आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • Entertainment
 • Bollywood
 • Happy Birthday Manish Malhotra: From Kareena Kapoor, Priyanka Chopra To Katrina Kaif, Manish Malhotra Style These Bollywood Celebs With His Collection

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हॅपी बर्थडे मनीष मल्होत्रा:करीना कपूर, प्रियांका चोप्रापासून ते कतरिना कैफपर्यंत, या स्टार्सच्या लूकला मनीष मल्होत्राने लावले चारचाँद

2 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • मनीष मल्होत्रा हे बॉलिवूड सेलिब्रिटींचे आवडते फॅशन डिझायनर आहेत.

बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वोत्कृष्ट ड्रेस डिझायनर म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे मनीष मल्होत्रा यांचा आज (5 डिसेंबर) वाढदिवस असून त्यांनी वयाची 54 वर्षे पूर्ण केली आहेत. मागील 25 वर्षांपासून ते इंडस्ट्रीत कार्यरत असून त्यांच्या कामाचे बॉलिवूड सेलिब्रिटी दिवाने आहेत. इंडस्ट्रीतील एखादाच असा सेलिब्रिटी असावा ज्याच्यावर मनीषची जादू चालली नाही. वाढदिवसाचे औचित्य साधत एक नजर टाकुया कोणकोणत्या सेलिब्रिटींच्या लूकला मनीषच्या ड्रेसने चारचाँद लावले -

 • किआरा आडवाणी - इंदू की जवानी

अलीकडेच किआरा आडवाणीचा आगामी चित्रपट 'इंदू की जवानी'मधील 'हीलें टूट गई' हे गाणे प्रदर्शित झाले आहे. गाण्यामध्ये किआराचा ग्लॅमरस लूक बघायला मिळाला. या गाण्यात किआराने परिधान केलेली गोल्डन डिझायनर साडी ही मनीष मल्होत्रा यांच्या नवीन कलेक्शनमधील आहे. याशिवाय लाल बॉडी कॉन ड्रेसदेखील मनीषच्या कलेक्शनमधील आहे.

 • दिवाळीतील साराचा पारंपरिक लूक

फेस्टिव सीझनमध्ये मनीष मल्होत्रा यांनी आपले नवीन कलेक्शन रुहानियत लाँच केला होता. दिवाळीच्या खास निमित्ताने सारा अली खानने मनीषच्या कलेक्शनमधील ड्रेसची निवड केली होती.

 • राजकुमार राव आणि नुसरत भरुचा- 'दीदार दे' गाणे

अलीकडेच रिलीज झालेल्या 'छलांग' या चित्रपटातील 'दीदार दे' या गाण्यातील राजकुमार राव आणि नुसरत भरुचा यांचा लूक मनीष मल्होत्रा यांनी डिझाइन केला. दोघेही या गाण्यात मनीष मल्होत्राच्या कलेक्शनमध्ये दिसले होते.

 • कतरिना कैफची गुलाबी साडी झाली हिट

बॉलिवूडची दिवा कतरिना कैफ नुकतीच कल्याण ज्वेलर्सच्या जाहिरातीमध्ये दिसली. यात तिने सीक्वन लाईट आणि डार्क पिंक कलर कॉम्बिनेशन असलेली साडी परिधान केली. ही मनीष मल्होत्रांच्या रुहानियत कलेक्शनमधील साडी आहे. तारा सुतारिया आणि करीना कपूर खान यांनीही यापूर्वी या कलेक्शनला पसंती दिली आहे.

 • काजल अग्रवालचा एंगेजमेंट लूक

काजल अग्रवालने 31 ऑक्टोबर रोजी गौतम किचलूशी लग्न केले होते. लग्नाआधी झालेल्या साखरपुड्याला काजलने मनीष मल्होत्राने डिझाइन केलेली सुंदर पिवळ्या रंगाची साडी परिधान केली होती. काजलशिवाय गौतम किचलूचा कुर्तादेखील मनीषच्या कलेक्शनमधील होता.

 • अरमान जैनच्या लग्नात मनीषचा जलवा

अभिनेता अरमान जैनने यावर्षी अनिषा मल्होत्राशी लग्न केले आहे. दोघांचे वेडिंग ड्रेस मनीष मल्होत्रा ​​यांनी डिझाइन केले होते. वर आणि वधू व्यतिरिक्त करीना कपूर खान, करिश्मा कपूर आणि तिची मुलगी समायरा कपूर यांन मनीषच्या कलेक्शनमधील सिल्व्हर लहेंग्याला पसंती दिली होती.

अनीषा आणि अरमानच्या संगीत फंक्शनमध्ये मनीष यांनी डिझाइन केलेला सुंदर लेहंगा किआरा आडवाणीने परिधान केला होता. करण जोहर आणि तारा सुतारिया यांनीही मनीषचे वेडिंग कलेक्शन परिधान केले होते.

याशिवाय मनीष मल्होत्रा हे ऐश्वर्या राय बच्चन, शाहरुख खान, प्रियांका चोप्रा, शबाना आझमी, कार्तिक आर्यन, आलिया भट्ट, तारा सुतारिया, अनन्या पांडे, आयुष्मान खुराना, जान्हवी कपूर, अक्षय कुमार आणि सलमान खान यांचे आवडते फॅशन डिझायनर आहेत.

Open Divya Marathi in...
 • Divya Marathi App
 • BrowserBrowser