आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Happy Birthday Lara Dutta: Lara Dutta Was Saved From Being Drown In The Sea During The Shooting Of 'Andaz', Co Star Akshay Kumar Saved Her Life

हॅपी बर्थडे लारा दत्ता:'अंदाज' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान समुद्रात बुडण्यापासून थोडक्यात बचावली होती लारा दत्ता, को-स्टार अक्षय कुमारने वाचवला होता जीव

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'बेल बॉटम'द्वारे करणार बॉलिवूडमध्ये कमबॅक

बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्ता आज आपला 43 वा वाढदिवस साजरा करत आहे. अंदाज, बिल्लू, डॉन आणि सिंग इज ब्लिंग या चित्रपटांमध्ये झळकलेल्या लाराने मॉडेलिंगपासून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. मॉडेलिंगच्या दुनियेत नाव कमावल्यानंतर लाराने 2000 मध्ये मिस युनिव्हर्सचा किताब आपल्या नावी केला. त्यानंतर 2003 मध्ये 'अंदाज' या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. लारने आपल्या अभिनय करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले, मात्र तिची गणना बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये झाली नाही. आज वाढदिवसाचे औचित्य साधत एक नजर टाकुयात तिच्या आयुष्याशी निगडीत काही खास गोष्टींवर...

लारा दत्ताचे खासगी आयुष्य
लारा दत्ताचा जन्म 16 एप्रिल 1978 रोजी गाजियाबाद (उत्तर प्रदेश) येथे झाला. तिचे वडील हिंदू आणि आई एंग्लो इंडियन आहे. 1981मध्ये लाराचे कुटुंब बंगळूरू येथे स्थायिक झाले. येथे सेंट फ्रांसिस झेव्हिअर गर्ल्स स्कूलमध्ये लाराने आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून ग्रॅज्युएशन केले.

मिस युनिव्हर्सचा जिंकला किताब
ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर लारा फॅशन जगताकडे वळली. फॅशन वर्ल्डमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याची तिची इच्छा होती. तिने आपली ही इच्छा पूर्णदेखील केली. तिने सर्वात प्रथम ग्लॅडरॅग्स मेगा मॉडेलचा खिताब आपल्या नावी केला. त्यानंतर लारा फेमिना मिस इंडिया आणि त्यानंतर मिस युनिव्हर्स झाली. मिस युनिव्हर्सचा खिताब आपल्या नावी करणारी लारा दुसरी भारतीय महिला आहे.

'अंदाज'द्वारे झाली बॉलिवूडमध्ये एन्ट्री
2000मध्ये मिस युनिव्हर्सचा खिताब जिंकल्यानंतर लाराने 2003 मध्ये बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. 'अंदाज' हा तिचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटात ती अक्षय कुमारसोबत झळकली होती. यात प्रियांका चोप्रा हिचीदेखील महत्त्वाची भूमिका होती. आपल्या पहिल्याच चित्रपटासाठी लाराने सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळवला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता.

पहिल्या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान घडली होती दुर्घटना
अंदाज चित्रपटाचे निर्माते सुनील दर्शन यांनी एका मुलाखतीत लारासोबत घडलेल्या घटनेचा खुलासा केला होता. सुनील यांनी सांगितले होते, 'चित्रपटाचा काही भाग दक्षिण आफ्रिकेतील केपटाउन येथे चित्रीत करण्यात आल होता. या चित्रपटातील रब्बा इश्क ना होवे हे गाणे येथे चित्रीत झाले होते, जे बरेच गाजले होते. गाण्यातील काही भाग लारा आणि अक्षयने समुद्रांच्या लाटांवर चित्रीत केले. खरं तर लारा पाण्याला खूप घाबरते पण तिने गाण्यासाठी ही जोखीम उचलण्याचा निर्णय घेतला होता.'

सुनील पुढे सांगतात, 'शूटिंगच्या वेळी सर्व सावधगिरी बाळगण्यात आली होती. मात्र एक मोठी लाट आली आणि त्यावेळी लारा स्वतःला बॅलेन्स करु शकली नाही आणि ती लाटेत वाहत गेली. यावेळी अक्षयने पाण्यात उडी मारुन लाराचा जीव वाचवला होता,' असे सुनील यांनी सांगितले.

'बेल बॉटम'द्वारे करणार बॉलिवूडमध्ये कमबॅक
2018 मध्ये आलेल्या 'वेलकम टू न्यूयॉर्क' या चित्रपटात लारा शेवटची दिसलली होती. त्यानंतर ती बॉलिवूडपासून दूर गेली. सततच्या फ्लॉप चित्रपटांमुळे लारा ओटीटी प्लॅटफॉर्मकडे वळली. 2020 मध्ये ती हंड्रेड या वेब सीरिजमध्ये दिसली. आता लारा लवकरच बेल बॉटम या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पुनरागमन करणार आहे. लारासह अक्षय कुमार, हुमा कुरैशी आणि वाणी कपूर यांच्या मुख्य भूमिका या चित्रपटात असून मे 2021 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...