रपटात डिंपल वैजयंती यांच्या बालपणीची भूमिका साकारणार होती, मात्र ती लूकमध्ये इतकी मॅच्युअर होती की तिला चित्रपटातून वगळण्यात आले. त्याचवेळी डिंपलने 1970 मध्ये आलेला गुड्डी चित्रपटही नाकारला होता.

वयाच्या14 व्या वर्षी मिळाला होता राज कपूर यांचा चित्रपट
चित्रपट निर्मितीत तोटा झाल्यामुळे राज कपूर कर्जबाजारी झाले होते. कर्जातून बाहेर पडण्यासाठी ते बॉबी हा चित्रपट करत होते. बजेट कमी होते, त्यामुळे चित्रपटात मोठा हिरो घेण्याऐवजी राज कपूर यांनी त्यांचा मुलगा ऋषी कपूरला कास्ट केले.

या चित्रपटासाठी ते नव्या चेहऱ्याच्या शोधात होते. राज कपूर यांच्या जवळच्या मित्राने त्यांना डिंपलचे नाव सुचवले, जे डिंपल यांच्या वडिलांचेदेखील मित्र होते. वयाच्या 14 व्या वर्षी जेव्हा डिंपल आरके प्रॉडक्शन हाऊसमध्ये पोहोचली आणि स्क्रीन टेस्ट दिली तेव्हा राज कपूर प्रभावित झाले आणि डिंपल यांना बॉबी (1972) मध्ये ऋषी कपूरसोबत कास्ट करण्यात आले.

शूटिंगदरम्यान ऋषीसोबतची जवळीक वाढली होती

14 वर्षीय डिंपल आणि 21 वर्षीय ऋषी कपूर एकत्र शूटिंग करताना जवळ आले. या दोघांच्या अफेअरच्या बातम्यांनीही बरीच चर्चा एकवटली होती. पण राजेश खन्ना यांची एंट्री होताच त्यांचे नाते तुटले.

पहिल्याच नजरेत डिंपलच्या प्रेमात पडले होते राजेश
नवरंगपुरा स्पोर्ट्स क्लबमध्ये आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून राजेश खन्ना आले होते. या कार्यक्रमाला डिंपल कपाडियाही पोहोचल्या होत्या. डिंपल यांना क्लबमध्ये पाहून राजेश त्यांच्या प्रेमाच वेडे झाले होते. दुसरीकडे, डिंपल देखील लहानपणापासून राजेश खन्ना यांची मोठी फॅन होती.

वयाच्या 15 व्या वर्षी दुप्पट वयाच्या राजेश यांच्याशी बांधली लग्नगाठ
दोघे काही वेळा भेटले आणि नंतर प्रेमात पडले. राजेश खन्ना यांनी डिंपल यांना लग्नाची मागणी घातली तेव्हा त्यांनी वेळ न दवडता होकार दिला. त्याचवेळी डिंपल आणि ऋषीची जवळीकही चर्चेत होती. ऋषी यांनी डिंपलला अंगठी दिली होती, राजेश यांना ही गोष्ट कळताच त्यांनी डिंपलला आपले प्रेम सिद्ध करण्यासाठी अंगठी फेकण्यास सांगितले. डिंपल यांनी लगेच अंगठी समुद्रात फेकली. 27 मार्च 1973 रोजी दोघांचे लग्न झाले. त्यावेळी राजेश 30 आणि डिंपल 15 वर्षांची होत्या.

लग्नाच्या 6 महिन्यांनंतर 'बॉबी' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने डिंपल यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळवून दिला होता. हा चित्रपट खूप हिट ठरला. या चित्रपटात डिंपल यांनी परिधान केलेले कपडे देशभरात ट्रेंड बनले होते. डिंपल यांच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. त्यांची मोठी फॅन फॉलोइंग तयार झाली. पण पती राजेश खन्ना यांच्यासाठी त्यांनी इंडस्ट्री सोडली. डिंपल यांनी चित्रपटात काम न करता घरी लक्ष केंद्रित करावे, अशी राजेश यांची इच्छा होती.

9 वर्षांनंतर मोडला संसार
लग्नाच्या दुस-याच वर्षी डिंपल यांनी मुलगी ट्विंकलला जन्म दिला आणि 1977 मध्ये त्यांची दुसरी मुलगी रिंकीचा जन्म झाला. राजेश आणि डिंपल यांच्या नात्यात अचानक दुरावा निर्माण झाला. जेव्हा राजेश आणि टीना मुनीमच्या अफेअरची बातमी आली तेव्हा त्यांच्यातील भांडण विकोपाला गेले. अखेरीस 1982 मध्ये डिंपल राजेश खन्ना यांना सोडून आपल्या दोन मुलींसह माहेरी परतल्या.

लग्न मोडल्यानंतर 2 वर्षांनी कमबॅक

राजेश खन्ना यांच्यापासून विभक्त झाल्यानंतर, डिंपल यांना स्वतःला सिद्ध करायचे होते, ज्याचा एकमेव आधार होता चित्रपटांमध्ये कमबॅक करणे. डिंपल यांच्या एका मैत्रिणीने दिग्दर्शक रमेश सिप्पींना सांगितले की, डिंपलला सिनेसृष्टीत पुनरागमन करायचे आहे. रमेश यांनी त्यांना स्क्रीन टेस्टसाठी बोलावले. डिंपल तब्बल 11 वर्षांनंतर कॅमेऱ्यासमोर आल्या.

त्यांचा आत्मविश्वास इतका कमी झाला होता की, ती कॅमेऱ्यासमोर येताच थरथर कापायच्या. त्यांच्या स्क्रीन टेस्ट खरबा होत होत्या. पण रमेश यांनी त्यांना कास्ट केले. सागर हा चित्रपट होता, ज्यामध्ये त्या त्यांच्या पहिल्या चित्रपटाचे नायक ऋषी कपूर आणि कमल हासन यांच्यासोबत झळकल्या. हा चित्रपट एका वर्षानंतर प्रदर्शित झाला, त्यापूर्वी डिंपल यांचा जख्मी शेर (1984) प्रदर्शित झाला होता.

वादात सापडला होता 'सागर' चित्रपट

मंझिल-मंझिल, ऐतबार, अर्जुननंतर डिंपल यांचा 'सागर' हा चित्रपट 1985 मध्ये प्रदर्शित झाला होता. डिंपलच्या टॉपलेस सीनमुळे चित्रपटावर बरीच टीका झाली होती. तरीही 58 व्या अकादमी पुरस्कारांसाठी हा चित्रपट पाठवण्यात आला होता. 'इन्सानियत का दुश्मन' आणि 'जख्मी औरत'सारखे उत्कृष्ट चित्रपट देऊन डिंपल यांनी इंडस्ट्रीत खूप यश मिळवले होते.

सनी देओलसोबतच्या अफेअरमुळे होत्या चर्चेत

डिंपल कपाडिया आणि सनी देओल यांची मंझिल-मंझिल आणि ऐतबार सारख्या चित्रपटात एकत्र काम करताना जवळीक वाढली. दोघेही जवळपास 11 वर्षे रिलेशनशिपमध्ये होते, पण जेव्हा या नात्यामुळे सनी देओल यांच्या वैवाहिक आयुष्यात अडचणी वाढल्या तेव्हा दोघेही वेगळे झाले. त्यावेळी डिंपलच्या मुली सनीला छोटे पापा म्हणत होत्या.

जगासाठी हे दोघे वेगळे झाले असले तरी लपूनछपून त्यांच्या भेटीगाठी सुरु राहिल्या. 2017 मध्ये दोघांचा एक फोटो व्हायरल झाला होता, ज्यामध्ये दोघेही युरोपातील मोनोको येथील एका बस स्टॉपवर एकमेकांचा हात धरून बसले होते.

शेवटच्या क्षणापर्यंत राजेश खन्ना यांची दिली साथ
1982 मध्ये डिंपल यांनी राजेश खन्ना यांचे घर सोडले असले तरी त्यांचा घटस्फोट झाला नव्हता. अनेक कार्यक्रमांमध्ये डिंपल राजेश यांच्यासोबत हजेरी लावायच्या. 2012 मध्ये राजेश आजारी पडले तेव्हा डिंपल यांनी त्यांची खूप सेवा केली. राजेश खन्ना यांचे निधन झाले तेव्हा डिंपल संपूर्ण वेळ त्यांच्या पार्थिवाशेजारीच होत्या.

बातम्या आणखी आहेत...