आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

37 वर्षांची झाली ताहिरा कश्यप:16 वर्षांच्या ताहिराला बघताच  प्रेमात पडला होता आयुष्मान, लग्नाच्या वेळी खात्यात होते फक्त 10 हजार रुपये मात्र लग्नानंतर पालटले नशीब

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ताहिराने कॅन्सरवर केली मात

ताहिरा कश्यपचा आज वाढदिवस असून तिने वयाची 37 वर्षे पूर्ण केली आहेत. बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराणाची पत्नी ताहिरा ही लेखिका आणि दिग्दर्शिका आहे. आयुष्मानसोबतची तिची लव्ह स्टोरी एखाद्या चित्रपटाच्या कथेला साजेशी आहे. ताहिरा 16 वर्षांची असताना आयुष्मानला भेटली होती.

दोन्ही कुटुंब एकमेकांच्या परिचयाचे होते. जवळजवळ 12 वर्षांच्या मैत्रीनंतर आयुष्मान आणि ताहिरा यांनी 2011 मध्ये लग्न केले. ताहिरा आयुष्मानसाठी लकी ठरली. लग्नानंतर बॉलिवूडमध्ये त्याच्या यशस्वी करिअरला सुरुवात झाली. 'विक्की डोनर' हा आयुष्मानचा पहिला बॉलिवूड चित्रपट आहे. या कपलला एक मुलगा आणि एक मुलगी आहे.

अशी सुरु झाली लव्ह स्टोरी
एका मुलाखतीत आयुष्मानने कबुल केले होते, की ताहिरासोबत लग्न झाल्यानंतर त्याचे आयुष्य बदलून गेले आहे. लग्नापूर्वी तो आर्थिक तंगीला सामोरे जात होता. लग्नाच्यावेळी त्याच्या अकाउंटमध्ये केवळ दहा हजार रुपये होते. आयुष्मानची पत्नी ताहिरा कश्यप त्याची बालपणीची मैत्रीण आहे. ताहिरा 16 वर्षांची असताना आयुष्मान आणि तिची पहिली भेट झाली होती.

आयुष्मानने सांगितले होते की, ती मी आधीपासूनच ओळखत होते, मात्र वयाच्या सोळाव्या वर्षी मी तिच्या प्रेमात पडलो. आम्ही दोघेही एकाच शाळेत होतो. मी अकरावीत आणि ती बारावीत होती. कोचिंग क्लासेसलादेखील एकत्र जायचो. माझे वडील, जे ज्योतिषी आहेत, त्यांची ताहिराचे वडील राजन कश्यप यांच्याशी चांगली ओळख होती. एक दिवस ताहिराचे कुटुंब आमच्याकडे जेवायला आले, त्यानंतर ताहिरा आणि माझे नाते खास बनले.

शालेय जीवनातील आमची प्रेमकथा कॉलेज आणि थिएटरच्या दिवसांमध्ये पुढे गेली. आम्ही दोघे चंडीगडमध्ये एकत्र थिएटर करायचो. चंदीगडमध्येच मंच तंत्र नावाचा थिएटर ग्रुप आम्ही एकत्र बनवला. आम्ही दोघांनी बराच वेळ एकमेकांना डेट केले आणि मग एक दिवस मी तिला लग्नाची मागणी घातली. आम्ही कौटुंबिक मित्र असल्याने आमच्या लग्नाला कुटुंबीयांचा विरोध झाला नाही. हे सर्व सोपे होते, कारण आम्ही दोघेही एकमेकांना लहानपणापासूनच ओळखत होतो.

ताहिराने कॅन्सरवर केली मात
2018 मध्ये, ताहिराला स्टेज 1 चा स्तनाचा कर्करोग असल्याचे निदान झाले होते, मात्र उपचारानंतर ती बरी झाली. ताहिराने कर्करोगाचा पराभव करत जोरदार पुनरागमन केले. ती सध्या तिच्या पुढच्या चित्रपटाच्या दिग्दर्शनात व्यस्त आहे.

बातम्या आणखी आहेत...