आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभिनेता रितेश देशमुखचा आज वाढदिवस असून त्याने वयाची 44 वर्षे पूर्ण केली आहे. 17 डिसेंबर 1978 रोजी लातूर येथे रितेशचा जन्म झाला. दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा मुलगा असलेल्या रितेशने 'तुझे मेरी कसम' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री केली. या पहिल्याच चित्रपटात रितेशला त्याची आयुष्याची जोडीदार भेटली ती म्हणजे जिनिलीया. तब्बल 10 वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर रितेश आणि जिनिलीयाने लग्न थाटले होते. या जोडीकडे बॉलिवूडमधील एक बेस्ट कपल म्हणून पाहिले जाते.
आज रितेशच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जिनिलीयाने खास अंदाजात त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तुझ्यावर प्रेम न करणे अशक्य आहे, असे म्हणत तिने रितेशवरील आपले प्रेम व्यक्त केले आहे. मी तुझ्यावर प्रेम करते कारण माझे तुझ्यावर प्रेम आहे. तुझ्यावर प्रेम न करणे अशक्य आहे, असे जिनिलीया म्हणाली आहे.
रितेशवर जीवापाड प्रेम करणा-या जिनिलीयाने पहिल्या भेटीत मात्र त्याच्याकडे चक्क दुर्लक्ष केले होते. कशी आहे त्यांची लव्ह स्टोरी वाचा...
एअरपोर्टवर झाली होती पहिली भेट
रितेश आणि जिनिलीया यांची भेट हैदराबाद एअरपोर्टवर झाली होती. यावेळी 16 वर्षीय जिनिलीया तिच्या आईसोबत होती. मुख्यमंत्र्याचा मुलगा म्हटल्यावर त्याच्यात फारच अॅटीट्युड असणार असे तिला वाटले होते, त्यामुळे जेव्हा रितेश तिच्याकडे हातमिळवणी करण्यासाठी आला तेव्हा तिने त्याला अॅटीट्युड द्यायला सुरुवात केली. रितेशला जिनिलीया ऑकवर्ड असल्याचे वाटले पण जिनिलीयाच्या आईसमोर रितेश अतिशय नम्रपणे वागत होता. त्यानंतर सेटवरच्या लोकांशीही रितेशचे वागणेबोलणे पाहून जिनिलीयाला त्याच्या चांगल्या स्वभावाची ओळख पटली आणि हळूहळू त्यांच्यात मैत्री झाली.
चित्रटपटाच्या शूटिंगनिमित्त एकत्र घालवायचे वेळ
रितेश आणि जिनिलीयाने तुझे मेरी कसम या चित्रपटाचे संपूर्ण शूटिंग हैदराबाद येथे केले. शूटिंग पूर्ण झाल्यावर रितेश जेव्हा मुंबईत परतला तेव्हा तो आणि जिनिलीया एकमेकांना मिस करु लागले आणि त्यांचे एकमेकांसोबत फोनवर बोलणे सुरू झाले. यानंतर हे दोघे एकमेकांच्या प्रेमात कधी पडले ते त्यांनाच समजले नाही त्यामुळे एकमेकांना कोणी प्रपोज केले हे त्यांना अजूनही लक्षात नाही, असे दोघे सांगतात. दोघे एकमेकांना भेटायचा नेहमी कारण शोधत आणि सोबत वेळ घालवत होते.
रितेशला लवकर करायचे होते लग्न पण वडिलांचा होता विरोध
रितेशचे वडील दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे महाराष्ट्रातच्या राजकारणाचे एक मोठे नाव होते. रितेश हिंदू आहे तर जिनिलीया ख्रिश्चन आहे. विलासरावांनी प्रथम या लग्नाला विरोध केला, असे म्हटले जाते. पण कालांतराने रितेशने त्याच्या घरच्यांची संमती मिळवली आणि जिनिलीया डिसूजा जिनिलीया देशमुख झाली.
रितेश-जिनिलीया अडकले विवाहबंधनात
रितेश आणि जिनिलीयाने 3 फेब्रुवारी 2012 रोजी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघे दोन वेळा विवाहबंघनात अडकले. त्यांचे कारण म्हणजे, जिनिलीया ख्रिश्चन आहे आणि रितेश हिंदू. त्यामुळे दोघांनी हिंदू आणि ख्रिश्चन या दोन्ही पद्धतीने विवाह थाटला.
लग्नाच्या दोन वर्षानंतर झाले आईबाबा
रितेश आणि जिनिलीया लग्नाच्या दोन वर्षानंतर आई-बाबा बनले. जिनिलीयाने 25 नोव्हेंबर 2014 रोजी रियान या त्यांच्या पहिल्या बाळाला जन्म दिला त्यानंतर लगेचच दुसऱ्या बाळालाही जन्म देत 1 जून 2016 रोजी रितेश आणि जिनिलीया पुन्हा आईबाबा झाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.