आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Entertainment
 • Bollywood
 • Happy Birthday Kishore Kumar: Abhas Kumar Ganguly Was The Real Name Of The Legendary Singer Kishore Kumar, After Marrying Madhubala, He Became Karim Abdul After Convert To Islam

हॅपी बर्थडे किशोर कुमार:आभास कुमार गांगुली होते किशोर कुमार यांचे खरे नाव, मधुबालासोबत लग्न करण्यासाठी स्वीकारला इस्लाम धर्म आणि बनले होते करीम अब्दुल

2 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • किशोर कुमार यांच्या आयुष्यातील खास गोष्टी...

4 ऑगस्ट, 1929 रोजी जन्मलेले किशोर कुमार यांची आज 92 वी जयंती आहे. ते एक महान गायक तसेच एक उत्कृष्ट अभिनेता, संगीत दिग्दर्शक, गीतकार, निर्माता आणि पटकथा लेखक होते. हिंदी गाण्यांशिवाय किशोर कुमार यांनी बंगाली आणि तमिळ भाषांमध्येही अनेक ब्लॉकबस्टर हिट गाणी दिली. आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या जीवनाशी संबंधित काही रंजक गोष्टी जाणून घेऊया-

 • किशोर कुमार यांचे खरे नाव आभास कुमार गांगुली होते. त्यांचा जन्म मध्य प्रदेशातील खंडवा येथे झाला होता.
 • किशोर यांनी त्यांचे थोरले बंधू अशोक कुमार यांच्याप्रमाणे बॉम्बे टॉकीजमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती.
 • किशोर कुमार यांनी 1946 मध्ये 'शिकारी' या चित्रपटातून पदार्पण केले होते. या चित्रपटात त्यांचे भाऊ अशोक कुमार मुख्य भूमिकेत होते.
 • किशोर कुमार हॉलिवूड गायक आणि अभिनेते डॅनी केचे मोठे चाहते होते. किशोर यांनी त्यांच्या खोलीत त्यांचे पोस्टरही लावले होते.
 • खरं तर किशोर कुमार यांना अभिनयाची रुची नव्हती. मात्र त्यांचे भाऊ अशोक कुमार यांची इच्छा होती की, किशोर कुमार यांनी अभिनयात करिअर करावे.
 • किशोर कुमार यांनी चार वेळा लग्न केले होते. रुमा गुहा, मधुबाला, योगिता बाली आणि लीना चंदावरकर यांच्यासोबत त्यांचे लग्न झाले होते.
 • किशोर कुमार यांनी मधुबालाशी लग्न करण्यासाठी इस्लाम धर्माचा स्वीकारला केला होता. किशोर कुमार यांनी आपले नाव बदलून करीम अब्दुल ठेवले होते.
 • किशोर कुमार यांनी आपल्या कॅन्टीनच्या माणसाकडून 5 रुपये 75 पैसे घेतले होते, यावरुन प्रेरित होऊन त्यांनी पांच रुपैया बारा आना हे गाणे तयार केले होते.
 • किशोर कुमार यांनी त्यांच्या घराच्या बाहेर 'किशोर कुमार से सावधान' अशी पाटी लावली होती.
 • किशोर कुमार स्त्रियांच्या आवाजातही गाणी म्हणायचे. 'एक लडकी भीगी भागी सी' या गाण्यात किशोर यांनी मुलीच्या आवाजात गाणे गायले होते.
बातम्या आणखी आहेत...