आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Happy Birthday Rhea Chakraborty: Rhea Chakraborty Had Become An Actress From Video Jockey, Her Relationship With Mahesh Bhatt And Sushant Made Her To The Headline

29 वर्षांची झाली रिया चक्रवर्ती:व्हिडिओ जॉकी ते अभिनेत्री बनली रिया चक्रवर्ती, चित्रपटांपेक्षा महेश भट्ट आणि सुशांतसोबतच्या नात्यामुळे राहिली चर्चेत

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • महेश भट्ट यांनी रियाला सुशांतसोबत ब्रेकअप करण्याचा सल्ला दिला होता.

14 जून 2020 रोजी सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूची बातमी उघडकीस आल्यापासून सर्वत्र फक्त एकच नाव ऐकले गेले आहे आणि ते म्हणजे रिया चक्रवर्ती. रियाच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक
जीवनाबद्दल यापूर्वी जितकी चर्चा झाली नव्हती तेवढी चर्चा सुशांतच्या निधनानंतर झाली. आज रियाचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने जाणून घेऊयात तिच्याविषयी..

हरियाणाच्या अंबाला येथे रियाचे बालपण गेले

रियाचा जन्म बेंगलुरूमध्ये झाला होता. 1 जुलै, 1992 रोजी इंद्रजित चक्रवर्ती आणि संध्या चक्रवर्ती यांच्या घरी जन्मलेल्या रियाने अंबाला कँटच्या आर्मी पब्लिक स्कूलमधून आपले शिक्षण पूर्ण केले. रियाचे वडील बंगाली आणि आई कोंकणी आहेत. रियाचे वडील सैन्यात डॉक्टर आहेत तर आई गृहिणी आहे. रियाला एक भाऊ आहे त्याचे नाव शोविक आहे. या चौघांवर सुशांतच्या कुटूंबाने आत्महत्या, गुन्हेगारी कट, चोरी, फसवणूक आणि धमकी दिल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला आहे.

अभियांत्रिकी सोडून बनली अभिनेत्री

रियाने एमटीव्हीच्या रिअॅलिटी शो 'टीन दिवा'च्या माध्यमातून ग्लॅमरच्या जगतात पाऊल ठेवले. त्यामध्ये ती फर्स्ट रनर अप ठरली. त्यानंतर तिने दिल्लीतील एमटीव्हीची व्हिडिओ जॉकी होण्यासाठी ऑडिशन दिले आणि तिची निवड झाली. रियाने व्हीजे असताना 'एमटीव्ही वास्सअप', 'कॉलेज बीट' आणि 'एमटीव्ही गॉन इन 60 सेकंड्स' होस्ट केले. दरम्यान, अभिनेत्री होण्याचे तिचे स्वप्न जागृत झाले. त्या काळात ती अभियांत्रिकी शिकत होती पण तिला अभियंता होण्यात काही रस नव्हता म्हणून तिने अभियांत्रिकी सोडली आणि अभिनयाकडे वळली.

चित्रपट कारकीर्द फ्लॉप ठरली
यशराज फिल्म्सच्या 2010 मध्ये आलेल्या 'बँड बाजा बारात'साठी रियाने ऑडिशन दिले होते पण मुख्य भूमिकेसाठी तिला नाकारले गेले होते. या चित्रपटात अनुष्का शर्मा मुख्य भूमिकेत आहे. रियाला तिचा पहिला ब्रेक 2012 मध्ये आलेली तेलगू फिल्म 'तुनेगा तुनेगा' च्या माध्यमातून मिळाला होता. या चित्रपटात तिने निधी नावाच्या मुलीची भूमिका साकारली होती. हा चित्रपट फ्लॉप ठरला पण त्यानंतर 2013 मध्ये लवकरच रियाला बॉलिवूडमध्ये ब्रेक मिळवला. तिला फिल्म 'मेरे डॅडची मारुती' मध्ये जसलीनची भूमिका साकारण्याची संधी मिळाली पण हा चित्रपटही फ्लॉप ठरला.

तीन वर्षे बसून होती रिया
2014 मध्ये रियाचा आलेला तिसरा चित्रपट 'सोनाली केबल' हा देखील सुपरफ्लॉप ठरला. याचा परिणाम असा झाला की, तिला तीन वर्षे घरात बसून राहावे लागले. 2017 मध्ये तिला 'हाफ गर्लफ्रेंड' आणि 'दोबारा: सी योर ईविल' सारख्या चित्रपटंमध्ये कॅमियो मिळाला मात्र हे चित्रपटही फ्लॉक ठरले. यानंतर 2017 मध्ये आलेल्या बँक चोर आणि 2018 मध्ये आलेल्या जलेबी मध्ये रियाला मुख्य अभिनेत्री म्हणून भूमिका साकारण्याची संधी मिळाली. मात्र यामध्ये ती अयशस्वी ठरली. यानंतर रिया कोणत्याच चित्रपटात दिसलेली नाही. रियाने एकूण आयुष्यात 8 चित्रपटांमध्ये काम केले. पण तिचे फिल्मी करिअर यशस्वी होऊ शकले नाही. आता रिया लवकरच अमिताभ बच्चन आणि इम्रान हाश्मी स्टारर 'चेहरे' या चित्रपटात दिसणार आहे.

10-15 लाख आहे वार्षिक उत्पन्न
29 वर्षांच्या रियाच्या गेल्या दोन वर्षांच्या आयटीआरवर नजर टाकली तर तिचे वार्षिक उत्पन्न 10-15 लाख रुपयांच्या जवळपास आहे. मात्र तिच्या जवळ मुंबईमध्ये कोट्यावधींची संपत्ती आहे. ब्रांड एंडोर्समेंटसाठी रियाला 3 लाख ते 5 लाख रुपये मिळतात.

2018 मध्ये महेश भट्टसोबत अफेअर असल्याचे आले होते वृत्त
2018 मध्ये रिया चक्रवर्ती जलेबी या चित्रपटात वरुण मित्रासोबत दिसली होती. हा चित्रपट महेश भट्ट यांनी प्रोड्युस केला होता. या चित्रपटाच्या प्रमोेशनल इव्हेंटमध्ये रिया अनेकदा महेश भट्ट यांच्या जवळ दिसली होती. त्यामुळे दोघांचे अफेअर असल्याच्या चर्चा त्यावेळी रंगल्या होत्या. बातम्यांनुसार, वयात मोठे अंतर असूनदेखील दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याचे म्हटले गेले. त्यामुळे रिया वादात अडकली होती.

महेश भट्ट यांच्यासोबतचे फोटो शेअर करुन वादात अडकली होती रिया
रियाने महेश भट्ट यांच्या 70 व्या वाढदिवशी त्यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करत त्यांचे कौतुक केले होते. मात्र या पोस्टवरुन ती सोशल मीडियावर ट्रोल झाली होती. त्यामुळे तिने स्पष्टीकरण देणारी
एक पोस्ट शेअर केली होती. त्यात तिने लिहिले होते, 'तू कौन है, तेरा नाम क्या, सीता भी यहां बदनाम है।'

एका मुलाखतीत महेश भट्ट आणि आपल्या नात्यावर स्पष्टीकरण देताना रिया म्हणाली होती, महेश भट्ट माझ्यासाठी वडिलांसारखे आहे. ते माझे मेंटॉर आहे. मात्र ट्रोलिंगमुळे त्यांना खूप त्रास झाला आहे. सुशांतच्या निधनानंतरही रिया सतत महेश भट्ट यांच्या संपर्कात असल्याचे समोर आले होते. सुशांतच्या मृत्यूच्या सहा दिवसांपूर्वी रियाने महेश भट्ट यांच्याशी केलेल्या बातचीतचे स्क्रिनशॉट्स समोर आले होते. त्यात महेश भट्ट यांनी रियाला सुशांतसोबत ब्रेकअप करण्याचा सल्ला दिला होता.

2013 मध्ये झाली होती रिया-सुशांतची भेट
रिया आणि सुशांतची पहिली भेट 2013 मध्ये यशराज फिल्म्सच्या शूटिंगदरम्यान झाली होती. रिया त्यावेळी बँक चोर या चित्रपटात काम करत होती, आणि सुशांत शुद्ध देसी रोमान्स हा चित्रपट करत होता. दोन्ही चित्रपटांचे सेट शेजारी शेजारी होते. तिथेच दोघांची मैत्री झाली होती. 2019 मध्ये रिया आणि सुशांत यांच्या व्हेकेशनचे काही फोटो समोर आले होते. त्यावेळी दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याचे समोर आले होते. त्याचवर्षी डिसेंबर महिन्यापासून रिया आणि सुशांत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले होते. त्यानंतर सहा महिन्यांनी सुशांतने आत्महत्या केली होती. सुशांतच्या निधनाच्या सहा दिवसांपूर्वी रियासोबत त्याचे भांडण झाले होते आणि ती सुशांतचे घर सोडून निघून गेली होती.

बातम्या आणखी आहेत...