आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान आपला 41 वा वाढदिवस साजरा करत आहे. कपूर घराण्याची लाडकी लेक आणि पतौडी घराण्याची सून करीना कपूरचा जन्म 21 सप्टेंबर 1980 रोजी मुंबईत झाला. ती राज कपूर यांची नात आणि रणधीर-बबिता यांची मुलगी आहे.
करीनाने वयाच्या 19 व्या वर्षी 1999 मध्ये आलेल्या 'रेफ्युजी' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. करीनाला या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्रीचा फिल्मफेअर अवॉर्ड देखील मिळाला. आपल्या 17 वर्षांच्या कारकिर्दीत बेबोने 'चमेली', 'देव', 'ओंकारा' आणि 'जब वी मेट' सारखे अनेक हिट चित्रपट दिले आहेत. 'जब वी मेट' चित्रपटातील 'गीत'च्या भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे अनेक मोठे पुरस्कार मिळाले.
करीनाच्या काही खास गोष्टी
करीनाने आतापर्यंत 6 फिल्मफेअर अवॉर्ड जिंकले आहेत. जे खालीलप्रमाणे आहेत....
तीन महत्वाच्या तारखा, तीन कथा...
डेब्यू : 30 जून 2000
करीना करिअरची सुरुवात 'कहो ना प्यार है' पासून करणार होती. पण तिथे ऋतिकला जास्त महत्व मिळत असलेले पाहून एका नातेवाईकाच्या सल्ल्याने नंतर तिने अभिषेक बच्चनच्या अपोजिट 'रेफ्यूजी'ने डेब्यू केला.
लग्न : 16 ऑक्टोबर 2012
सैफ-करीना 'टशन' चित्रपटाच्या दरम्यान जवळ आले. सैफने तिला दोनदा प्रपोज केले. दोन्ही वेळा पॅरिसमध्येच. पहिल्यांदा करीनाने नकार दिला पण दुसऱ्या प्रपोजलवर दोन दिवसांनंतर होकार दर्शविला.
मुलगा तैमूरचा जन्म : 20 डिसेंबर 2016
मुलगा जहांगीरचा जन्म : 21 फेब्रुवारी 2021
गर्भावस्थेतदेखील करीना सक्रिय होती. फॅशन शोज केले. तैमूरच्या जन्मानंतर 16 किलो वजन कमी करून ती पडद्यावर परतली होती. त्यानंतर 21 फेब्रुवारी 2021 रोजी करीनाने तिचा दुसरा मुलगा जहांगीरला जन्म दिला. प्रेग्नेंसीच्या काळात करीनाने लाल सिंह चड्ढा या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले.
नर्गिस, मीना कुमारी
किशोर नमित कपूर
घोडेस्वारी
अमृता अरोरा, मलायका अरोरा, ईशा देओल
द काइंड वर्द किलिंग
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.