आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॅपी बर्थडे डॉली बिंद्रा:बिग बॉस 4 मधील मारहाणीपासून ते राधे माँवरील गंभीर आरोपांपर्यंत... अनेकदा वादात अडकली आहे डॉली बिंद्रा

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • डॉलीने वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती.

20 जानेवारी 1970 रोजी पंजाबमध्ये जन्मलेल्या डॉली बिंद्राने आज वयाची 51 वर्षे पूर्ण केली आहेत. डॉलीने वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. 1996 मध्ये आलेल्या अक्षय कुमार स्टारर खिलाडियों के खिलाडी या चित्रपटानंतर तिने प्यार कोई खेल नहीं, बिच्छू, गदर, यादें, मैंने प्यार किया आणि दबंग 3 या चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिका वठवल्या. चित्रपटांसह डॉली बिग बॉसच्या चौथ्या पर्वामुळे चर्चेत आली होती. बिग बॉसच्या चौथ्या पर्वात डॉली बिंद्राचे श्वेता तिवारीसोबत कडाक्याचे भांडण झाले होते. इतकेच नाही तर बिग बॉसच्या घराबाहेरील तिची भांडणं चांगलीच गाजली आहेत. काही वर्षांपूर्वी तिच्या शेजा-यांनी तिच्यावर शिवीगाळ केल्याचा आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

डॉलीला त्रासले होते शेजारी
2014 मध्ये मालाड स्थित भूमी हाउसिंग सोसायटीने डॉली बिंद्राविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तिच्यावर शेजा-यांना शिवीगाळ केल्याचा आरोप होता. एका रिपोर्टनुसार, डॉलीच्या गैरवर्तणुकीमुळे सोसायटीतील लोक त्यांच्या मुलांना गार्डनमध्ये खेळायला सुद्धा पाठवत नव्हते. याशिवाय काही दिवसांपूर्वी डॉलीवर रात्रीच्या वेळी शेजा-याच्या घरात शिरुन त्याला मारहाण करणे आणि धमकावणे असेही आरोप करण्यात आले होते.

जिम कर्मचा-याला धमकावल्याने डॉलीविरोधात दाखल झाली होती तक्रार
2019 मध्ये डॉली बिंद्राने एका जिम कर्मचा-याला धमकावत त्याला बंदी बनवले होते. त्यानंतर तिच्याविरोधात खार पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता. झाले असे होते की, डॉलीच्या एका मित्राने खार परिसरातील वीसी जिम अँड फिटनेस सेंटरमध्ये पैसे भरले होते. अॅडमिशन कॅन्सल केल्यानंतर जिम कर्मचा-यांनी त्याला पैसे परत देण्यास नकार दिला होता. जेव्हा डॉलीला हे समजले, तेव्हा ती स्वतः पैसे वसूल करायला जिममध्ये आली होती. यावेळी तिने जिमच्या कर्मचा-याला धमकावत त्याला बंदी बनवले होते. नंतर जिम मालकाच्या तक्रारीवरुन डॉलीविरोधात तक्रार दाखल झाली होती.

बिग बॉस 4 ची सर्वात वादग्रस्त स्पर्धक होती डॉली बिंद्रा
डॉली बिग बॉसच्या चौथ्या पर्वात सहभागी झाली होती. भांडणं, वादविवाद करण्यात पटाईत असलेली डॉली बिग बॉसच्या घरातील इतर स्पर्धकांसाठी डोक्याला ताप ठरली होती. बाप पर मता जाना हे तिचे आवडते वाक्य होते. नेमक्या कुठल्या गोष्टीवरुन तिचा पारा चढेल, ही गोष्ट घरातील सदस्यांच्या समजण्यापलीकडे होती. श्वेता तिवारीसोबतचे तिचे भांडण चांगलेच गाजले होते.

राधे माँवर लावले होते गंभीर आरोप
डॉली बिंद्रा ही एकेकाळी राधे माँची भक्त होती. मात्र 2015 मध्ये डॉली बिंद्राने राधे माँ आणि तिच्या काही भक्तांविरोधात मालाड पोलिस स्टेशनमध्ये लैंगिक शोषणाची तक्रार दाखल केली होती. डॉलेने आपल्या तक्रारीत म्हटले होते की, राधे माँ तिला आपल्याबरोबर चंदीगड येथील पोलिस अधिका-याच्या घरी घेऊन गेली होती. जिथे तिने तिच्यावर एका अज्ञात व्यक्तीशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणतला होता. वन इंडियाच्या वृत्तानुसार ती अज्ञात व्यक्ती म्हणजे टल्ली बाबा नावाची व्यक्ती होती जो राधे माँबरोबर काम करायची. आपल्या तक्रारीत डॉलीने राधे माँवरही आरोप करत म्हटले होते की, तिच्या काही भक्तांनी सर्वांसमोर आपल्याशी गैरवर्तन केले होते. राधे माँच्या मुलाने डॉलीसमोर आपले कपडे काढले होते, असेही डॉली बिंद्राने तक्रारीत म्हटले होते. ऑगस्ट 2016 मध्ये राधे माँचे काही भक्त धमकावत असल्याचा खुलासादेखील डॉली बिंद्राने केला होता.

बातम्या आणखी आहेत...