आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Happy Birthday Sonali Bendre: Pakistani Cricketers Shoaib Akhtarwants To Kidnap Sonali Bendre Ofr One Sided Love, Sunil Shetty And Raj Thackeray Also Were Madly In Love With Her

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हॅपी बर्थडे सोनाली:पाकिस्तानी क्रिकेटर शोएब अख्तरला करायचे होते सोनाली बेंद्रेचे अपहरण, सुनील शेट्टी विवाहित नसते तर केले असते सोनालीसोबत लग्न

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 12 नोव्हेंबर 2002 रोजी सोनालीने गोल्डी बहल यांच्यासोबत लग्न केले.

सरफरोश, हम साथ साथ है आणि मेजर साब यांसारख्या चित्रपटांमध्ये झळकलेली अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने आज वयाची 46 वर्षे पूर्ण केली आहेत. आपल्या अभिनय आणि अदांनी सोनालीने केवळ सामान्यांनाच नव्हे तर अनेक दिग्गजांनाही स्वतःचा चाहता बनवले. एक नजर टाकुया कोण आहेत हे सेलेब -

शोएब अख्तरने दिली होती अपहरणाची धमकी

'रावळपिंडी एक्स्प्रेस' म्हणून प्रसिद्ध असणारा क्रिकेटपटू शोएब अख्तर हा सोनाली बेंद्रेच्या प्रेमात वेडा होता. वृत्तानुसार 'इंग्लिश बाबू देसी मेम' या चित्रपटात ज्यावेळी शोएबने सोनालीला पाहिले त्याचवेळी तो तिच्या प्रेमात पडला होता. एका चॅट शो मध्ये तर, आपण सोनालीचा फोटो पाकिटात ठेवायचो, असेही त्याने स्पष्ट केले होते. किंबहुना तिचे अनेक पोस्टरही त्याच्या खोलीच्या भिंतींवर चिकटवलेले होते.

सोनालीवर भाळलेल्या शोएबने तर तिने आपल्या प्रेमाचा प्रस्ताव नाकारल्याच थेट तिचे अपहरण करण्याचे ठरवले होतं. सोनालीप्रती ते एका चाहत्याचं वेड होतं, असंच म्हणावं लागेल.

दरम्यान, सोनालीला जेव्हा त्यावेळी शोएबविषयी विचारण्यात आले होते; तेव्हा मात्र तिने आपण पाकिस्तानी क्रिकेटर शोएब अख्तरला ओळखत नसल्याचे सांगितले होतं. आपण क्रिकेटप्रेमी नसल्याचेही तिने स्पष्ट केले होते. सोनाली आणि शोएबच्या या अफलातून गोष्टीची क्रीडा वर्तुळातही बरीच चर्चा झाली होती.

सुनील शेट्टी यांचे होते एकतर्फी प्रेम

90 च्या दशकात सुनील शेट्टी आणि सोनाली बेंद्रे यांची जोडी पडद्यावरील लोकप्रिय जोड्यांपैकी एक होती. दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. पण खासगी आयुष्यात सुनील कधीही सोनालीजवळ आपल्या प्रेमाची कबुली देऊ शकले नाहीत. दोघांनी एकत्र टक्कर (1995), सपूत (1996) आणि कहर (1997) या चित्रपटांमध्ये काम केले होते.

सुनील शेट्टी सोनालीवर एकतर्फी प्रेम करु लागले होते. पण त्याकाळात ते विवाहित होते आणि आपल्या पत्नीला ते दगा देऊ इच्छित नव्हते. या कारणामुळे त्यांनी सोनालीजवळ कधीही आपल्या मनातली गोष्ट बोलून दाखवली नाही.

सुनील शेट्टीचे जवळचे मित्र आणि बॉलिवूड अभिनेते गोविंदा यांनी एका मुलाखतीत सांगितले होते, की जर त्याकाळात सुनील शेट्टी विवाहित नसते, तर त्यांनी सोनाली बेंद्रेसोबत नक्की लग्न केले असते.

पहिल्या नजरेत घायाळ झाले होते गोल्डी बहल
पंजाबी तरुण गोल्डी बहल आणि मराठी मुलगी सोनाली यांची लव्ह स्टोरी काही वेगळी आहे. दोघांची भेट एका चित्रपटाच्या सेटवर झाली होती. प्रोड्यूसर गोल्डींनी सोनाली पहिल्यांदा 1994 मध्ये चित्रपट 'नाराज'च्या सेटवर पाहिले होते. पहिल्या नजरेतच गोल्डी घायाळ झाले होते. त्यांची बहिण सृष्टी आर्य सोनालीची मैत्रीण होती. तिनेच या दोघांची पहिली भेट करून दिली. पहिल्या भेटीतच गोल्डींनी सोनाली अतिशय हळुवार खाते त्यावर काही कॉमेंट केली. त्यावर सोनाली नाराज झाली होती.

अभिषेकने दिले धाडस
त्यावेळी सोनाली बेंद्रे अमिताभ बच्चन यांच्यासोबत मेजर साब चित्रपटात काम करत होती. सेटवर जुनिअर बच्चन अभिषेक सुद्धा येत होता. त्यानंतर अभिषेक आणि गोल्डी बहल यांच्यात मैत्री झाली. अभिषेकची भेट घेण्याच्या बहाण्याने त्यांनी सेटवर वारंवार जाण्यास सुरुवात केली. यानंतर सोनाली, अभिषेक आणि गोल्डी एकत्रित भेटायला लागले. सोनालीचा नेक्स्ट चित्रपट अंगारे गोल्डी यांनीच प्रोड्युस केला होता. याच चित्रपटाची पार्टी सुरू असताना अभिषेकने गोल्डींना धाडस दिलं. गोल्डींनी सोनालीला लग्नासाठी प्रपोज केले आणि तिने होकार दिला. सोनालीने एका मुलाखतीमध्ये शूटिंग सेटच्या आठवणी ताज्या केल्या होत्या. "ते (गोल्डी) सेटवर येऊन माझे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत होते. ते क्षण अतिशय क्यूट होते. आमची मैत्री झाली आणि 5 वर्षे एकमेकांना डेट केले." 12 नोव्हेंबर 2002 मध्ये दोघांनी विवाह केला. ऑगस्ट 2005 मध्ये सोनालीने मुलगा रणवीरला जन्म दिला.

1994 मध्ये केली करिअरला सुरुवात
सोनाली बेंद्रेने 1994 मध्ये 'आग' या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. या चित्रपटात तिने गोविंदासोबत काम केले. याच वर्षी तिला न्यू फेस ऑफ द ईयरचे फिल्मफेअर मिळाले होते. सोनालीने 1990 ते 2000 पर्यंत चित्रपटांमध्ये काम केले. यात 'दिलजले' (1996), 'तराजू' (1997), 'मेजर साहब' (1998), 'हम साथ-साथ हैं' (1999), 'हमारा दिल आपके पास है' (2000), 'तेरा मेरा साथ रहे' (2001) अशा चित्रपटांचा समावेश आहे. सोनाली बॉलिवूडमध्ये अशा अभिनेत्रींमध्ये समाविष्ट आहे जिने सलमान खान, शाहरुख खान आणि आमिर अशा तिन्ही खानसोबत स्क्रीन शेअर केले. सोनालीने सलमानसोबत 'हम साथ-साथ हैं', आमिरसोबत 'सरफरोश' आणि शाहरुखोबत 'इंग्लिश बाबू देसी मेम' आणि 'डुप्लीकेट' यात काम केले आहे. तिने टीव्ही सीरियल 'अजीब दास्तां है ये' मध्ये सुद्धा काम केले.

बातम्या आणखी आहेत...