आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

हॅपी बर्थ डे सोनू निगम:...म्हणून सोनूला म्हटले जाते बॉलिवूडचा मॉडर्न रफी,  फ्रेम करून ठेवले आहेत 12 रुपये

मुंबई3 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • गायक सोनू निगम यांनी आज वयाची 47 वर्षे पूर्ण केली आहेत.

नव्वदच्या दशकात आपल्या आवाजाने मंत्रमुग्ध करणाऱ्या गायकाविषयी आज आपण बोलणार आहोत. त्यांची ती जादू आजही कायम आहे. त्यांना मॉडर्न रफी म्हणून ओळखले जाते. त्यांनी अनेक चित्रपटांत गाणी गायली. ते लता मंगेशकर यांचे लाडके आहेत. प्रख्यात गायक सोनू निगम यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्याविषयी काही किस्से जाणून घेऊ...

30 जुलै 1973 राेजी फरिदाबाद (हरियाणा) येथे जन्मलेल्या सोनू निगम यांचे वडील आगम कुमार निगमदेखील गायक होते. वयाच्या चौथ्या वर्षीच सोनू आपल्या वडिलांसोबत स्टेजवर मोहंमद रफी यांचे गाणे ‘क्या हुआ तेरा वादा’ गात होते. सुरुवातीला सोनू आपल्या वडिलांसोबत लग्न आणि पार्ट्यांमध्ये गाणी गात असत. मुंबईला आल्यावर त्यांनी उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांच्याकडून संगीताचे शिक्षण घेतले. आतापर्यंत सोनू यांनी हिंदी, इंग्रजी, तामिळ, तेलुगू, उडिया, पंजाबी, बांगला, आसामी, मल्याळम, मराठी, नेपाळी आदी भाषांत गाणी गायली आहेत.

 • अनिल कपूर यांच्या सांगण्यावरून तयार झाले सोनू

अनिल कपूर, ऐश्वर्या राय बच्चन आणि राजकुमार राव अभिनित चित्रपट ‘फन्ने खां’मध्ये शम्मी कपूर यांच्या प्रिंस चित्रपटातील लोकप्रिय गाणे ‘बदन पे सितारे लपेटे हुए...’चे रिमेक केले जाणार होते. मात्र या रिमेकसाठी सोनू तयार नव्हते. खरं तर, सोनूचे म्हणणे होते, हे गाणे मोहम्मद रफी यांनी गायले आणि मी त्यांना गुरु मानतो. त्यांनी गायलेल्या गाण्याचे क्रेडिट घेऊ इच्छित नाही. मात्र अनिल कपूर यांनी सोनूला समजावले की, चित्रपटातील माझे पात्रदेखील रफी साहेबांचा चाहता आहे. तो त्यांचेच गाणी गातो. त्यामुळे तू माझ्या पात्राला आपला आवाज द्यावा, अशी माझी इच्छा आहे.

 • फ्रेम करून ठेवले होते 12 रुपये

एक दिवस सोनू निगम मुंबईच्या जुहू भागात रस्त्यावर हार्मोनियम घेऊन बसले. त्यांनी म्हाताऱ्या भिकाऱ्याचा वेश धारण केला होता. त्यामुळे कोणी ओळखू शकले नाही. ते गाणी गाऊ लागले. आवाज ऐकून हळूहळू गर्दी वाढत गेली. तेव्हा एक मुलगा त्यांच्याकडे आला आणि गाण्याचे कौतुक केले. नंतर गाणे रेकॉर्ड करण्याची परवानगी मागितली. त्यानंतर मुलाने विचारले, अंकल, तुम्ही काही खाल्ले की नाही? त्यानंतर त्या मुलाने हळूच सोनू यांच्या हातात 12 रुपये दिले. त्यानंतर गर्दी पाहून सोनू आपले अंथरूण आणि हार्मोनियम घेऊन पुढे गेले. घरी जाऊन मेकअप काढून सोनू यांनी एक व्हिडिओ शेअर करत सांगितले, तो मीच होतो, आवाजही तोच आहे, फक्त कपडे आणि वय बदलले. याचा एक चांगला अनुभव आला. एक मुलाने माझी विचारपूस केली, मला न्याहारी करण्यासाठी गुपचूप 12 रुपये दिले.

किस्से

 • सोनू यांना बॉलिवूडचा मॉडर्न रफी म्हटले जाते. कारण सुरुवातीच्या काळात सोनूने रफी साहेबांची अनेक गाणी आपल्या आवाजात गाऊन कॅसेट्स रिलीज केल्या होत्या.
 • चित्रपट 1942 : अ लव्ह स्टोरीमधील गाणे ‘एक लड़की को देखा तो ऐसा लगा...’ साठी सोनू निगम हे आर. डी. बर्मन यांची पहिली पसंत हाेते. मात्र हे गाणे कुमार सानू यांना मिळाले.
 • सोनू यांना इंडस्ट्रीत सर्वांनीच प्रेम आणि सन्मान दिला. स्वरकोकिळा लता मंगेशकर त्यांच्यावर सर्वात जास्त प्रेम करतात. शाहरुख खान सोनूचेे नेहमी कौतुक करत असतो. शंकर महादेवनचे ते आवडते
 • गायक तर हिमेश रेशमिया त्यांना इंडस्ट्रीचा उत्कृष्ट गायक मानतात. अरमान मलिकसह अनेक नवीन कलाकारांसाठी सोनू गुरूसमान आहेत.
 • सोनू यांनी 1995 ते 1999 पर्यंत संगीतावर आधारित सारेगामापा शोचा सूत्रसंचालक म्हणून काम केले. 2007 मध्ये या शोचे परीक्षक बनले. 2009 मध्ये शोच्या ग्रँड फिनालेमध्ये पाहुणा परीक्षक म्हणून सहभागी झाले. अनेक कार्यक्रमांत त्यांनी परीक्षकाची भूमिका बजावली.
 • अभिनेता म्हणून 1983 मध्ये आपल्या करिअरची सुरुवात ‘बेताब’ चित्रपटातून केली होती. ‘जानी दुश्मन : एक अनोखी कहानी’, ‘काश आप हमारे होते’ आणि ‘लव्ह इन नेपाल’ चित्रपटांत काम केले.

प्रसिद्ध गाणी

 • अभी मुझमें कहीं... (अग्निपथ)
 • सतरंगी रे... (दिल से)
 • संदेशे आते हैं...(बॉर्डर)
 • कल हो ना हो... (कल हो ना हो)
 • पंछी नदिया पवन.. (रिफ्यूजी)
 • अब मुझे रात दिन... (दिवाना)
 • यह दिल दीवाना... (परदेस)
 • तनहाई... (दिल चाहता है)
 • मैं हूं ना... (मैं हूं ना)

कारकीर्दीवर एक नजर

 • 1992 पहिले गाणे- ओ आसमान वाले- (आजा मेरी जान)
 • 1992 पहिला अल्बम - रफी की यादें
 • 1995 पहिले हिट गाणे- ‘अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का...' (बेवफा सनम)
 • 1999 पहिला हिट अल्बम- दिवाना (सर्वात हिट अल्बम)

पुरस्कार आणि यश

 • राष्ट्रीय पुरस्कार ( कल हो ना हो.. गाण्यासाठी)
 • फिल्मफेअर अवॉर्ड (कल हो ना हो आणि साथीया गाण्यासाठी)
 • फिल्मफेअर अवॉर्ड (दाक्षिणात्य इंडस्ट्रीत) याशिवाय सोनू निगम यांना जवळजवळ 30 छोटे-माेठे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.