आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Happy Birthday: Sharad Kelkar, Who Gave Voice To Bahubali, Was Replaced From The Show Due To The Problem Of Stammering, Has Also Faced Financial Crisi

45 वर्षांचा झाला शरद केळकर:'बाहुबली'ला आवाज देणारा हा अभिनेता एकेकाळी अडखळत बोलायचा, केला आहे हलाखीच्या परिस्थितीचा सामना

9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अडळखत बोलत असल्याने मुले हिणवायची

भूज द प्राइड ऑफ इंडिया, तानाजी - द अनसंग वॉरियर, दरबान, लक्ष्मी, बादशाहो यासारख्या हिट चित्रपटांमध्ये झळकलेला अभिनेता शरद केळकर याचा आज वाढदिवस असून त्याने वयाची 45 वर्षे पूर्ण केली आहे. छोट्या पडद्यावरुन करिअऱची सुरुवात करणा-या शरदने बॉलिवूड इंडस्ट्रीत आता स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. पण एक काळ असा होता, जेव्हा त्याला आयुष्यात अनेक चढउतार बघावे लागले. शरद च्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया त्याच्या संघर्षाविषयी...

लहानपणीच हरवले वडिलांचे छत्र..
शरद केळकरच्या वडिलांचे तो लहान असतानाच निधन झाले. तेव्हापासून आई आणि मोठ्या बहिणीनेच त्याचा सांभाळ केला. शरद मराठी कुटुंबातील असला तरी त्याचे मुळ गाव मध्य प्रदेश येथील ग्वालियर हे आहे. शरदने ग्वालियरच्या एका प्रतिष्ठीत महाविद्यालयातून एमबीएचे शिक्षण घेतले आहे.

एमबीएतून शिक्षण पूर्ण केले तरी शरदचा ओढा फॅशन जगताकडे होता. शरद जेव्हा 7 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आला तेव्हा त्याला आला तेव्हा Grasim Mr India 2002 या स्पर्धेबद्दल शेवटच्या दिवशी कळाले. त्याच वेळी घाईघाईत त्याने रॅम्पवॉकमध्ये सहभाग घेतला. त्यावेळी शरद जीम इन्सट्रक्टरचे तसेच एअरटेलमध्ये पार्ट टाईम जॉब करत होता. त्यानंतक केवळ एका महिन्यात शरदने जवळपास 25 शोमध्ये रॅम्पवॉक केला. शरद केळकर Grasim Mr. India finalist बनला. त्यानंतर 2004 साली शरदने 'आक्रोश' या दुरदर्शनवरील मालिकेतून इंडस्ट्रीत प्रवेश केला. 2004 मध्ये हलचल या चित्रपटात शरद कॅमिओ रोलमध्ये दिसला होता. त्याने पती,पत्नी और वो हा शो 2009 साली होस्ट केला.

अडळखत बोलत असल्याने मुले हिणवायची
शरद केळकरने अलीकडेच एका मुलाखतीत खुलासा केला की, बालपणी तो अडखळत बोलत असे. यामुळे त्याला डिवचले जायचे. इतर मुले त्याला त्रास द्यायची. शरद केळकरने सांगितले, "मी बालपणी अडखळत बोलत असे. त्यामुळे मला इतर मुले त्रास द्यायची. पण आता माझ्याकडे पहा, मी अशा व्यवसायात आहे जिथे मला माझे भाषण कौशल्य वापरावे लागते." या डिसऑर्डरमुळे कधी अभिनयाचा विचार केला नव्हता असे शरदने एका मुलाखतीत सांगितले होते.

शरदने संघर्षाच्या दिवसांबद्दल सांगितले
अभिनेता मनीष पॉलच्या पॉडकास्ट या टॉक शोमध्ये शरद केळकरने त्याच्या संघर्षाच्या दिवसांना उजाळा दिला होता. शरदने सांगितले की, एक वेळ अशी होती, जेव्हा त्याच्या बँक खात्यात पैसे नव्हते, डोक्यावर खूप कर्ज होते. इतकेच नाही तर क्रेडिट कार्डही बंद झाले होते.

शरद व्हिडिओमध्ये म्हणाला होता, 'लोक विचार करतात की यांच्याकडे मर्सिडीज आहे. चांगले कपडे घालता, चांगली हेअर स्टाइल करून फिरतात. मात्र लोकांना यामागची स्टोरी माहित नसते. लोकांना आधीच्या संघर्षाबद्दल कल्पना नसते,' असे शरद म्हणाला. शरदने पुढे सांगितले होते, "त्यावेळी माझे क्रेडिट कार्ड बंद झाले होते. एक वेळ अशी आली होती की, बँक खात्यात काहीच पैसे शिल्लक राहिले नव्हते. मला कर्जाची परतफेड करायची होती आणि क्रेडिट कार्डमध्ये देखील पैसे शिल्लक राहिले नव्हते."

बातम्या आणखी आहेत...