आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॅपी बर्थडे गोविंदा:करिअरमध्ये यश न मिळाल्याने 4 वर्ष गोविंदा-सुनीताने जगापासून लपवून ठेवली होती लग्नाची बातमी, या कारणामुळे 18 वर्षांनंतर पुन्हा चढले होते बोहल्यावर

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गोविंदाचे काका आनंद सिंह हे एक सह-दिग्दर्शक आणि कलाकार होते.

बॉलिवूड इंडस्ट्रीतील एक उत्तम एंटरटेनर असलेला अभिनेता गोविंदाचा आज वाढदिवस असून त्याने वयाची 57 वर्षे पूर्ण केली आहेत. डान्सिंग आणि वेगळ्या स्टाइलने गोविंदाने चित्रपटसृष्टीत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. गोविंदाचे काका आनंद सिंह हे एक सह-दिग्दर्शक आणि कलाकार होते. त्यांनी 'तन-बदन' या चित्रपटाद्वारे गोविंदाला लाँच केले होते.

काही काळानंतर गोविंदा आनंदची मेहुणी सुनीता मुंजाळ यांच्या प्रेमात पडला आणि दोघांनी गुपचुप लग्न थाटले. मात्र लग्नाच्या 18 वर्षानंतर गोविंदाला पुन्हा एकदा पत्नी सुनीतासोबत पांरपरिक पद्धतीने लग्न थाटावे लागले होते. चला जाणून घेऊया या लग्नाचे कारण काय होते-

2015 मध्ये गोविंदाने पत्नी सुनीतासोबत पुन्हा लग्न केले होते. या लग्नामागचे कारण गोविंदाने एका मुलाखतीत उघड केले होते. गोविंदाची आई निर्मला देवी यांची इच्छा होती की, गोविंदाने वयाच्या 49 व्या वर्षी पुन्हा लग्न करावे. आपल्या आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी गोविंदाने पुन्हा लग्नाचा निर्णय घेतला होता. 11 डिसेंबर 2015 रोजी पत्नी सुनीता मुंजालसोबत त्याने पुन्हा लग्न केले. दोघांचे लग्न धुमधडाक्यात पारंपरिक पद्धतीने झाले होते. या लग्नात त्यांची मुले टीना आहुजा आणि यश वर्धन उपस्थित होते.

कशी होती गोविंदा-सुनीता यांची लव्ह स्टोरी

सुनीता गोविंदाचे काका आनंद सिंह यांची मेहुणे होती. काही भेटीतच दोघांचे सूत जुळले होते. एके दिवशी एका पार्टीत गोविंदाचा हात चुकीने सुनीताच्या हाताला लागला होता. मात्र दोघांनीही आपला हात बाजुला घेतला नाही आणि अशा प्रकारे दोघांनीही एकमेकांच्या प्रेमास सहमती दर्शविली. काही दिवस रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर 11 डिसेंबर 1987 रोजी गोविंदा आणि सुनीताचे लग्न झाले.

4 वर्ष सर्वांपासून लपवून ठेवली होती लग्नाची बातमी

ज्या वेळी गोविंदा आणि सुनीताचे लग्न झाले होते, त्या वेळी गोविंदाचे करिअर स्थिरावले नव्हते. दोघांनीही लग्न केले परंतु ही गोष्ट संपूर्ण जगापासून लपवून ठेवली. नंतर जेव्हा गोविंदाने सर्वांना आपल्या लग्नाविषयी सांगितले तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता.

राजकीय कारकीर्द अपयशी ठरली

बॉलिवूडमध्ये वेगळी ओळख निर्माण केल्यानंतर गोविंदाने 2004 मध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला होता. आणि चांगल्या मतांनी विजयी झाले होते. राजकारणाच्या वाटेवर असताना गोविंदाला आपल्या अभिनय कारकिर्दीवर लक्ष केंद्रित करायचे होते. यावेळी त्याचा पार्टनर हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. पण गोविंदाला राजकारण आणि अभिनय यांच्यात ताळमेळ साधता आला नाही आणि शेवटी त्याने पक्षाचा राजीनामा दिला. थोड्या विश्रांतीनंतर गोविंदाने इंडस्ट्रीत पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, परंतु नंतर त्याला साइड रोल मिळू लागले.

आपल्याने 34 वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये गोविंदाने हिरो नं. 1, कुली नं. 1, अखियों से गोली मारे आणि राजा बाबू सारखे अनेक हिट चित्रपट दिले. बॉलिवूडमध्ये त्याला हीरो नंबर 1 आणि चिची या नावाने ओळखले जाते.

बातम्या आणखी आहेत...