आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

57 वर्षांच्या गोविंदाचे पाच किस्से:कर्ज घेऊन आईसाठी बनवला होता ट्रेनचा फर्स्ट क्लासचा पास, हॉटेल ताजमध्ये केला होता नोकरीसाठी अर्ज मात्र इंग्रजी येत नसल्याने मिळाले नव्हते काम

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गोविंदाने अनेक मुलाखतींमधून आपल्या चित्रपट प्रवासाबद्दल आणि संघर्षाविषयी सांगितले आहे.

इंडस्ट्रीमध्ये हिरो नंबर 1 म्हणून प्रसिद्ध असलेल्या गोविंदा आज 57 वर्षांचा झाला आहे. मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेला गोविंदा चित्रपटसृष्टीत प्रवेश केल्यानंतर काही वर्षांतच सुपरस्टार बनला. त्याचे स्टारडम एवढे होते की, एका मॅगझिनने गोविंदाला सोन्याची अंडी देणारी कोंबडी असे म्हटले होते. '21 वर्षांचा होईपर्यंत त्याला कुणीही ओळखत नव्हते आणि वयाच्या 22 व्या वर्षी त्याने 50 चित्रपट साइन केले होते.' गोविंदाने अनेक मुलाखतींमधून आपल्या चित्रपट प्रवासाबद्दल आणि संघर्षाविषयी सांगितले आहे.

1986 पासून सातत्याने आपल्या चाहत्यांना फिल्मी मेजवानी देणारा गोविंदा आतापर्यंत सुमारे 128 चित्रपटांचा एक भाग आहे. चित्रपटसृष्टीत कार्यरत असताना गोविंदाने 2004 साली महाराष्ट्राच्या राजकारणात पाऊल ठेवले आणि कॉंग्रेस पक्षाच्या तिकिटावर लोकसभेवर निवडून आला. पण 2008 मध्ये त्याने राजकारण सोडले आणि केवळ चित्रपटांवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली.

मामाने चापट मारली आणि म्हणाला- "तू या चित्रपटाचा नायक आहेस"

'पार्टनर', 'भागम भाग' सारख्या हिट चित्रपट देणा-या गोविंदाला पहिला चित्रपट मिळताच त्याच्या मामाने त्याला चापट मारली होती. एका मुलाखती दरम्यान, त्याने सांगितले की, मी स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल फारच चिंतित होतो, कारण कोणत्याही चित्रपट निर्मात्याला एक छान दिसणारा नायकाचा चित्रपट बनवायचा होता.

गोविंदाने सांगितले की, हे टाळण्यासाठी त्याने आपल्या नृत्य, अभिनय आणि लढाऊ दृश्यांचे व्हिडिओ कॅसेट तयार करण्यास सुरवात केली. त्याने ही व्हिडिओ कॅसेट आपल्या मामाला दाखवली. त्याचे मामा एका दुस-या विषयावर चित्रपटाची योजना आखत होते. गोविंदाने सांगितले की, अभिनय पाहून मामाने चित्रपटाचा विषय बदलला आणि त्याला चित्रपटात कास्ट केले. तो म्हणाला की 'जेव्हा मी माझ्या मामाला हीरो म्हणून कुणाला घेतले, असा प्रश्न केला. तेव्हा ते म्हणाले की डोळे बंद कर आणि तुला हीरोचा फोटो दाखवतो.' गोविंदाने सांगितले की, त्याने डोळे मिटताच, मामाने एक जोरात चपराक मारली आणि म्हणाले, 'तूच या चित्रपटाचा नायक आहेस.'

'हत्या' चित्रपटातील सर्वात कठीण सीन
कारकिर्दीच्या सुरुवातीलाच गोविंदा बॉलिवूड चाहते आणि प्रेक्षकांमध्ये डान्सिंग स्टार म्हणून प्रसिद्ध झाला. एका मुलाखती दरम्यान त्याने सांगितले की, त्याने आपली डान्सिंग स्टारची इमेज बदलण्यासाठी 'हत्या' हा चित्रपट बनवला. गोविंदाने सांगितले, चित्रपटाच्या एका सीनमध्ये त्याला 10 मिनिटांचा संवाद बोलायचा होता, पण हे फार कठीण काम होते. चित्रपटाच्या दृश्यात, गोविंदा नशेत असलेल्या एका मुलाशी बोलतो, जो ऐकू किंवा बोलू शकत नाही. अभिनेत्याच्या म्हणण्यानुसार, आव्हान असे होते की इतके दिवस नृत्य करणार्‍या अभिनेत्याला एवढा वेळ कोण ऐकेल.

नातेवाईकाकडून कर्ज घेऊन आईसाठी बनवला प्रथम श्रेणीचा पास
आपल्या संघर्षाचा काळ आठवत गोविंदा म्हणाला होता की, तो आपल्या आईला स्टेशनवर सोडण्यासाठी गेला होता, परंतु गर्दीमुळे रेल्वेत चढू शकला नाही आणि बघता बघता पाच गाड्या समोरून निघून गेल्या. परिस्थितीला कंटाळून गोविंदाने एका नातेवाईकाकडून कर्ज घेऊन आईसाठी प्रथम श्रेणीचा पास बनवून आईला रेल्वेने सोडले. त्यानंतर त्याने यशस्वी होण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

पालकांना नेहमीच यशाचे श्रेय देणारे गोविंदा म्हणाला की, वडिलांच्या शिक्षणामुळेच त्याला अभिनयाची प्रेरणा मिळाली. त्याने सांगितले की, एकदा त्याच्या वडिलांनी सांगितले की आपण कोणताही व्यवसाय करू शकत नाही, कारण आपल्याकडे सेट अप करण्यासाठी पैसे नाहीत. तू तेच कर जे तू गुंतवू शकतो. गोविंदा म्हणतो की, त्याच दिवसापासून त्याने केवळ अभिनयाचा निर्णय घेतला. गोविंदाने ताज हॉटेलमध्येही नोकरीसाठी अर्ज केला होता, परंतु इंग्रजी कमकुवत असल्याने काम मिळू शकले नाही.

चाहत्याला मारली होती चापट
गोविंदा 2008 मध्ये फिल्मसिटी स्टुडिओमध्ये ‘मनी है तो हनी है’ या चित्रपटाचे चित्रीकरण करत होता. त्याच वेळी त्याने संतोष राय या चाहत्याला थापड मारली होती. त्यानंतर राय यांनी मुंबई उच्च न्यायालयात खटला दाखल केला. उच्च न्यायालयाने 2013 मध्ये हे प्रकरण पुरेसे पुरावे नसल्यामुळे फेटाळून लावले. त्यानंतर राय यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. गोविंदा म्हणाला की, रायने सहकारी महिला कलाकाराशी गैरवर्तन केले होते, म्हणूनच त्याने त्याला चापट मारली. या घटनेनंतर अभिनेत्याचा करिअरचा आलेख घसरला.

लग्नाची बातमी लपली होती
स्टारडमचा आनंद घेत गोविंदाने फार काळ कोणालाही इंडस्ट्रीमध्ये आपल्या लग्नाविषयी माहिती दिली नाही. एका मुलाखतीत जेव्हा गोविंदाला हा प्रश्न विचारला गेला तेव्हा तो म्हणाला की, तरुण मुलींमध्ये फॅन फॉलोव्हिंग कमी होईल असे मला वाटत होते. तो म्हणाला की, मला भीती वाटली की, लग्नाच्या बातम्यांमुळे त्याचा चार्म फिका पडले आणि त्याचे चाहते कमी होतील. 11 मार्च 1987 रोजी गोविंदाने सुनीता आहूजाशी लग्न केले होते.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser