आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड अभिनेत्री काजोलने आज वयाची 46 वर्षे पूर्ण केली आहे. तिचा जन्म 5 ऑगस्ट 1974 रोजी मुखर्जी कुटुंबात झाला होता. मुखर्जी कुटुंबाच्या अनेक पिढ्या बॉलिवूडमध्ये कार्यरत आहेत. काजोलचे वडील शोमू मुखर्जी बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक होते. तर आई तनुजा समर्थ प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. मुखर्जी कुटुंबाच्या तीन आणि समर्थ कुटुंबाच्या चार पिढ्या फिल्म इंडस्ट्रीत कार्यरत आहेत.
काजोलच्या बालपणीच तिचे आईवडील विभक्त झाले होते. तनुजा यांनी एका मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे, त्यांनी आणि शोमू यांनी आपल्या नात्यामध्ये आलेल्या दुराव्याचा परिणाम कधीच मुलींवर होऊ दिला नाही. मुलांसमोर ते सामान्य राहायचे. काजोल आणि तनिषा बोर्डिंग स्कूलमध्ये शिकल्या. मात्र दर महिन्याला त्या आपल्या आईवडिलांना भेटायला यायच्या. एप्रिल 2008 मध्ये शोमू मुखर्जी यांचे निधन झाले.
काजोलच्या धाकट्या बहिणीचे नाव तनिषा असून तिनेही आपले नशीब बॉलिवूडमध्ये आजमावले होते. मात्र काजोलप्रमाणे तिच्या वाट्याला यश आले नाही.
काजोलचे वडील शोमू मुखर्जी यांचे कुटुंब
काजोलचे काका जॉय मुखर्जी यांची तिन्ही मुले (दोन मुले आणि एक मुलगी) फिल्म इंडस्ट्रीपासून लांब राहिले. तर नूतन यांच्याव्यतिरिक्त काजोलची आणखी एक मावशी आहे. त्यांचे नाव चतुरा असून त्यादेखील फिल्म इंडस्ट्रीकडे वळल्या नाहीत. चतुरा यांची लेक रेशमासुद्धा आपल्या आईप्रमाणे सिनेमांपासून दुर राहिली.
काजोलचे लग्न बॉलिवूड अभिनेता अजय देवगणसह झाले आहे. अजयचे वडील प्रसिद्ध स्टंट दिग्दर्शक होते, तर आई वीणा निर्मात्या होत्या. अजयचे भाऊ अनिल देवगण दिग्दर्शक आहेत. जीत, जान, इतिहास, प्यार तो होना ही था या सिनेमांचे अनिल सहायक दिग्दर्शक तर राजू चाचा, ब्लॅकमेल या सिनेमांचे दिग्दर्शक होते.
काजोल आणि अजय देवगणला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगी न्यासाचा जन्म 20 एप्रिल 2003 रोजी झाला, तर मुलगा युगचा जन्म 13 सप्टेंबर 2010 रोजी झाला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.